The Expected Virtue Of Excellence...

Submitted by मी मुक्ता.. on 17 February, 2015 - 05:50

Alejandro González Iñárritu ची ओळख २०१० मध्ये झाली तेव्हा त्याचे triology of death चे तिन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्याला पण ३ वर्षे उलटून गेलेली आणि 'Biutiful' अजून प्रदर्शनाच्या वाटेवर होता. म्हणजे त्याचे प्रदर्शित झालेले तिन्ही आणि लगेचच प्रदर्शित झालेला 'Biutiful' बघितल्याला ५ वर्षे झाली. आणि खरं सांगायचं तर आता ते चित्रपट नीटसे आठवतही नाहीत. नक्की काय संवाद होते, नक्की काय मांडणी होती, पार्श्वसंगीत कितपट प्रभावशाली होतं, कोणत्या प्रसंगानंतर कोणता प्रसंग होता, खरंच नीटसं आठवत नाही. काही गोष्टी अंधुक आठवतात.. चित्रपटातील व्यक्तिरेखा, त्यांचे हावभाव, स्थळं, एकूणच कथा, चित्रपटाची संकल्पना.. पण काही गोष्टी खूप व्यवस्थित आठवतात.. maya angelou चं एक वाक्य आहे..
"People will forget what you said..
People will forget what you did..
But people will never forget how you made them feel.."
And I remember that movies of Iñárritu made my heart feel so ached.. They had tremendous hold on my mind and heart. I remember that thing very clearly.. कोणतीही अस्सल कलाकृती माणसांइतकीच जिवंत असते.. चालत्याबोलत्या माणसांप्रमाणेच आपल्या आयुष्यावर परिणाम करते.. आणि कदाचित आपण विसरुन जाऊ, चित्रातली नेमकी रेषा, कॅनव्हासचा नेमका रंग, गाण्यातली नेमकी जागा, कवितेतला नेमका शब्द किंवा चित्रपटाची नेमकी मांडणी, पण त्या कलाकृतीने आपल्याला जी अनुभूती दिली, ती विसरणं शक्य नाही.. आणि म्हणूनच Iñárritu चे चित्रपट ऑल टाईम फेव्हरीट सदरात टाकता येतात.
त्याचा २००० साली आलेला पहिला चित्रपट 'amores perros', (Love's A bitch) माणसाच्या क्रौर्याची, एकनिष्ठेची आणि विश्वासघाताची गोष्ट.. चित्रपटाचं इंटरेस्टींग नाव हे चित्रपट बघण्याचं तात्कालिक कारण ठरलं असलं तरी Iñárritu च्या मांडणीने मनावर घेतलेली पकड त्याचे इतर चित्रपट शोधण्यास आणि बघण्यास कारणीभूत ठरली. एकमेकांत गुंतलेली कथानकं, वेगवेगळी माणसं, त्यांच्या वेगळ्या कथा, आणि कोणत्यातरी घटनेने, प्रसंगाने जोडली गेलेली त्यांची आयुष्य, जी कदाचित एरवी कधीच जोडली जाणं शक्य नाही. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांत घडलेले पुढे-मागे मांडणी असलेले प्रसंग.. आणि अतिशय प्रभावी मध्यवर्ती कल्पना. दिग्दर्शकाला काय पोहचवायचं आहे हे जेव्हा त्याला स्वतःला ५००% स्पष्टपणे माहित असतं तेव्हाच अशी मांडणी करण्याचं तो धाडस करु शकतो. नंतर आलेले triology of death मधले२००३ सालचा '21 gram' आणि २००६ मधला, 'Babel', हे चित्रपटही मांडणीच्या दृष्टीने 'amores perros' सारखे. अर्थात triology असल्यांमुळे मध्यवर्ती कल्पनेसोबतच मांडणीतील सारखेपणाही गरजेचा ठरला असावा. पण हे तिन्ही चित्रपट खिळवून ठेवणारे.. हृदयात काहीतरी दाटून आलंय असं वाटायला लावणारे ठरले हे निश्चित. 'amores perros' मधली डॉग फाइट, '21 gram' मधला गोळीबाराचा प्रसंग, 'Babel' मध्ये वाळवंटात अडकलेल्या नॅनीची घालमेल.. असे काही प्रसंग आहेत जे अजून मनात घर करुन आहेत.
(मांडणीच्या दृष्टीने क्लिष्टता असणारे, किंवा सुरीअलिझम वाले चित्रपट खर्‍या अर्थाने दिग्दर्शकाचे चित्रपट ठरतात असं मला वाटतं. अशा चित्रपटांमध्ये शक्यतो कोणाची भूमिका वठली नाही असं होत नाही. म्हणजे अशा चित्रपटांचा कलाकारांविषयी दृष्टीकोन असा वाटतो की, तुम्ही वाईट अ‍ॅक्टींग करुच शकत नाही. तुम्ही भूमिका ही चांगलीच केली पाहिजे. दिग्दर्शक इतर कोणते एक्स्क्युजेस मान्यच नाही करणार..आणि Iñárrituचे सगळे चित्रपट "चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे" हे दाखवून देणारे आहेत.)
जरी त्याची triology of death २००६ सालच्या 'Babel' पर्यंतच असली तरी पुढच्या दोन्ही चित्रपटांमध्ये नायकाचा मृत्यू आणि दु:खाचे विभ्रम (की विभ्रमांचे दु:ख?) या दोन्ही कल्पना आहेतच. आणि त्याचा यंदा ऑस्कर च्या यादीत सर्वात आघाडीवर असलेला, "Birdman or (The Unexpected Virtue of Ignorance)" हा चित्रपट.. ज्या चित्रपटामुळे त्याच्याविषयी लिहिलंच पाहिजे यावर शिक्कामोर्तब झालं. Birdman ही कथा आहे एका सुपरहिरोची.. एकेकाळी सुपरहीरो असलेला नायक, कालांतराने कामाला पारखा होतो आणि एका नाटकाद्वारे स्वतःला अभिनेता-दिग्दर्शक म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. पण तुलनेने साधी वाटणारी ही कथा प्रेक्षकांना पूर्णवेळ खिळवून ठेवते. मोजक्याच मोठ्याच्या मोठ्या शॉटस् मध्ये केलेलं चित्रिकरण, पार्श्वसंगीतात मुख्यत्वे ड्रमचा केलेला वापर, नायकाचं त्याच्या भोवतालच्या लोकांच्या नजरेतून जाणवणारं वास्तव आणि त्याच्या स्वतःच्या मनात असलेली त्याची 'लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा, त्याची मुलगी, सहकारी, वेगळी झालेली बायको, अधूनमधून भेटणारे चाहते, बरे वाईट समिक्षक या सगळ्यांचीच गुंफण इतकी उत्तम झाली आहे की चित्रपटाला इतकी नामांकनं मिळाली नसती तरच नवल. आणि चित्रपटाचा सुरीअलिस्टीक शेवट हा माझा वैयक्तिक आवडता भाग. त्याविषयीची वेगवेगळी मतं नेटवर सर्वत्र वाचता येतीलच.
जरी तो त्याच्या पहिल्या चित्रपटापासून (म्हणजे पहिल्या फुल्ल लेंग्थ चित्रपटापासून) 'बेस्ट फॉरेन लॅग्युअज फिल्म' च्या कॅटेगरीत नामांकन मिळवत असला तरी, यंदा त्यांचं नामांकन अमेरीकेतूनच असल्यामुळे त्याला ऑस्कर मिळण्याची शक्यता वाढली आहे हे नक्की. (या आधीचे चित्रपट अमेरीकेत बनले असते तर एव्हाना नक्कीच त्याच्या नावावर ऑस्कर जमा झाला असता.) त्याच्या स्पर्धेत असणारा "The Grand Budapest Hotel" हा चित्रपटही काही कमी नाहिये. एखादी गोष्ट चांगली कशी सांगावी याचं उत्तम उदाहरण आहे. पण Iñárritu सोबत इतक्या वर्षांचं असलेलं प्रेक्षकाचं नातं, त्याच्या सर्वंच चित्रपटांमध्ये त्याने केलेली उत्तम कामगिरी, आणि एकूणच कॉमेडी पेक्षा माणसाच्या मनातल्या खेळांकडे असलेली ओढ यामुळे माझं पारडं तरी Iñárritu कडेच झुकतय..
त्याला यंदाचा ऑस्कर मिळाला तर तो नक्कीच The Expected Virtue Of Excellence समजता येईल.. Happy

