Dedicated to The God of Small Things...

Submitted by मी मुक्ता.. on 10 February, 2015 - 13:02

कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
पहिल्या पावसाने दरवळावा आसमंत..
वार्‍यासोबत वाहत यावा आंब्याचा सुगंध..
नदीच्या शरीरात खोल घुसत जावेत भोवरे..
इतकं सहज प्रेम नाही होत माणसांच्या जगात..
जातीपातीच्या.. परिस्थितीच्या.. पैशाच्या.. रंगाच्या..
अनेक भिंती आहेत इथे..
आणि काही लक्ष्मणरेषा..
कधीच ओलांडू नयेत अशा..
ओलांडल्या तर जगबुडी होईल अशा..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
प्रेम म्हणजे नक्की काय हे बहुतेकांना माहित नसलं तरीही..
स्वतःच्या स्वतःला लागलेल्या शोधाला कोणी प्रेम मानलं तरीही..
आणि कोणाला सगळ्या व्याख्यांपलीकडे जाऊन प्रेम करता आलं तरीही..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..

कोणी कोणाला स्पर्श करावा? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
स्पर्श न करता भेट द्यावी,
की निरागस उत्कटतेने मिठी मारावी...
कोणती माणसं उंबर्‍याबाहेर ठेवावी,
आणि स्वार्थासाठी कोणाची साथ द्यावी हे ठरलेलं आहे..
कोणी कोणाला स्पर्श करावा? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
पण कोणाच्या आत्म्याला कोणाचा स्पर्श व्हावा याचे काही नियम नाहीत..
कोणाची आयुष्य किती गुंतावी एकमेकांच्यात याचे काही शास्त्र नाही..
किती भावविश्वं विरघळावी एकत्र यावर काही बंधनं नाहीत..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..

ठरलेले आहेत जगाचे नियम..
प्रत्येकासाठी वेगवेगळे..
आणि तरी प्रत्येकालाच अपरिहार्यपणे सलणारे..
सुखासाठी हावरेपणा केला की दु:ख मिळतं..
पण सुखाच्या प्रतिक्षेत अबोल आयुष्य काढलं तरी कोणाला समजतं..?
जिथे वास्तवाच्या वाट्याला क्वचितच येणारी सुखं,
फक्त स्वप्नांतच भेटतात..
आणि स्वप्नांतली सुखं खर्‍या आयुष्यात मोजायची का हे कोणालाच माहीत नसतं..
काही चुका त्यांच्या शिक्षा घेऊनच येतात..
पण चुकीच्या प्रमाणातच शिक्षा व्हावी याचं उत्तरयायित्व कोणाचंच नसतं..
मग कधी मोजावं लागतं आयुष्य..
कधी अनेक आयुष्यं..
कधी अनेक पिढ्या..
तरी ठरलेले आहेत जगाचे नियम..
जगाच्या भल्यासाठी केलेले नियम..
अमानुष निर्दयतेने पाळले जाणारे नियम..
कोणी कोणावर कसं आणि किती प्रेम करावं याचे नियम..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..

--------------------------------------------------------------------------------------------------
http://merakuchhsaman.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे फक्त त्या पुस्तकापुरतेच नाही तर आपल्यासकट भोवतालच कडवट वास्तव न रुचणार पण हमखास प्रत्ययास येणारं .अगदी मन:स्पर्शी शैलीत लिहीलत .खुप आवडल..

Nice, काही गोष्टी छान जमल्यात Happy
Of course 'कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे' हे जरी कथेचे सुत्र असले तरी, यात अनेक social, political गोष्टींचाही समावेश आहे. अशा गोष्टी कवितेत missing वाटल्या.

जगाच्या भल्यासाठी केलेले नियम..>>>>> Uhoh

पहिल्या पावसाने दरवळावा आसमंत..
वार्यासोबत वाहत यावा आंब्याचा सुगंध..
नदीच्या शरीरात खोल घुसत जावेत भोवरे..
इतकं सहज प्रेम नाही होत माणसांच्या जगात.. << वा ..

पण कोणाच्या आत्म्याला कोणाचा स्पर्श
व्हावा याचे काही नियम नाहीत..<< खरंय..क्या बात .

अमा,
थॅक्स.. Happy

भुईकमळ,
ही सगळी त्या कथेची ताकद आहे.. कादंबरीच तशी आहे.. भोवतालचं कडवट वास्तव मांडणारी.. मनःस्पर्शी.. Happy

बी,
नुकतीच "द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज" ही अरुंधती रॉय यांची कादंबरी वाचली.. Its haunting.. कवितेत जे काही आहे ते त्या कादंबरीतलंच आहे.. अर्थात कथेचा आवाका आणि पदर अनेक आहेत.. ही फक्त वेदना.. कादंबरीभर पसरुन राहिलेली आणि मग वाचकाच्या मनावर पसरत जाणारी..

