शशक २ - मक्याची चूक - माबो वाचक

Submitted by माबो वाचक on 1 September, 2025 - 03:40

कॉलेजच्या कट्ट्यावर बसून, तोंडाचा चंबू करून संगिता सेल्फी काढत होती. इतक्यात तिचा प्रियकर मकरंद तिथे पोहचला.
अ ला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!” आल्याआल्याच संगीने मक्याला झाडला.
“हा अ कोण आहे? आणि त्याला वाटण्याचा काय संबंध?” मक्याचा बावळट चेहरा आणखीनच बावळट झाला.
“अ नाही अी”
“आता ही अी कोण? अ ची प्रेयसी आहे का? नक्की कोणाबद्दल बोलतीयेस तू?”
“आज्या अद्दल”
“कोण हे आज्या अद्दल? मला फक्त अजय-अतूल माहिती आहेत.”
“अरे आकडा .....”
“कोणता आकडा? आकङे सांगायला मी काय पप्पू मटकेवाला आहे का?”
“अरे गाढवा मी मी मी. माझ्याबद्दल बोलतीय मी. शेवटी केलीसच ना माझी लिपस्टिक खराब. आता मसणात जा, माकडा.”

(टीप : पुलंच्या केशर अडगावकर वरून प्रेरित)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

हो माझा पण गोंधळ झाला आहे. ती वाईची ओठाला ओठ न लावता बोलणारी. आता पुन्हा बघावे लागणा.
केशर मडगावकर म्हणजे जी त्याला हॉटेलात नेऊन कहाणी सांगते,

'हे सगळं वाक्य ती ओठाला ओठ न लावता म्हणाली'
--मोठा पॉज--
'स्वत:च्या'
हे 'असा मी असामी' मधल्या कुमार गिरीशच्या मुख्याध्यापिका सरोज खरे ह्यांच्या संदर्भातील आहे.

संदर्भात गफलत झाली की काय? बरेच दिवस झालेत वाचून, त्यामुळे मलाही आठवत नाही.
केशवकूल, आपण जर पाहिले तर कृपया सांगा, मग मी दुरुस्त करेन. माझ्याकडे पुस्तक उपलब्ध नाही. धन्यवाद.
सर्वांचे आभार.

पु.ल. संदर्भ सपेशालिस्ट फारएण्ड ह्यांना इथे‌ बोलवा बरं.

मला आठवतंय त्याप्रमाणे दोन्ही पात्र असा मी असामी मधील आहेत. केशर मडगावकर त्यांची ऑफिसमधील सहकारी असते आणि सरोज खरे (आपली) ही मुलाच्या शाळेची मुख्याध्यापिका.

ओठाला ओठ न लावता बोलणारी ‘आपली सरोज खरे‘.

पांढर्या व्हाईट्टपणाची कमाल करणारी, मधू खारकर बरोबर बिनसल्यावर “शेवटी ना, अध्यात्म हाच ना मार्ग खरा“ म्हणणारी केशर मडगावकर.

कधीकधी आपल्याला एखादी कल्पना नव्याने सुचते जिचा वापर आधी झालेला असू शकतो. तर कधी असेही असू शकते की आपल्या सबकॉन्शसमध्ये (अमूर्त मेंदू) ती गोष्ट दीर्घकाळापर्यंत राहीलेली असते पण मूर्त मेंदू विसरलेला असतो.

