ग्राहका, फसवणुकीच्या "आयडीयांपासून" सावधान...!!!

Submitted by निमिष_सोनार on 10 November, 2010 - 02:02

खाली दिलेला प्रसंग नीट वाचा म्हणजे कदाचीत हे पुन्हा दुसर्‍या कुणासोबर घडणार नाही:


"माझा आयडियाचा प्रीपेड मोबाईल तीन वर्षांपासून आहे आणि तेही व्यवस्थित कागदपत्रके देवून घेतलेला आहे.
अचानक मला सप्टेंबर २०१० ला एस एम एस आला की कागदपत्रके जमा करा.
४ ऑक्टोबरला कागदपत्रके पूर्ण पणे भरून, तसेच फोटो देवूनही दसर्‍याला १७ ऑक्टॉबरला मोबाईल चे कॉल बंद झाले.
१६ तारखेला परत एस एम एस आला होता की कागदपत्रके परत जमा करा.
दसर्‍याला १७ ऑक्टॉबरला त्रास सहन करावा लागला तो वेगळाच.
ऑफिसचे कॉल महत्त्वाचे असल्या कारणाने मी दुसर्‍या कंपनीचा नंबर घेतला.
मग काही दिवस आयडीयाचे ऑफिस बंद होते.
मग मी एक दिवशी पुन्हा कागदपत्रके दिली कारण जुना नंबर अनेकांना दिला सल्याने तो बंद करणे योग्य वाटले नाही.
पूर्वीचा नंबर चालू झाला. मी कस्टमर केअरला विचारून खात्री सुद्धा केली, की माझा अ‍ॅड्रेस वगैरे सर्व पोहोचले आहे का.
ते हो म्हणाले.
पुन्हा दिवाळीच्या आदल्या दिवशी एसएमेस आला की कागदपत्रके अपूर्ण आहेत, ते द्या अन्यथा सेवा बंद करण्यात येईल.
मी कॉल केल्यावर ते म्हणाले की कागदपत्रके पुन्हा जमा करावी लागतील.
त्याचे कारण विचारले असता त्यांनी कारण सांगितले नाही.
फक्त पुन्हा कागदपत्रके पाहिजेतच असे सांगितले.
मग मी माझा प्रीपेड बॅलंन्स दुसर्‍या आयडीया नंबरवर ट्रान्सफर करण्याची शक्कल शोधली आणि आता पुन्हा कागदपत्रके जमा न करण्याचा व माझा नंबर अनिच्छेने कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला.
एका दिवसाला फक्त तीन वेळा ५० रुपये असे १५० रुपयेच फक्त ट्रान्स्फर होवु शकतात. ते मी केले.
पण अजून बॅलन्स शिल्लक होता.
पण त्यांना हे कळले असावे, तर त्यांनी ४८ ऐवजी २४ तासातच सेवा बंद कली.
आता बोला!!
माझे सगळे उपाय करून झाले. ते आयडीयावाले जुमानले नाहीत.
म्हणजे बॅलन्स खाण्याचा हा प्रकार आहे."

महत्त्वाची माहिती:
आयडीया टू आयडीया उरलेली बॅलन्स आपणांस दुसर्‍या आयडीया वर ट्रान्सफर करायचा असल्यास असा करा:
GIVE मोबाईल नंबर 50 असा एसएमएस करा ५५५६७ वर.
तीन वेळा.

अशा मुळे खालील प्रश्न मनात येतातः
ही कागदपत्रके सेंटरच्या कर्मचार्‍यांकडून गहाळ होत आहेत का?
विविध सेंटर मधून ती कंपनीच्या मेन ऑफिसमध्ये पोहोचतच नाहीत का?
नाहीतर पोहोचल्यावरही ते हेतुपूर्वक त्रास देतात का?
तसे असेल तर त्रास देण्यामागचा हेतू काय?
मोबाईल मध्ये खुप बॅलन्स शिल्लक असेल आणि त्या ग्राहका कडून तो संपत नसेल तर मुद्दाम बॅलंस खाण्यासाठी तर ते असे ते करत नसावेत ना?
कुठे जातात ही न पोहोचलेली किंवा "अपूर्ण" कागदपत्रके?