प्रशू,
Happy खरंय.. पण ते सगळं लिहिलं असतं तर तो लेख झाला असता.. जसं मी बी यांच्या प्रतिसादात म्हटलंय.. "कथेचा आवाका आणि पदर अनेक आहेत.. ही फक्त वेदना.. कादंबरीभर पसरुन राहिलेली आणि मग वाचकाच्या मनावर पसरत जाणारी.."
आणि हो, जगाचा हाच समज आहे ना, की नियम जगाच्या भल्यासाठी आहेत.. Happy

सुशांत,
Happy थॅक्स..

आशूडी,
हो.. पुस्तकातलीच वाक्यं.. त्यांच्याच कल्पना आहेत.. Happy
आणि लिंक भारी आहे.. मस्त लिहिलय तुम्ही.. Happy

पुन्हा एकदा सर्वांचे खूप आभार..

<<आणि हो, जगाचा हाच समज आहे ना, की नियम जगाच्या भल्यासाठी आहेत..>>
Ohh sarcasm.. appreciate, and agree Happy

आत्तापर्यन्त या कादंबरीची खूप पारायणे झाली. प्रत्येकवेळी काहीतरी नवीन गवसत गेले.

ही फक्त वेदना.. कादंबरीभर पसरुन राहिलेली आणि मग वाचकाच्या मनावर पसरत जाणारी>>>>> मलाही आधी असेच वाटत होते, पण पूर्ण पुस्तकभर 'फक्त समाजाच्या या नियमांमुळे' भोगावी लागणारी वेदना पाहून, एक वेळी अशी आली की वाटायला लागल, नकोच ती वेदना, ते दुखः . मला जस जगायचं आहे तस मी जगणार, अगदी समाजाच्या नियमांच्या विरोधात जाऊनही. म्हणूनच शेवटचा प्रसंग नियमांविरुद्ध असूनही 'योग्य' वाटतो. आणि एक positive hope देउन जातो.

बी > Happy

प्रशू..
Happy होप की हॉरर..?
ह्म्म.. तसं पाहिलं तर होप नाहीतर वेदनाच..

आगाऊ,
Happy थॅक्स.. कविता जरा तरी जमलिये असा अर्थ घेते मी याचा..

प्रतिसादाबद्दल आभार.. Happy

प्रशू,
तुम्ही म्हटलात, आणि एक positive hope देउन जातो.>> मला वाटतय की जिथे कुठे अशी काही पॉझिटीव होप ची शक्यता असते तिथेच जगाचे नियम मध्ये येतात आणि मग सगळं भयानक होऊन जातं.. आशेचा जरासा अंकुर निर्दयपणे नाहीसा केला जातो..
म्हणून म्हटलं, म्हटलं तर 'होप' म्हणता येईल पण खरी शक्यता वेदनेचीच जास्त.. Happy

खुपचं सुंदर...

ही फक्त वेदना.. कादंबरीभर पसरुन राहिलेली आणि मग वाचकाच्या मनावर पसरत जाणारी>>>अगदी असंचं वाटलं होतं कादंबरी वाचल्या वर

तुमची कविता वाचून पुन्हा ती कादंबरी वाचावीशी वाटतेयं

कादंबरी वाचून जसं वाटलं होतं तसंच कविता वाचून वाटलं! पुन्हा वाचायचा प्रयत्न करणारे पण माहिती नाही वाचता येईल का! पहिल्यांदा वाचताना जसे जसे पुढे जातो तसे आपण त्यात अधिकाधिक गुंतत जातो आणि मग ती वेदना मनभर पसरत जाते!

मी मुक्ता,
मला वाटतय की जिथे कुठे अशी काही पॉझिटीव होप ची शक्यता असते तिथेच जगाचे नियम मध्ये येतात >>>>> असेलही, मी तीतकासा जगाचे नियम follow करत नाही. मी particular या पुस्तकाबद्दल बोलत होतो. शेवटचा प्रसंग पाहता, समाजाच्या या नियमांमुळे भोगावी लागणारी वेदना पाहून नक्कीच इस्था आणि राहेल ला वाटल असेल की, नकोच ती वेदना, ते दुखः, आम्हाला जस जगायचं आहे तस आम्ही जगणार, अगदी समाजाच्या नियमांच्या विरोधात जाऊनही. आणि माझ्या मते हाच positive hope होता, की फायनली ते दोघे आतातरी त्याना जसे हवे तसे राहतील.

vini,
थॅक्स.. Happy

जिज्ञासा,
कादंबरी वाचून जसं वाटलं होतं तसंच कविता वाचून वाटलं>> कविता जमलिये असं समजायला हरकत नाही मग.. Happy खूप आभारी आहे..

प्रशू,
मी तीतकासा जगाचे नियम follow करत नाही>> वाचून आनंद वाटला..
की फायनली ते दोघे आतातरी त्याना जसे हवे तसे राहतील.>> आय होप दॅट टू!
Happy

आय होप दॅट टू >>>> आता हे पाहण्यासाठी अरुंधती रॉय ना पुढचा भाग लिहायला सांगायला पाहिजे.
(आणि त्याचाही मराठी अनुवाद फक्त अपर्णा वेलणकरांनीच करायला हवा.)

