Submitted by माबो वाचक on 1 September, 2025 - 10:21
सीमा आरामखुर्चीत रेलून बसली होती. मोबाईलवर ती मायबोलीवरच्या शतशब्दकथा स्पर्धेचे नियम वाचत होती. इतक्यात तिचा नवरा, रमेश, बाजारातून भाजी घेऊन आला. त्यालाही कळावे म्हणून तिने मोठ्याने वाचायला सुरुवात केली.
“मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील”
हे ऐकून रमेशने सीमाचे पाय धरले. तो गयावया करत म्हणाला, “चूक झाली. यावेळेस माफ कर. पुन्हा असे होणार नाही.”
“अरे रमेश, माझे पाय सोड पाहू आधी,” सीमा त्राग्याने म्हणाली. “मी तुझ्याशी बोलत नव्हते, मोबाईल मध्ये वाचत होते.”
“ओह,” रमेश ओशाळून म्हणाला.
“पण तू कशाबद्दल माफी मागितलीस?” रमेशकडे संशयाने पाहात सीमा म्हणाली.
“सीमा, तुझ्या मते दिवसाला माझ्याकडून हजार चूका होतात. मला वाटले, त्यातलीच एखादी असेल.”
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुठे मिळतात असे नवरे ??
कुठे मिळतात असे नवरे ??
कोणते व्रत करावे लागते ???
एक जन्म व्रत करावे की आधीच्या ५० जन्माची पुण्याई लागते ??
प्रसंगावधानता की खरोखरच तो
प्रसंगावधानता की खरोखरच तो भाबडा आहे!
छान शेवट!
धनवंती , विचार करा
(No subject)
(No subject)
हाहाहा
हाहाहा
कल्पक शशक
मस्त. माबो संयोजक अति... हेही
मस्त. माबो संयोजक अति... हेही बसेल यात. (शहाणा पण या प्रसंगामुळे वैतागलेला नवरा)
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
कोणते व्रत करावे लागते ??? >>>> मायबोली देवीचे व्रत करावे लागते. महिन्यातून एक नवीन धागा काढावा. दिवसाला दोन कमेंटी टाकाव्या. राजकीय धाग्यांवर प्रतिसादांची धुळवड खेळावी. गटग ला खाऊ घेऊन हजेरी लावावी. वर्षाविहाराला दणकून रेन डान्स करावा. तेंव्हा कुठे पुढच्या जन्मी असे नवरे मिळतात. फार खडतर व्रत आहे.
धनवन्ती, हे प्रसंगावधान आहे
धनवन्ती, हे प्रसंगावधान आहे माझ्या मते. त्यामुळे व्रत करण्यापूर्वी पुन्हा विचार करा