बालकविता

मिकी माऊस, मिकी माऊस

Submitted by एम.कर्णिक on 20 December, 2010 - 13:29

मिकी माऊस, मिकी माऊस
येणाराय पाऊस
भिजू नको पावसात
बिळात लवकर घूस
Mickey_Mouse 2.svg_.png
सूट आणि बूट तुझे
चिंब होतिल भिजून
आणि तुला कुडकुडतच
जावे लागेल निजून

donald-duck.jpg
काढलास वेळ गप्पा मारत
डोनाल्ड डकसंगे
त्याला काय पावसाचं ?
पाण्यात तो तरंगे

Bambi 4.JPG
बांबी हरिण जाईल पळून
आहे वेगवान
वारा अडविल तुलाच
तुझे शिडासारखे कान.

गुलमोहर: 

बाळासाठी.....

Submitted by पुरंदरे शशांक on 19 December, 2010 - 09:33

बाळासाठी.......

एक दाणा ..... चिऊसाठी
एक घरटे ...... काऊसाठी

एक घास ..... हम्मासाठी
एक वाटी ...... माऊसाठी

एक बिस्किट ...... भू भू साठी
एक अंगाई ......... चांदोबासाठी

एक गाणे ...... बाळासाठी
गोड गोड ...... पापीसाठी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बंडूच्या स्वप्नातच येते -

Submitted by विदेश on 18 December, 2010 - 03:37

बंडूच्या स्वप्नातच येते स्वर्गामधुनी छान परी
झोपेमधला हीरो बंडू मौजमजा धम्माल करी ।१।

खात ‘ बुढ्ढीका बाल ’ शंभर बंडू होतो लालीलाल
चोखत लॉलीपॉप शंभर बंडू करतो पहा कमाल ।२।

ट्वेंटी-ट्वेंटित बंडू ऐटित ठोकी शतके चार
बळी दहाही घेऊन करतो शत्रूला बेजार ।३।

खुशालचेंडू मिळवी बंडू गुण शंभरपैकी शंभर
निकालात ना कधीच सोडी तो अपुला पहिला नंबर ।४।

ऑलिंपीक वा एशियाड ती असो कोणतीही स्पर्धा
प्रतिस्पर्ध्यांची उडवी बंडू क्षणात भलती त्रेधा ।५।

बंडू वरचढ ठरतो नेहमी - खेळ असो मारामारी
कुस्तीमध्ये डाव बंडुचा धोबीपछाडच भारी ।६।

मारी शाळेला तो बुट्टी स्वप्नामधला बंडू

गुलमोहर: 

सेपरेट कॉट

Submitted by एम.कर्णिक on 16 December, 2010 - 12:36

बाबा, माझा फर्स्ट हॅपी बर्थ्डे काल झाला
तेव्हा “बंटी मोठा झाला” तुम्हीच म्हणाला

आई, आता हवी मला माझी सेप्रेट कॉट
तुमच्या दोघांमध्ये माझी लागते पुरी वाट

जागा नस्ते लोळाय्ला तुम्च्या दोघांमद्धे
बाबांच्या पोटात ग मग बस्तात माझे गुद्दे

तुलादेखील लाग्तात नं खायला माझ्या लाथा?
म्हणून तुमच्या दोघात मी झोप्णार नाई आता

हं, पण आभाळ गडगडून पाऊस धुम्धार पडेल
आणि मोट्ठ्या आवाजात वीज कडकडेल

नाय्तर बागुलबोवा आला असेल अंधारात
तेव्हा मात्र उडी मारून येईन मी दोघात

गुलमोहर: 

रावण आणि मी

Submitted by शुभांगी. on 15 December, 2010 - 06:15

रामायणातल्या रामापेक्षा, लंका माझी खास
रावणाला त्या भेटायची, लागली मला आस

एकदा मला रावणाकडुन, आले इन्विटेशन
भेटण्या त्याला वेळ होता, ठरले दुपारचे सेशन

रावणाकडे आले होते, खुप खुप पाहुणे
काय, कसं, कुठे, केव्हा दहा तोंडांनी तो म्हणे

चालतो जेव्हा रावण, तेव्हा काय सांगु दणका?
थरथर थरथर कापत होती, एवढी मोठी लंका

बघुन मधे कुंभकर्णा रावणा लागली डुलकी
भावाच्या त्या पोटाची केली त्याने उशी

रावण जेव्हा बोलतो तेव्हा चॅनल लागतात दहा
नेहमी कार्टुन बघायच, पण आता काय पहा??

चिंटुच्या त्या जोकवर, रावण हसला जोरात
बाहेर येवुन बघतो, पण गडगड नव्हती ढगात

गुलमोहर: 

भुर्र ...जायचय

Submitted by सत्यजित on 12 December, 2010 - 14:22

माझ्याकडे आहे डॉल
निळे डोळे गोरे गाल

दुदू काही पित नाही
पप्पी कुणा देत नाही

आडवं करता झोपते
अंगठा सारखा चोखते

माझ्या मागे मागे करते
फिरायला ने मला म्हणते

बाहुली लागली रडायला
तिला जायचय फिरायला

मला देखिल रडू येतय
सांगा कोण फिरायला नेतय?

