बाळासाठी.....

Submitted by पुरंदरे शशांक on 19 December, 2010 - 09:33

बाळासाठी.......

एक दाणा ..... चिऊसाठी
एक घरटे ...... काऊसाठी

एक घास ..... हम्मासाठी
एक वाटी ...... माऊसाठी

एक बिस्किट ...... भू भू साठी
एक अंगाई ......... चांदोबासाठी

एक गाणे ...... बाळासाठी
गोड गोड ...... पापीसाठी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान Happy

आता यात आमच्या घरातली प्रासंगिक कडवी जोडायला पण ब्येस्टेय... >>> ती जोडली की इथे पण टाकायला विसरु नका.... बडबडगाणी अशीच तयार होतात ..... गाता गाता...

सर्व रसिकांचे मनापासून आभार.