Submitted by एम.कर्णिक on 11 December, 2010 - 10:49
कोंबड्यानं दिली कुकुच्कू बांग
उंदरानं टाकली सायकलवर टांग
बाजारात गेला आणायला खाऊ
आडवी आली पोलीस माऊ
पोलिसमाऊनं वाजवली शिटी
भूभू लागला माऊच्याच पाठी
माऊची उडली तारांबळ
उंदराला चढलं हत्तीचं बळ
उंदीरमामाला मिळालि सूट
स्वतासाठी घेतले बाटाचे बूट
मामीसाठी पुरण पोळ्या
पिलांसाठी चॉकलेट, गोळ्या
वजनदार वस्तूनी भरलं दप्तर
सायकलचं चाक मग झालं पंक्चर
उठा उठा बंटिबाबा जागे व्हा
कुर्रकुर्र दात घासुन तोंड धुवा
जाऊ द्या तो उंदीर जाऊ द्या ती माऊ
आपण आपले तोंड धुवुन ब्रेकफास्ट खाऊ
गुलमोहर:
शेअर करा
मस्त.. बर्याच दिवसांनी तुमची
मस्त.. बर्याच दिवसांनी तुमची बालकविता आली
सुंदर बालकविता. सुप्रभात
सुंदर बालकविता.
सुप्रभात बंटिबाबा.
छान
छान
गोड कविता बंटीबाबा खुप
गोड कविता

बंटीबाबा खुप दिवसांनी दिसले
एकदम गोड कविता
एकदम गोड कविता