प्रवेशिका - १७ ( ashwini_s - नेमस्त अंत ज्याला... )

Submitted by kaaryashaaLaa on 5 October, 2008 - 23:44

नेमस्त अंत ज्याला, तो हा प्रवास नाही
मार्गातही जळाचा कुठलाच भास नाही

मी या जगात आहे हे ही तुला न ठावे
हेतू तुझ्याविना अन् या जीवनास नाही

डोळ्यासमोर आहे, तो चेहरा हटेना
कानात शब्द गुंजे, प्राणांत श्वास नाही

तू सूर्य ह्या नभीचा, मी सूर्यफूल व्हावे
दृष्टी तुझ्या दिशेला, तिज अन्य ध्यास नाही

जन्मात भेट नाही, पुढच्यात ती घडावी
जीवास अन् निराळी लागून आस नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली आहे कल्पना.. गजल आवडली.

७ गुण.

सूर्यफूल आवडलं, छान कल्पना

गझलेत चांगल्या कल्पना आहेत. पण 'अन'पण जास्त झालेय.
माझे गुणः ४

नेमस्त... बहोत खूब
माझे ५
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

तू सूर्य ह्या नभीचा, मी सूर्यफूल व्हावे
दृष्टी तुझ्या दिशेला, तिज अन्य ध्यास नाही

आवडला...
माझे गुण - ४
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

प्रयत्न चांगला आहे.
माझे ४

मतला मस्त!
६ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

दुसरा शेर आवडला. बाकी ठीक.
माझ्या मते ५ गुण.
-सतीश

६ गुण..

मतल्याची १ली ओळ आणि सूर्यफूल आवडले.
माझे - ५ गुण.

नेमस्त अंत ज्याला, तो हा प्रवास नाही
मार्गातही जळाचा कुठलाच भास नाही

मी या जगात आहे हे ही तुला न ठावे
हेतू तुझ्याविना अन् या जीवनास नाही

आवडले हे शेर! मस्त जमलेत!

दुसरा शेर छान...खुप आवडला...बाकीचे शेरही चांगले जमलेत
५ गुण