अवांतर
मी माझ्या लहानपणी हे एक बघितले होते. ह्यात श्रीकांत मोघे, वसंतराव देशपांडे, गणेश सोलंकी वगैरेंनी भाग घेतला होता. त्यात बरीच निरनिराळी स्कीटस होती . श्रीकांत मोघे ह्यांचे शाळेतला मास्तर, जे पुलंची ओळख वसंतराव पूल देशपांडे अशी करून देतात, त्यांचाच गावकडला शिरपा जो बॉलीवूड चे गाणे गाऊन आणि नाच करून दाखवतो, गणेश सोलंकीची तपकिरीची जाहिरात एक वाक्य हिंदीत आणि तेच व्वाक्य पुन्हां मराठीत डाव्या नाकपुडीत, बाये नाकपुडीमे, आणि सगळ्यात धमाल म्हणजे दोन लहान मुलांचा संवाद, मोठा भाऊ धाकट्या भावाला दारू म्हणजे काय ते समजाऊन सांगतो, जी प्याल्यावर माणूस वाटेल तसा बरळतो, म्हणजे आपले बाबा काय रे? किंवा आता मात्र तुझ्यापुढे हातच टेकले म्हणत हात टेकणारा लहान भाऊ. कुणाला आठवतंय का ?
आज ह्या प्रसंगाची आठवण करून दिलित, म्हणून आभार!

केशवकूल, ते वाऱ्यावरची वरात. त्यात श्रीकांत मोघेंचा 'दिल‌ देके देखो, मुझे मत रोको' असा धमाल डान्स, 'दरू म्हणजे काय रे भाऊ' संवाद वगैरे आहे.

एका रविवारची कहाणी आणि वाऱ्यावरची वरात असे दोन‌ कार्यक्रम आहेत. मी उद्या शोधून दोन्ही लिंक देणे.
आता अवांतर थांबवते.

पु.ल. संदर्भ सपेशालिस्ट फारएण्ड ह्यांना इथे‌ बोलवा बरं. >>> Happy Happy

मला आठवतंय त्याप्रमाणे दोन्ही पात्र असा मी असामी मधील आहेत. केशर मडगावकर त्यांची ऑफिसमधील सहकारी असते आणि सरोज खरे (आपली) ही मुलाच्या शाळेची मुख्याध्यापिका. >>> हो Happy

कथेत नाव केशर "अडगावकर" लिहीले आहे ते बहुधा तिला म म्हणायचे नसल्याने असेल.

केशर मडगावकर म्हणजे जी त्याला हॉटेलात नेऊन कहाणी सांगते, >>> केकू - ते दुसर्‍या एका पुस्तकात आहे. नक्की कोणत्या ते आठवत नाही.

कथेत नाव केशर "अडगावकर" लिहीले आहे ते बहुधा तिला म म्हणायचे नसल्याने असेल. >>>> हो, बरोबर
पुलंच्याच कोणत्यातरी पुस्तकात केशर लिपस्टिक लावून स्वतःच अडगावकर म्हणते असे वाचल्याचे अंधुक स्मरते आहे. पण खात्री नाही.

सरोज खरे 'नअस्कार' असं म्हणते. लिपस्टिक लावून इंग्रजी बोलणं सोपं असलं तरी मराठी कठीण जात असावं, अशी टिप्पणी पुढे आहे.
त्याच पुस्तकात पुढे अक्षरी मडगवकर, उच्चारी अडगावकर असा उल्लेख आहे.
((आता खरंच थांबते))

फा
ती पहिली लिंक पहा
५०.३० मिनिटांनी पुढे . केशर मडगावकर चा किस्सा .
मी पण अवांतर थांबवतो.

त्याच पुस्तकात पुढे अक्षरी मडगवकर, उच्चारी अडगावकर असा उल्लेख आहे. >>>>>> धन्यवाद. अच्छा म्हणजे मग माझा संदर्भ बरोबर आहे पण आठवण थोडी चुकीची आहे.
आणि यात अवांतर काय आहे? कथेशी निगडितच आहे चर्चा.

वाऱ्यावरची वरात - Full Marathi Comedy Natak | Chandrakant Kale, Arun Nalavade
https://www.youtube.com/watch?v=eEQErGp6080
ह्यात सगळी वाऱ्यावरची वरात आहे.
आणि ही दास्तर खुद्द पुलची वरात
https://www.youtube.com/watch?v=dj5SFjPpwRo
हहपुवा
कलेक्टरस आयटेम्स.

Pages