नेमस्त अंत ज्याला, तो हा प्रवास नाही
मार्गातही जळाचा कुठलाच भास नाही
मी या जगात आहे हे ही तुला न ठावे
हेतू तुझ्याविना अन् या जीवनास नाही
डोळ्यासमोर आहे, तो चेहरा हटेना
कानात शब्द गुंजे, प्राणांत श्वास नाही
कशाची टोचणी नाही, कुणाचा जाच नाही
चला! मेलोच असलो पाहिजे! शंकाच नाही!!
तुला मी पाहताना लाजुनी हसलीस तूही
पुढे हातात अपुल्या मामला उरलाच नाही!
अचानक कारणावाचून विस्कटतात स्वप्ने
असे रात्रीसही होते मला, दिवसाच नाही!
भेटलो शब्दात नाही...
आणि प्रत्यक्षात नाही!
जमवले कित्येक मोती
गोवले धाग्यात नाही
बांधतो मी रोज पुल.. पण
सांधणे हातात नाही
पेरतो वाटेत काटे
फूल मज भाग्यात नाही
साजरे केलेत सण मी
'घर' जरी वाड्यात नाही
देव हा ही पावतो ना?
काय वाटते कुणास हे अजमावत नाही
कारण तुलाच माझी कविता भावत नाही
ज्याच्या त्याच्या तोंडी गप्पा कलंदरीच्या
(कोण सुखाचा चाकर होउन धावत नाही?)
आज कोसळू पाहे सारे तिने दिलेले...
उगाच कोणासाठी नभ पाणावत नाही
तत्व माझे फार काही थोर नाही
मी कुणा राजादिकाचा पोर नाही
सांगणे माझे जगाला हेच आहे
वाटतो मी फक्त,हेकेखोर नाही
सारखी धास्ती रुढींची, बंधनांची
हाय, जगणे येथले बिनघोर नाही
गुंतलो ध्यानी तुझ्या इतका सखे मी
का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही
चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही
त्या सावळ्याच होत्या रात्री फिरून माझ्या
देहात चांदणे मग फुलले कधीच नाही
बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते
मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही
कुणाच्या भावनांशी खेळ केव्हां मांडला नाही
असे हे हीन स्वार्थाचे व्यसन काही मला नाही
कसा वाहून नेला गाव सारा जीवना तू रे
विखुरले जीव सारे माग सुध्दा सोडला नाही
इथे पाहून झाले सर्व देखावेच मदतीचे
आसवांना वाहण्याचा छंद नाही
दु:ख नाही वेगळे, आनंद नाही
आसवेही शेवटी वाहून गेली
पावसाला राहिला धरबंद नाही
तोडल्या नाही कळ्या कोमेजलेल्या
शौक माझा तेवढा बेबंद नाही
भावभक्तीची दुकाने जागजागी
थांबलेला 'आतला' आक्रंद नाही...
प्रियेची मला साथ का आज नाही?
गुलाबी क्षणांना कसा साज नाही?
सदा पाहतो मी जगाचे बहाणे
स्वतःचाच का येत अंदाज नाही?
उगा फेकती घोषणा हे पुढारी
शिरी राज्य येताच आवाज नाही
कशी जाहली माणसांचीच यंत्रे