"एक संशय असाही येतोय की ऑडीट मध्ये दाखवण्यासाठी त्यांच्याकडे ज्या मोबाईलधारकांची कागदपत्रके नाहीत, त्यांच्या साठी सुद्धा ते लोक आपलीच परत परत मागवलेली कागदपत्रके वापरत असतील?
म्हणजे, आपल्याच तीन चार वेळा दिलेल्या त्याच त्याच कागद पत्रांचा उपयोग वेगवेगळया नंबरसाठी तर ते वापरत नाही ना?
तसे असेल तर हा खुपच गंभीर विषय आहे.
हे कुठेतरी थांबले पाहिजे"

गुलमोहर: 

मलाही कागदपत्रे जमा करायला सांगितलं आहे. ऑडीट सुरु आहे म्हणे. अरे फोन घेताना एकदा दिली ना? मग ती परत कशाला त्रास? Angry

बघा विचार करा.
कागदपत्रके दिल्यावर मोबाईल चालू होईल.
पण, परत काही दिवसांनी तसाच मेसेज येईल.
आणि पुन्हा मोबाईल बंद होईल.
त्यापेक्षा आताच हा नंबर बंद करा आणि दुसरा घ्या.
कारण, माझ्या सारखा अनुभव किमान पंधरा वीस जणांना आलेला आहे.

IDEA Cellular Ltd - Customer Oprs [9822012345@idea.adityabirla.com] इथे तक्रार करा. महत्वाचे म्हणजे कोणतिही कागदपत्र जमा करताना या पुढे कागदपत्रे मिळाल्याची पोच पावती घ्या.

मी वर दिलेल्या ईमेल वर तक्रार केली आहे.
बघूया काय होते ते.
नंबर तर मी पुन्हा चालू करणारच नाही.
पण, उरलेला बॅलन्स कशाला सोडायचा....
तो कुठे ते ओळखीच्या मोबाईलवर ट्रान्सफर करून देतात का ते पहायचे.

"माझा आयडियाचा प्रीपेड मोबाईल तीन वर्षांपासून आहे आणि तेही व्यवस्थित कागदपत्रके देवून घेतलेला आहे>>> माझाही.. मलापण असाच मेसेज आला आहे....

मोबाईल मध्ये खुप बॅलन्स शिल्लक असेल आणि त्या ग्राहका कडून तो संपत नसेल तर मुद्दाम बॅलंस खाण्यासाठी तर ते असे ते करत नसावेत ना?>>> माहित नाही, कारण माझ्या सेल मधे कधिच जास्त बॅलन्स नसतो... मेसेज आला त्यावेळी फक्त ५० रु होता.. मला कालच मेसेज आल्याने, अजुन्तरि पुढे काय करावं हे ठरवलेलं नाहिये.. वर दिलेल्या मेल आय्डींना मेल करुन बघते

"एक संशय असाही येतोय की ऑडीट मध्ये दाखवण्यासाठी त्यांच्याकडे ज्या मोबाईलधारकांची कागदपत्रके नाहीत, त्यांच्या साठी सुद्धा ते लोक आपलीच परत परत मागवलेली कागदपत्रके वापरत असतील?
म्हणजे, आपल्याच तीन चार वेळा दिलेल्या त्याच त्याच कागद पत्रांचा उपयोग वेगवेगळया नंबरसाठी तर ते वापरत नाही ना?>>>> सरळ दुसरं सिम घ्यावं असा विचार चालु आहे

लोकहो बी एस एन एल घ्या . आपल्या सरकारच खातं आहे.. ते असले उद्योग करीत नाहीत. सुरुवातीसच हडसून खडसून पक्की कागदपत्रे घेतात . पुन्हा त्रास देत नाहीत...

बी एस एन एल ची सेवा खूप चांगली आहे. इतर कोणत्याही मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर पेक्षा बी एस एन एल चे नेटवर्क चास्त पॉवरफुल व रिलाएबल आहे. त्यांच्याकडे अजिबात फसवत नाहीत.

कुठेही प्रमाणपत्रांच्या प्रती देताना त्या कशासाठी देतोय हे त्यावर स्पष्टपणे नोंदवावे. उदा: अमुक एका मोबाईल क्रमांकाच्या पडताळणीसाठी. किंवा अमुक एका म्युच्युअल फंड अ‍ॅप्लिकेशनसोबत. म्हणजे त्याचा गैरवापर व्हायची शक्यता कमी.