(With Iñárritu in leading race, the oscar ceremony this year is a must watch and with Neil Patrick Harris hosting the show, I wouldnt miss it for the world.. Countdown has already started.. fingers crossed.. Go Iñárritu...! Best Wishes...)

--------------------------------------------------------------------------------------------------------
http://merakuchhsaman.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा पण लेख छान आहे . इथे एक ऑस्कर चा बाफ आहे तिथे लिंक द्या म्हणजे अधिक लोक्स वाचतील. तुमचे लेख वाचले कि आपल्याला बी ग्रेड अ‍ॅक्षन मूव्हीजच का आवडतात नैतर उलफत्तु कॉमेड्या/ स्पेस पट असे वाटून इन्फिरीअररिटी कॉप्लेक्ष येतो.

थॅक्स अमा.. Happy त्या बाफवर दिली लिंक.. सूचनेबद्दल धन्यवाद..

Lol कॉम्लेक्ष कसला.. आपापली आवड..! कधी कधी मलाही माझ्या विचित्र आवडींबद्दल कॉम्ल्पेक्स येतो.. Lol Wink

छान लिहिलंय. अ‍ॅलेहँद्रो बद्दल खूप आधीपासून ऐकून होतो. बर्डमॅनचे प्रोमो बघता क्षणीच प्रचंड आवडले होते पण अजून मनासारखा मोकळा वेळ न मिळाल्याने सिनेमा बघायचा योग जुळून आला नाही.

ग्रँड बुडापेस्ट हॉटेल कॉमेडी ?? Uhoh

एड नॉर्टन अभिनित दोन्ही सिनेमे आपापल्या परीने जिंकले पण त्याचा पुरस्कार मात्रं हुकला.

हायझेनबर्ग,
धन्यवाद.. Happy

हो.. ग्रँड बुडापेस्ट चा जॉनर कॉमेडी, ड्रामा, अ‍ॅडव्हेंचर.. Happy

एड नॉर्टन अभिनित दोन्ही सिनेमे आपापल्या परीने जिंकले पण त्याचा पुरस्कार मात्रं हुकला>> हो ना.. Sad