जंगलामधे वाघोबाबा, धरुन बसले दबा
पोटामधले कावळे मेले,आणा कुणी डबा??
चालल्या होत्या आजीबाई, लुटूलुटू मजेत
खुदकन हसले वाघोबाबा,सावज आल कवेत
आज्जीबाई जाता कुठे, थांबा थोडावेळ
कितीतरी दिवसांपासुन, खाल्ली नाही भेळ
आज्जी काही भ्याल्या नाहीत, ध्यानी आला कावा
सुटायचे तर युक्ती करावी, नको नुसता धावा
मला खाशील भागेल का भुक, हाड जातील घशात
बेसन लाडू आणिन म्हणते, इंटरेस्ट नाही का कशात??
वाघोबा हसले मनात फसले, तोंडा सुटले पाणी
आज्जीबाईंसह त्यांनी म्हणली गंमतगाणी
आज्जीबाई निघाल्या लेकिकडे, होण्या धष्टपुष्ट
वाघोबा बसले जिभल्या चाटत, कशाला हवेत कष्ट?
तुप खाल्ले, मेवा खाल्ला तेज आले अंगा
काय बरे द्यावे वाघा, आता तुम्ही सांगा?
लेकि पुसे जाता जाता, आता काय करु?
भुकेल्या त्या वाघोबाच्या, तोंडी काय भरु?
लेक हसली, दिला भोपळा आतमधे कोरुन
बिंधास्त जा ग आई, यात स्वतःला भरुन
जंगलामधुन जाताना, आज्जी चालल्या जपुन
वाघोबाबा बसले होते, झाडामागे टपुन
ए भोपळ्या येताना म्हातारी, दिसली का रे तुला?
वाट बघुन बघुन आता, कंटाळा आला मला
भोपळ्यामधुन आवाज आला, म्हातारी नाही ठाऊक
वेगे वेगे चल रे भोपळ्या, टुणुक टुणुक, टुणुक टुणुक
.
.
मस्तच
मस्तच
एकदम छान जमली चल रे भोपळ्या,
एकदम छान जमली
चल रे भोपळ्या, टुणुक टुणुक, टुणुन टुणुक
छान गं शुके... खूप आवडली..
छान गं शुके...
खूप आवडली..
गुब्बे एकदम मस्त जमलिय
गुब्बे एकदम मस्त जमलिय
खूपच छान माझ्या पिल्लाला खूप
खूपच छान माझ्या पिल्लाला खूप आवडली अजून पाठवत राहा अश्याच
सुंदर.
सुंदर.
बालपण जागं झालं....
बालपण जागं झालं....
कित्ती छान!! तुझ्या घरी
कित्ती छान!!
तुझ्या घरी इतरांच्या बालगीतांची पुस्तकं वगैरे नसतीलच!!
मस्त यमकं जुळवून कथा उभी
मस्त यमकं जुळवून कथा उभी केलीएस...!
मस्त...
मस्त...
शुकु.. शुकु... मस्त कविता.
शुकु.. शुकु... मस्त कविता. वाचायचीच राहून गेली.
येशा..कडून ऐकायला आवडेल हि कविता.
(No subject)
मस्तच!!! येशा..कडून ऐकायला
मस्तच!!!
येशा..कडून ऐकायला आवडेल हि कविता.>>>>>सुकीला मोदक
जबरी लिहिलीयेस ग. लिहिते
जबरी लिहिलीयेस ग.
लिहिते रहो.......
मस्त जमल्ये ही पण
मस्त जमल्ये ही पण
मस्त जमलीय.
मस्त जमलीय.
मस्त...
मस्त...
एकदम गोड
एकदम गोड
हीपण मस्त.
हीपण मस्त.
मस्त...
अरे, किती गोड झालीये ही
अरे, किती गोड झालीये ही कविता. वाचायची राहून गेली होती. लेकाला सांगणार आजच. खुष होईल तो.
आणखी लिहा अशाच मस्त कविता.
जुन्या गोष्टी नवीन टर्मिनॉलॉजी वापरून लिहिलेल्या असल्या की मुलांना पटकन जवळच्या वाटतात,असा माझा अनुभव आहे.
रच्याकने....' वाघोबाबा ' शब्द आवडला.माझा लेक आजोबांना अजूनही ' आजोबाबा ' च म्हणतो.
सुप्पर्ब!! सुप्पर्ब!!
सुप्पर्ब!! सुप्पर्ब!! सुप्पर्ब!!
खूप्पच ग्वाड
धन्यवाद सगळ्यांना. मुलांना
धन्यवाद सगळ्यांना.
मुलांना त्यांच्या भाषेत सांगीतल की पटकन कळत.
मस्तच..
मस्तच..
मस्त
मस्त
आवडली...!!
आवडली...!!
जुन्या गोष्टी नवीन
जुन्या गोष्टी नवीन टर्मिनॉलॉजी वापरून लिहिलेल्या असल्या की मुलांना पटकन जवळच्या वाटतात,असा माझा अनुभव आहे.
रच्याकने....' वाघोबाबा ' शब्द आवडला.>> रूणू ला मोदक!
गुब्बे अगदी नॉस्टॅल्जिक केलंस बाई... त्यावेळेच्या गोष्टी... त्या रंगवून सांगणारी आई, तो क्षण पुन्हा जिवंत केलास... धन्स!!! जबरा लिहीतेस पुलेशु
शुकु, आत्ता पाहिली कविता.
शुकु, आत्ता पाहिली कविता. मस्तच आहे.
मस्त.
मस्त.
Pages