Submitted by पुरंदरे शशांक on 19 October, 2011 - 05:38
मी किनै आई....
मी किनै आई.... होणारे ड्रायव्हर...
झूSSSम... गाडीतून जाऊ दूर दूरवर....
मी किनै आई... होणारे पायलट..
सुंSSSई... प्लेनमधून दोघेच जाऊ सटासट...
मी किनै आई.... होणारे डॉक्टर..
घाबरु नको काही, जेम्स देईन बाटलीभर....
मी किनै आई... होणारे टीचर..
फोरचेच टेबल विचारेन फारतर...
मी किनै आई.... होणारे शेफ...
पिझ्झा बर्गर काही नको पोहे, उपमा सेफ ?
मी किनै आई..... होणारे डान्सर....
ह्रतिक, ऐश, करीना कसले येतील स्टेजवर...
टीचर, डॉक्टर, पायलट, डान्सर असलो / असले जरी ड्रायव्हर
झोपताना कुशीत मात्र तुझा /तुझी च गं बिलंदर...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान
छान
मस्तचए.....खुप चान..
मस्तचए.....खुप चान..
गोSSSSड कविता! मस्तच!
गोSSSSड कविता! मस्तच!
अगदी गोड!
अगदी गोड!:)
मस्त!
मस्तय एकदम
मस्तय एकदम
मस्तयं
मस्तयं
छानै!
छानै!
गोड..
फारच गोड
फारच गोड
घाबरु नको काही, जेम्स देईन
घाबरु नको काही, जेम्स देईन बाटलीभर>> सह्ही!! आईलाही दिलासा द्यायचा.. सो स्वीssssssट!!
शशांक, बालकवितेमध्ये लहान
शशांक,
बालकवितेमध्ये लहान मुलाने आई/वडिलांना काही सांगणं
हा विरळा आढळून येणारा प्रकार तुम्ही चांगला हाताळलाय
..... आवडली कविता
आणि बागेश्रीचा प्रतिसाद +१ देखील.
क्युट!!!
क्युट!!!
सर्वांचे मनापासून आभार.......
सर्वांचे मनापासून आभार.......
मी कीनै आई होणार आहे कवी. भर
मी कीनै आई होणार आहे कवी.
भर रात्री आकाशात दाखवणार आहे रवी>>>उगिचच काहितरी.
आपली मस्तच!
मस्त.
मस्त.
खुप लडिवाळ!
खुप लडिवाळ!
मी किनै आई.... होणारे
मी किनै आई.... होणारे डॉक्टर..
घाबरु नको काही, जेम्स देईन बाटलीभर....
मस्तं...