-सत्यजित.

गुलमोहर: 

उंदीरमामा

Submitted by एम.कर्णिक on 11 December, 2010 - 10:49

कोंबड्यानं दिली कुकुच्कू बांग
उंदरानं टाकली सायकलवर टांग

बाजारात गेला आणायला खाऊ
आडवी आली पोलीस माऊ

पोलिसमाऊनं वाजवली शिटी
भूभू लागला माऊच्याच पाठी

माऊची उडली तारांबळ
उंदराला चढलं हत्तीचं बळ

उंदीरमामाला मिळालि सूट
स्वतासाठी घेतले बाटाचे बूट

मामीसाठी पुरण पोळ्या
पिलांसाठी चॉकलेट, गोळ्या

वजनदार वस्तूनी भरलं दप्तर
सायकलचं चाक मग झालं पंक्चर

उठा उठा बंटिबाबा जागे व्हा
कुर्रकुर्र दात घासुन तोंड धुवा

जाऊ द्या तो उंदीर जाऊ द्या ती माऊ
आपण आपले तोंड धुवुन ब्रेकफास्ट खाऊ

गुलमोहर: 

वाघोबा नी म्हातारी

Submitted by शुभांगी. on 10 December, 2010 - 05:50

जंगलामधे वाघोबाबा, धरुन बसले दबा
पोटामधले कावळे मेले,आणा कुणी डबा??

चालल्या होत्या आजीबाई, लुटूलुटू मजेत
खुदकन हसले वाघोबाबा,सावज आल कवेत

आज्जीबाई जाता कुठे, थांबा थोडावेळ
कितीतरी दिवसांपासुन, खाल्ली नाही भेळ

आज्जी काही भ्याल्या नाहीत, ध्यानी आला कावा
सुटायचे तर युक्ती करावी, नको नुसता धावा

मला खाशील भागेल का भुक, हाड जातील घशात
बेसन लाडू आणिन म्हणते, इंटरेस्ट नाही का कशात??

वाघोबा हसले मनात फसले, तोंडा सुटले पाणी
आज्जीबाईंसह त्यांनी म्हणली गंमतगाणी

आज्जीबाई निघाल्या लेकिकडे, होण्या धष्टपुष्ट
वाघोबा बसले जिभल्या चाटत, कशाला हवेत कष्ट?

गुलमोहर: 

बालसाहित्य - ढुमढुम ढुमाक (गोष्ट जुनीच पण नव्या रुपात)

Submitted by शुभांगी. on 9 December, 2010 - 23:35

जेरीची चाल जशी धमाल धमाल
त्याला सापडला मळका रुमाल
'काय बर कराव याच?' कळेना
रुमाल काही फेकवेना

डोक्यात आली नामी युक्ती
पळत गाठली परटाची भट्टी
परटाला दाखवली चीजची लालुच
त्याने धुवुन दिला रुमाल हळुच

शिंप्याकडे नेहमी गर्दी फार
माझ्या टोपीचा करेल का विचार
त्याला दिले शेंगदाणे दोन
त्याने शिवला टोपीला कोन

गोंडेवाल्या आजीबाई खडुस फार
दुध पिता टॉमचा करती उद्धार
साळसुदपणा जेरीने केला फार
टोपीला गोंडे लावले मोजुन चार

आता कसं सगळ छानछान
वाकेल आता राजाची मान
जेरीची बघता सगळी शान
सैनिकांनी टवकारले आपले कान

ढुमढुम ढुमाक, ढुमढुम ढुमाक
ढुमढुम ढुमाक, ढुमढुम ढुमाक

गुलमोहर: 

बाहुलीची टोपी

Submitted by आनंदयात्री on 9 December, 2010 - 11:45

बाहुली म्हणे टोपी हवी
घालायला पण सोप्पी हवी
त्यावर माऊचे कान हवे
छोटे गोरेप्पान हवे
आणखी हवंय बदामी फूल
त्यावर सुंदर मोत्यांची झूल
रंगीत डोक्यावर चांदण्या फुले
टोपीच्या गोंड्यावर चांदोमामा डुले
टोपीच्या भवती सोनेरी नक्षी
इवल्याशा पंखांचा पिटुकला पक्षी

टोपी घालून भूर गेली
ढगांमधून दूर गेली
तिथे होत्या पऱ्याच पऱ्या
चॉकलेटचे डोंगर आणि आईसक्रीमच्या दऱ्या
मिठाईच्या जंगलात बर्फीचे रस्ते
झाडा-झाडांवर केशर-पिस्ते
बाहुलीच्या डोक्यावर माऊची टोपी
दिसायला सुंदर घालायला सोपी
पऱ्यांच्य़ा राज्यात एकच गडबड
टोपीसाठीच सगळी धडपड

पऱ्या म्हणाल्या बाहुलीला
"टोपी दे ना आम्हाला!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता