मिकी माऊस, मिकी माऊस

Submitted by एम.कर्णिक on 20 December, 2010 - 13:29

मिकी माऊस, मिकी माऊस
येणाराय पाऊस
भिजू नको पावसात
बिळात लवकर घूस
Mickey_Mouse 2.svg_.png
सूट आणि बूट तुझे
चिंब होतिल भिजून
आणि तुला कुडकुडतच
जावे लागेल निजून

donald-duck.jpg
काढलास वेळ गप्पा मारत
डोनाल्ड डकसंगे
त्याला काय पावसाचं ?
पाण्यात तो तरंगे

Bambi 4.JPG
बांबी हरिण जाईल पळून
आहे वेगवान
वारा अडविल तुलाच
तुझे शिडासारखे कान.

tom-and-jerry 1.jpg
ऐका माझं मिकी भाऊ
आता धूम ठोका
जेरी उंदीर पळतोय तसाच
पळतोय टॉम बोका

गुलमोहर: 

छान Happy

किती गोड कविता.नक्की वाचुन दाखवेन मुलाना.

शाळेत असताना उस्फुर्त मध्ये काहीतरी स्त्री शक्ती वर बोलायअचे होते,तर अशिच एक बालकविता पटकन स्मरली..ऐकलेली ...सइची सखु
बाहेर नको जाउ..
मुल तुला मारतील
अन्गा (झब्ले!) तुझा फाडतील
तुझ्यात नाही बळ..
चिमटा काढुन पळ!:)
शेवटचि ओळ मला फार आवड्लेली.:)
तुमच्या कवितेच्या पहिल्या कड्व्याने ती कविता आठवली.