बर्थडे केक - २ - 'टिंकरबेल्स गार्डन'

Submitted by लाजो on 25 May, 2011 - 22:51

'टिंकरबेल्स गार्डन' बर्थडे केक

मागच्या महिन्यात लेकीचा ४था वाढदिवस झाला. त्यानिमित्त घरी छोटसच गेट टुगेदर केलं होतं.
सध्या लेक फेअरीज आणि प्रिन्सेसेस या वयात असल्यामुळे 'टिंकरबेल' ची थीम घेऊन हा केक बनवला होता. लेक जाम खुष Happy

तुम्हाला पण आवडला का सांगा Happy

बेसिक शेप्स:

संपूर्ण डेकोरेटेड केक:

१.

२.

३.

४.

५.

------------------------------

वेळेच्या आभावामुळे मधल्या स्टेप्सचे फोटो काढले गेले नाहित.
पुढच्या वेळेस स्टेप बाय स्टेप फोटो टाकेन Happy

गुलमोहर: 

नतमस्तक!!!
मला तुझी बेसिक केक ची कृती लिंक देच बरं! मी कधीही केक केला नाहीये त्या दृष्टीने सोपी दे!
(याआधीही हा प्रश्न मी विचारला आहे. पण करुन बघितला नाहीये अजुन. आता करणारच!)

लाजो, भलतीच हौशी आहेस तू! मला हे असलं काही या जन्मात तरी शक्य नाही !!

महेश मालंडकर, तुमच्या वाक्यात योग्य विरामचिन्हं टाका हो... अर्थ किती वेगळा होतोय... (गमतीने लिहिलंय, हलके घ्या Wink )

अमेझिंग!!!! हातात जादू आहे ग तुझ्या, लाजो. लेक खुश झाली नसती तरच नवल. आदितीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

महेश मालंडकर, तुमच्या वाक्यात योग्य विरामचिन्हं टाका हो... अर्थ किती वेगळा होतोय... (गमतीने लिहिलंय, हलके घ्या >>>>>> लले Biggrin मीही पहिल्यांदा वाचून दचकले. Proud

मस्त!! टिम्कर बेल पण घरीच बनवली आहे का??
रच्याकने, आदितीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!!!! Happy

ओह गॉड.. कसले एकेक भन्नाट केक्स बनवतेस गं तु!!!!

माझ्या लेकीने हा केक बघितला तर ती आयांची अदलाबदल करुया म्हणुन तुझ्या लेकीच्या मागे लागेल Happy

मस्तच Happy

तुझ्या हातात खरच जादू आहे... प्रत्येकाला एका कलेमध्ये मास्टरी असते ना तशी ह्यात तुझी... Happy
ते काल मशरुम्स आहेत ना.. ?

तुम्हाला पण आवडला का सांगा >>>>>>>>>>>>>>
काय विचारणं झालं लाजो?
केकांमधून(मोराच्या केका नव्हेत, केकचं अनेकवचन) अख्खा देखावा? ग्रेटच आहेस!
>>>माझ्या लेकीने हा केक बघितला तर ती आयांची अदलाबदल करुया म्हणुन तुझ्या लेकीच्या मागे लागेल
>>>> साधना!!!!!!!!!

आताच लेकीला दाखवला. जिसका डर था बेदर्दी वो ही बात हो गयी. लेकीनं 'आई किती कुचकामी आहे' या मात्रेचा अजून एक वळसा दिला. Proud

Pages