Prashu,
Lol I would love to read/watch sequels of many books/films but "the god of small things" is not one of those. The story has ended... Happy

Mugdhamansi..
Thanks a lot.. Happy

मी मुक्ता(or mukta)..I totally agree with you, infact ही कहाणी पडद्यावर उतरवणेही खूप अवघड आहे. And I don't know यातील शब्दांचा आणि प्रतिमांचा जो अर्थ आहे, जी शेड आहे ती दृश्य प्रतिमांमध्ये उतरेल का?

पाकिस्तान मध्ये या कथेवर एक प्रयोग करण्यात आला (तोही सिरियलच्या माध्यमातून, अम्मुच्या भूमिकेत सनम सईद आहे, ती 'जिंदगी गुलझार हैं', वाली ) पण माझ्या मते तरी तो पूर्णतः फसला (अक्षरशः बघवत नाही) you can take a look, and give me feedback.

तल्खियाँ(A story of bitterness)

प्रशू,
खरय.. कदाचित फक्त दृश्यप्रतिमांबद्दल बोलायचं झालं तर मणिरत्नम ते काम करु शकेल..but a good movie needs a lot more than that and in case of such a complicated story it seems difficult..

Well, my tv knowledge is limited to american TV shows and TLC, history etc.. So whatever you are talking Sanam sayeed etc is alien to me.. Lol पण प्रयोग फसला असेल याची खात्री आहे. इतक्या ताकदीची कथा आणि ती पण स्मॉल स्क्रीनच्या लिमिटेड बजेट मध्ये! फिर तो फसनाही था..(कितीही चांगले कलाकार असले तरी) Lol

असो, एक चांगला सिनेमा निघु शकतो पण मी म्हटलंच आहे वर काय प्रॉब्लेम आहे हे.. Happy

कवितेतलं मला कळत नाही, पण मला ही कादंबरी फारशी आवडली नव्हती. तल्खियॉ मात्र फार आवडली. इअतकी की कादंबरी पुन्हा वाचायची इच्छा झाली. आणि ही कविताही Happy

पाकिस्तान मध्ये या कथेवर एक प्रयोग करण्यात आला (तोही सिरियलच्या माध्यमातून, अम्मुच्या भूमिकेत सनम सईद आहे, ती 'जिंदगी गुलझार हैं', वाली ) पण माझ्या मते तरी तो पूर्णतः फसला (अक्षरशः बघवत नाही) you can take a look, and give me feedback. >> का माहित्ये का,
कारण केरळ राज्य, त्याचा इतिहास, संस्कृती, राजकारण, लोकसंस्कृती भुगोल हे सर्व ह्या कथेचा एक इंटिग्रल भाग आहे. तो वजा केल्यास कथा जेल होणार नाही.

मणिरत्नम ते काम करु शकेल>>> May be, but what about metaphor ? छोटया-छोटया गोष्टींसाठी जी रूपके वापरली आहेत, ती दृश्य प्रतिमांमध्ये उतरवणे अशक्यच, at least for this story. आणि जी मजा शब्दांत आहे ती स्क्रीन वर बघण्यात नाही.
डम-डम Happy

Sanam sayeed etc is alien to me>>>> Same here, मला पण इथेच मायबोलीवरच तिच्याबाबत समजल होत, खूप चर्चा झाली होती तिच्याबाबत, सो वाटल की तुला पण माहित असेल ती. बघ 'बी' किती Fan आहे त्या सिरियलचा, इतका की त्याने जिंगदी वरील सर्वच मालिका अशक्य सुंदर असतात. ही गोष्ट नमूद करायला तुझ्या बाफ चा आधार घेतला. ('बी' Don't take it personally)

any way,
नताशा
कवितेतलं मला कळत नाही-okay, पण मला ही कादंबरी फारशी आवडली नव्हती-Fine, तल्खियॉ मात्र फार आवडली-Great!!! धन्य आहे.
पण जर का तुम्ही सिरियल पाहायला सुरुवात केली असेल तर थांबा, अजून एकदा कादंबरी वाचा. आणि मग फक्त Timepass म्हणून सिरियल पाहू शकता. किंवा पाहायचेच असेल तर असे समजून पाहूच नका की, ही The God of Small Things ची adaptation आहे

अमा,
Yes of cource, पण तसे पाहायला गेल तर, अम्मू, राहेल आणि इस्था हे आपल्याला आपल्या आजूबाजूलाही पाहायला मिळतात.
पण मुलांच्या मनामधील जे भावविश्व आहे, जे विचार आहेत ते unique आहेत. आणि तेच पडद्यावर उतरवणे अवघड आहे. (Ex- सुरुवातीच्या सोफी मॉलच्या अंत्यसंस्काराच्या प्रसंगी राहेल ज्या नजरेतून तो प्रसंग पाहतेय, ते पडद्यावर उतरवणे अवघडच)

मणि रत्नम त्यात गाणि घालून रोमँटिक करू टा़केल. ही एक शोकांतिका आहे. खरे तर अम्मू आणि वेलुथा यांना एकत्र यायला काहीही अडकाठी नाही. पण समाज, जातिव्यवस्था, अमुचे स्टेटस घरातल्यांचे दांभिक वागणे ह्यामुळे त्यांच्या हातातले सूख विरघळून आयुष्य वाळवंट होउन जाते.

Pages