चीड्याघ ईगाअं

Submitted by मामी on 12 July, 2013 - 03:11

(चाल : सुतार उत्तमसा. मात्र वाद्यवृंद : 'उठा राष्ट्रवीर' चा)

कित्येक युगे घडा पालथा पडला
आतील ऐवजही सडला

चहूबाजूला जग बदलते रोज
किड्यांची घड्यात बुजबूज

मोकळी हवा, स्वच्छ ऊन अन पाणी
रुंदावली क्षितिजे, बदलली जुनी ती गाणी

नव समिकरणे, विचार नव, नव वारे
या घड्यास उपरे सारे

आपुल्याच नादी रमला
कवटाळुनि जुनेच बसला
नाकारी सर्वही बदलां

उठण्याचे घेईल कधी कष्ट हा घडा?
कधी होईल का हा सुपडा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, मला ढीग वाटेल की मला कविता करता येतात पण रियाच्या विपुतल्या एक्स्पर्ट्स कमेंटस वाच. तिथे माझा काव्यक्षेत्राशी काही संबंध नाही असं जाणकार म्हणताहेत. अ‍ॅक्च्युयली या सगळ्या रिलेवंट विपु एकत्र करून ठेवायला हव्या. अमुल्य ठेवा आहे तो. Happy

अय्या! माझी विपू वाचायला आत्ता सगळेच जातील.. जाल तेंव्हा जरा चांगलं चांगलं लिहुन या त्यात पुढच्याने वाचण्यासाठी Proud

Pages