भरत मयेकरांची सूचना एकदम बरोबर आहे.
असा विचार कधी केलाच नव्हता.
धन्यवाद.
चला, या निमित्ताने का होईना, विविध मुद्दे बाहेर निघताहेत आणि सगळे जण सावध होताहेत, हे छान.

मी चैत्रगंधा ने सुचवलेला आयडी- grievance.mh@idea.adityabirla.com
वर तक्रार केली तर उत्तर काय आले माहितेय?
"पुन्हा (चौथ्यांदा) डोक्युमेंट आणि फोटो सबमीट करा"
म्हणजे
"करावीच लागतील."

मी उत्तर दिले आहे, की "जोपर्यंत मी या आधी ची तीन वेळा सबमीट केलेली डॉक्युमेंट्स आणि माझे तीन कलर फोटो तुम्ही मला माझ्या पत्त्यावर पोस्टाने/कुरियर परत करत नाहीत तोपर्यंत मी पुन्हा चौथ्यांदा डॉक्युमेंट सबमीट कर्णार नाही.
आणि ग्राहक मंचाकडे जरूर तक्रार करेन आणि न्यूज चॅनेल्स कडे तक्रार करणार."

बघूया काय होते ते!!
मात्र, काहीतरी गौडबंगाल आहे हे नक्की.
डॉक्युमेंट्स कुठेतरी गहाळ होताहेत अथवा वापरली जाताहेत हे नक्की...
ग्राहक मंचाचा फोन किंवा ईमेल किंवा वेबसाईट कुणाला माहिती आहे का?

निमिष, मध्यंतरी सकाळ वृत्तपत्रात ग्राहक तक्रार निवारण मंचाविषयी माहिती देत होते. ठाण्यातल्या त्यांच्या शाखेचा पत्ताही देत होते. तुम्ही कुठे असता?
सकाळच्या वेबसाईटवर काही माहिती मिळते का ते पहा.

निमीष,

आधी त्या त्या कंपनीच्या कस्टमर केअर कडे तक्रार नोंदवुन समाधानकारक सेवा, प्रतिसाद न मिळाल्यास ग्राहक मंचाकडे गेल्यास फायदा होतो. अन्यथा सदर कंपनी यांनी आमच्याकडे ग्रिव्हेन्स नोंदवलाच नाही असे म्हणुन ग्राहक मंचाकडुन सुटका करुन घेते. तेव्हा त्या त्या सर्व्हीस प्रोव्हायडर कडे ( लेखी ) इमेल ने ग्रिव्हेन्स नोंदवा. त्यांच्या उत्तर द्यायला फोन येईल तेव्हा लेखीच उत्तर मागा. कितीही समाधानकारक उत्तर असले तरी ते लेखी मिळाले पाहिजे असा आग्रह धरा. मग असे लेखी उत्तर न मिळाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करता येईल.

कोणत्याही परिस्थितीत गोड बोला. भांडण करु नका. अन्यथा केस कमजोर होते.

क्लायमॅक्स ...

मी ग्रीव्हन्स सेल (grievance.mh@idea.adityabirla.com) ला पुढे ईमेल द्वारे उत्तर दिले की :

"जर का चार तासांत मोबाईल चालू झाला नाही तर मी न्यूज चॅनेल कडे सांगेन. तेथे माझ्या ओळखी आहेत.
आणि चौथ्यांदा मी डोक्युमेंट सबमीट करण्या आधी माझी या आधीची तीन वेळा दिलेली डॉक्स कुरियरने परत पाठवा.
आणि मी ग्राहक मंचा कडे चाललो आहे."

...खरेच चार तासांच्या आत नंबर सुरु झाला आणि त्यांनी कबूल केले की तुमची कागदपत्रके आमचे कडे आहेत.

पण....

मग या आधी जे काय होते ते कशासाठी होते हे कळायला मार्ग नाही.

आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण या चर्चेत भाग घेवून विविध अनुभव शेअर केले, त्या अनुषंगाने विविध उपयुक्त माहिती एकमेकांना कळली.

सध्यातरी नंबर चालू आहे.

पुढे बघू या...