भूपाळी

चीड्याघ ईगाअं

Submitted by मामी on 12 July, 2013 - 03:11

(चाल : सुतार उत्तमसा. मात्र वाद्यवृंद : 'उठा राष्ट्रवीर' चा)

कित्येक युगे घडा पालथा पडला
आतील ऐवजही सडला

चहूबाजूला जग बदलते रोज
किड्यांची घड्यात बुजबूज

मोकळी हवा, स्वच्छ ऊन अन पाणी
रुंदावली क्षितिजे, बदलली जुनी ती गाणी

नव समिकरणे, विचार नव, नव वारे
या घड्यास उपरे सारे

आपुल्याच नादी रमला
कवटाळुनि जुनेच बसला
नाकारी सर्वही बदलां

उठण्याचे घेईल कधी कष्ट हा घडा?
कधी होईल का हा सुपडा?

भूपाळी नळराजाची (पाण्याच्या)

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 19 October, 2010 - 12:26

उठी उठी बा नळराजा
घेउनी ये पाण्या ताज्या,
वाट पाहती हो बापुडे
येई येई लवकरी,

सकाळ झाली उठले सारे
उठोनि आले सकळीक,
चहा पिऊन झाले ताजे
झाली भांडण्या मोकळिक,

बाया पोरे जमली सारी
हंडे भांडी घेऊन हाती,
झोंबाझोंबी बारीसाठी
चढाओढ जणु पळण्याची,

एकमेका शिव्या घालिती
कुळांनाही उध्दारिती,
लाथा बुक्क्यांचाही करिती
एकमेका आहेर,

वेण्या अंबाडे सूटती
भान सारे विसरुन जाती,
बघे उगाच गोळा करिती,
लोकां बघण्या देखावा,

आले आले हो नळराज
घेऊन पाणी पिवळे जर्द,
तोंड सारे वासुन बघती
मिटती सारे मतभेद,

शांत झाला हो गलबला
देती एकमेका सल्ला,
म्हणती मागवु टेंकरगाडा
घेऊ पाणी त्याचेच,

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - भूपाळी