चॉकलेट नेस्ट अ‍ॅंड इस्टर एग्ज केक

Submitted by लाजो on 2 May, 2011 - 00:00

इस्टरसाठी नेस्ट अँड एग्ज केक Happy

यंदा लेकीच डेकेअर मधल शेवटचं इस्टर सेलेब्रेशन होतं म्हणुन मी हा केक करुन दिला होता.

मुलं आणि स्टाफ जाम खुष कारण भरपुर इस्टर एग्ज तर मिळालीच पण सोबत आफ्टरनून टी साठी मस्त व्हॅनिला - चॉकलेट केक पण ... अशी डब्बल मजा Happy

बघा तुम्हाला पण आवडतोय का इस्टर केक Happy

IMG_0338.jpg

-----------------

बेस:

IMG_0329.jpg

बेसिक नेस्ट:

IMG_0332.jpgIMG_0333.jpg

ही हॅच झालेली गोंडस पिल्लं Happy

IMG_0336.jpgIMG_0335.jpg

आणि हे डेकोरेशन:

IMG_0348.jpg

गुलमोहर: 

मस्त दिसतो आहे केक! घरट्यासाठी काय वापरलं आहेस? बिस्किट्स चॉकलेट सॉसमध्ये वगैरे बुडवून काढली आहेस की तशीच चॉकलेट्स मिळाली?

लाजो,
अप्रतिम दिसतोय केक. कसली इनोव्हेटिव्ह आहेस अगं तू.. Happy
ते नेस्ट कसं बनवलंस? की विकत मिळालं? आणि ग्रीन ग्रास आहे ते खाणेबल आहे कि फक्त शोभेसाठी? आणि ती अंडी म्हण्जे चॉकलेट्स आहेत ना

मस्त ग लाजो, बघायला पेक्षा खायला मज्जा आली असती Lol
असो स्टेप बाय स्टेप प्रो टाक की म्हणजे आम्हा पामरांना करता येइल Happy
रंगीबेरंगी अंडी लै भारी. पिल्लु तर गोंडुस आहे.

भारी Happy

सहीच

मस्त!! आता कृती पण येउ द्या!!! केक चा जो आकार आहे, त्यासाठी कोणत्या शेपचं भांड वापरलं आहे??

मस्तच. लाजो इथून पुढे असं काही केलंस तर व्हिडीओ पण बनवून ठेव. आता माझी मंडळी असं काहीतरी करायला गेली तर काय होईल कुणास ठाऊक? प्रयत्नांचे अंडे उबवण्याचा नक्की प्रयत्न करू.

Pages