Mermaid केक (आयसिंग आणि डेकोरेशन )

Submitted by डॅफोडिल्स on 21 January, 2014 - 11:55

लेकीचा बर्थ डे होता.
एका आठवड्यात चार पाच वेगवेगळे ऑप्शन्स सांगून झाले कधी आई मला बटरफ्लाय चा केक तर कधी मिनी माउस चा... शेवटी एकेका प्रिन्सेस ची नावे घेता घेता गाडी आली मला मरमेड चा केक हवा आहे.

आणि अनायसे समोर एक नवी कोरी मरमेड बार्बी मिळाली. मग काय आपल्या बेकींग क्विन लाजो कडून स्फूर्ती घेउन मग मीही ह्या वेळी घरी केक करायचे ठरवले.

साधारण डोक्यात आयडीची कल्पना मांडली. साहीत्याची जमवाजमव केली. वेगवेगळ्या आकाराचे बेसीक केक बेक करून घेतले. मरमेड आयलंड आणी पाणी असे काहीसे करायचे होते.

म्हणून चॉकलेट आणि वॅनिला आयसिंग सोबत निळे आयसिंग. मरमेड सोबत मोती चांगले दिसतील म्हणून पर्ल कॅन्डी आणि केक वर किंवा इतर पाण्यात टाकायला फिश च्या आकाराच्या छोट्या स्प्रिंकलर कॅन्डी. पाणी कसे दाखवायचे ? मग जेली ची आयडीया सुचली.. एका भांड्यात जेली सेट करून घेतली.

cakesteps.jpg

केक ला बेस म्हणून एक मोठ्ठा चौरस आकाराचा ट्रे घेऊन त्याला अल्युमिनियम फॉइल लावली. मग दोन्ही मोठे केक मधोमध कापून त्याला व्हिप क्रीम लाऊन एकावर एक ठेवले. खालच्या गोल केक ला निळे आयसिंग केले वरच्या केक चा ला मरमेड ला बसवण्यासाठी त्रिकोणी खाच करून जागा करून घेतली. त्याचा रॉक दिसेल असा चोकलेटी आयसिंग करून आकार निट केला.

मग हिरव्या रंगाच्या आयसिंग ने पाण वनस्पती वेली वगैरे काढले. निळ्या केक वर थोड्या थोड्या अंतरावर मोती लावले. ट्रे मध्ये रिकाम्या जागेत फिश च्या आकाराची स्प्रिम्कल्र्स टाकून त्यावर जेली सेट केली. आणि तरीही थोडी जागा उरली मग त्यात उरलेल्या केक चा चुरा करून समुद्राची वाळू असल्याचा भास निर्माण केला. नंतर ऐनवेळी सुचले की अरे आपल्याकडे शंखाच्या चॉकलेट मोल्ड आहेत मग ते चॉकलेट बनवून त्या वाळूवर ठेवले. फायनली सगळे आयसिंग करून झाल्यावर पाण्यात पाय सोडलेली मरमेड त्यावर बसवली हे सगळं प्रकरण केक कापे पर्यंत फ्रीज मध्ये ठेवले.

हि बघा छान दिसतेय ना ?

saancake1.jpg

पार्टी आधी दोन तास आयसिंग करायला सुरु केले होते. केक करताना खूप धाकधूक होती . वेळेत नाही झाला तर…. चांगला नाही दिसला तर… खूप गोड होईल का ? निट दिसेल का ? ३०-३५ जणांच्या पार्टीला पुरेल का ?वगैरे वगैरे… पण केक एकदम मस्त झाला होता त्याचा अगदी फन्ना उडवला बच्चे कंपनी एकदम खुश ! लेक ज्याला त्याला दाखवून सांगत होती … माझ्या मम्माने बनवला आहे केक. भरून पावले !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast

Mast

wow !!!

सिंडी हो गं खरच ! नेक्स्ट् टाईम नक्की. अजून बर्‍याच आयडीया होत्या. गोल्ड फिश पण लावायचे होते. अगदीच गिचमिड नको म्हणून लावलेच नाहीत. आणी मोत्यांसोबत शिपले काढायचे होते.. वेळ कमी पडला. फुले किंवा आणखी डिझाईन करायला आयसीम्ग चे रंग बनवा करा.. घाई होत होती म्हणून केलेच नाहीत.

बाकी तिकडनं सुद्धा खूप सांगून झालं असं कर तसं कर... त्यावर मी सांगुन टाकलं समुद्रात तसं नसतं डिझाईन वगैरे Wink माझं काम सोप्प भोवती शंखांची चॉकलेटस ठेउन दिली. त्याचा फोटो नाहीये.

वॉव! फारच मस्त दिसतंय हे प्रकरण.

पार्टीच्या आधी २ तास आयसिंग करायला घेतलंस? बापरे! मी अशावेळी मुंडी कापलेल्या कोंबडीसारखी घरभर किंचाळत फिरत असते. डोकं शांत ठेऊन आयसिंग करण्याची ताकद तुझ्यात आहे म्हणून तुला सलाम!

हो सीमा तु कुठेतरी फोटो पोस्ट केले होतेस ना ? मला सापडलेच नाहीत घाईत शोधले. मला अजून छान आयडीया मिळाली असती. Uhoh

डॅफो मस्तच.

>>पार्टीच्या आधी २ तास आयसिंग करायला घेतलंस? बापरे! मी अशावेळी मुंडी कापलेल्या कोंबडीसारखी घरभर किंचाळत फिरत असते. डोकं शांत ठेऊन आयसिंग करण्याची ताकद तुझ्यात आहे म्हणून तुला सलाम!>>
अगदी अगदी. Happy
+१००

सा. न. ______________/\________________

Pages