लेकीचा बर्थ डे होता.
एका आठवड्यात चार पाच वेगवेगळे ऑप्शन्स सांगून झाले कधी आई मला बटरफ्लाय चा केक तर कधी मिनी माउस चा... शेवटी एकेका प्रिन्सेस ची नावे घेता घेता गाडी आली मला मरमेड चा केक हवा आहे.
आणि अनायसे समोर एक नवी कोरी मरमेड बार्बी मिळाली. मग काय आपल्या बेकींग क्विन लाजो कडून स्फूर्ती घेउन मग मीही ह्या वेळी घरी केक करायचे ठरवले.
साधारण डोक्यात आयडीची कल्पना मांडली. साहीत्याची जमवाजमव केली. वेगवेगळ्या आकाराचे बेसीक केक बेक करून घेतले. मरमेड आयलंड आणी पाणी असे काहीसे करायचे होते.
'टिंकरबेल्स गार्डन' बर्थडे केक
मागच्या महिन्यात लेकीचा ४था वाढदिवस झाला. त्यानिमित्त घरी छोटसच गेट टुगेदर केलं होतं.
सध्या लेक फेअरीज आणि प्रिन्सेसेस या वयात असल्यामुळे 'टिंकरबेल' ची थीम घेऊन हा केक बनवला होता. लेक जाम खुष
तुम्हाला पण आवडला का सांगा
बेसिक शेप्स:
संपूर्ण डेकोरेटेड केक:
१.
इस्टरसाठी नेस्ट अँड एग्ज केक
यंदा लेकीच डेकेअर मधल शेवटचं इस्टर सेलेब्रेशन होतं म्हणुन मी हा केक करुन दिला होता.
मुलं आणि स्टाफ जाम खुष कारण भरपुर इस्टर एग्ज तर मिळालीच पण सोबत आफ्टरनून टी साठी मस्त व्हॅनिला - चॉकलेट केक पण ... अशी डब्बल मजा
बघा तुम्हाला पण आवडतोय का इस्टर केक
-----------------
बेस:
बेसिक नेस्ट:
"बस" केक
माझ्या लेकीच्या डेकेअर मधे हा आठवडा "चिल्ड्रन्स वीक" म्हणुन साजरा होतोय. या निमित्ताने बर्याच धमाल धमाल अॅक्टिव्हीटीज, बार्बेक्यु वगैरे ऑर्गनाईज केलेत.
आज लेकीच्या ग्रुपला 'बस वॉश' दाखवायला घेऊन गेले होते. इथल्या लोकल बस ट्रान्सपोर्टच्या बस मधुन मुलांना बस डेपो मधे नेले आणि मग बस ऑटोमॅटीकली ऑपरेटेड बस वॉशिंग बे मधे नेऊन उभी केली. मुलं आत बसलेली आणि बाहेरुन बस वॉश होत्येय.. नुसता कल्ला केला असणार पोरांनी
आता आफ्टरनून टी साठी हा मी केलेला "बस" केक हाणतील
"
हे मी केलेले काही केक्स व केक डेकोरेशन्स
*****************************************
हा लेकीच्या दुसर्या वाढदिवसाचा 'लॉली क्लाऊन'
****
हे छोटे क्लाऊन्स:
*****
हा दुसर्या वाढदिवसाचाच घरच्यासाठी केलेला 'लॉली मॉन्स्टर केक'