गणेशोत्सव २०२५ शशक

शशक २ - शहाणा नवरा - माबो वाचक

Submitted by माबो वाचक on 1 September, 2025 - 10:21

सीमा आरामखुर्चीत रेलून बसली होती. मोबाईलवर ती मायबोलीवरच्या शतशब्दकथा स्पर्धेचे नियम वाचत होती. इतक्यात तिचा नवरा, रमेश, बाजारातून भाजी घेऊन आला. त्यालाही कळावे म्हणून तिने मोठ्याने वाचायला सुरुवात केली.
मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील
हे ऐकून रमेशने सीमाचे पाय धरले. तो गयावया करत म्हणाला, “चूक झाली. यावेळेस माफ कर. पुन्हा असे होणार नाही.”
“अरे रमेश, माझे पाय सोड पाहू आधी,” सीमा त्राग्याने म्हणाली. “मी तुझ्याशी बोलत नव्हते, मोबाईल मध्ये वाचत होते.”
“ओह,” रमेश ओशाळून म्हणाला.

विषय: 

शशक २ - मक्याची चूक - माबो वाचक

Submitted by माबो वाचक on 1 September, 2025 - 03:40

कॉलेजच्या कट्ट्यावर बसून, तोंडाचा चंबू करून संगिता सेल्फी काढत होती. इतक्यात तिचा प्रियकर मकरंद तिथे पोहचला.
अ ला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!” आल्याआल्याच संगीने मक्याला झाडला.
“हा अ कोण आहे? आणि त्याला वाटण्याचा काय संबंध?” मक्याचा बावळट चेहरा आणखीनच बावळट झाला.
“अ नाही अी”
“आता ही अी कोण? अ ची प्रेयसी आहे का? नक्की कोणाबद्दल बोलतीयेस तू?”
“आज्या अद्दल”
“कोण हे आज्या अद्दल? मला फक्त अजय-अतूल माहिती आहेत.”
“अरे आकडा .....”
“कोणता आकडा? आकङे सांगायला मी काय पप्पू मटकेवाला आहे का?”

विषय: 

शशक १ - आवाहनं न जानामि - मॅगी

Submitted by मॅगी on 29 August, 2025 - 02:52

"सरकारी प्रयोग यशस्वी झाला, बट वी फ*ड अप प्रिया!"

आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिले.

"आम्ही पेशीपासून जीव तयार केला! होमो फ्युचरियन. आमची सगळ्यात मोठी जीत आणि हारसुद्धा... त्यांच्यात अमाप बुद्धी, राक्षसी ताकद आहे. थंडी, उष्णता, रेडिएशन, स्फोटके, रोग या सगळ्यापासून ते सुरक्षित आहेत. ते भावनाशून्य आहेत, त्यांची प्रजाती टिकेल हे एकच उद्दिष्ट.

आणि सगळ्यात मोठी चूक... ते अलैंगिक असून पुनरुत्पादन करतात. मूल वाढवण्यात माणसाचं आयुष्य जातं म्हणून त्यांना वाढायला फक्त आठवडा दिलाय. त्यांची संख्या वाढतच चाललीय.

शशक १ - आंतरग्रहीय - मामी

Submitted by मामी on 29 August, 2025 - 02:28

आधी या कथेची पार्श्वभूमी इथे वाचावी म्हणजे संदर्भ जुळेल.

तर पुढे चालू ...
****************************************************************************************************

ज्योत्स्नाबाईं शुद्धीवर आल्या तेव्हा स्क्रीनसमोर बसून तो हिरवा प्राणी जांभळ्या रंगाचे पेय फुर्रफुर्र आवाज करत पीत होता. ज्योत्स्नाबाई घाबरल्याच. बेशुद्धीचा दुसरा घाणा काढण्याच्या बेतात असतानाच प्राण्याच्या अँटेना त्यांच्याकडे वळल्या आणि तो चटकन उठला.

विषय: 
Subscribe to RSS - गणेशोत्सव २०२५ शशक