सोशियल मिडीयात
सोशियल मिडीया वापरणं
जणू कोंडी भासत होती
जेव्हा व्यक्ती स्वातंत्र्याला
कायद्याची गदा ढासत होती
आता मात्र आय.टी. अॅक्ट
स्वातंत्र्यापुढे नमला आहे
सुप्रिम कोर्ट निर्देशामुळे
६६ (अ) हा शमला आहे
हि श्रेया सिंघालची जीत मात्र
आनंद तर नेटकर्यांचा आहे
तरी मिडीयात विवेकी वागणं
जिम्मा मात्र सार्यांचा आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!
माझ्या मामाला साडेचार पोरी
चार डोमड्या पण एक छोरी गोरी
या छोर्यांचं कौतूकं सांगू मी काय
गे माझे शिमगेमाय!
एक नुसताच लंबा बांबू
जणू हाडाचा उभारला तंबू
रक्ता-मासाचा बिल्कूल पत्ताच नाय
गे माझे शिमगेमाय!
एक भलतीच ऐसपैस
जणू पंजाबी मुऱ्हा म्हैस
डोलतडोलत रस्त्यानं चालत जाय
गे माझे शिमगेमाय!
एका रंभेचं रुपडं भालू
दोन्ही गालाचे फ़ुगले आलू
रोज वेणीला लावते हेअरडाय
गे माझे शिमगेमाय!
एक अप्सरा बेलमांजर
हत्ती डोळ्यात काजळाचे थर
पण स्वभाव गरीब गोगलगाय
गे माझे शिमगेमाय!
एक दणकट मल्ल शिपाई
तिला पिसीआर घेण्याची घाई
मन अता गाभूळलेले
शब्द श्रृंगारून गेले
भरजरी मेली सुखाने
लक्तरे लाजून मेले
चोर का डोळ्यात होते
एवढे चोरून नेले !
हीच बेफिक्री गुरुंची
अर्धवट आहेत चेले !
भित नसे ती पावसाला
पापणी दररोज झेले !
वायदे डोळ्यात होते
की मला वाटून गेले !
विलास खाडे
याद करो कुर्बानी
देशासाठी झटले होते
स्वातंत्र्याची धग धरून
त्या शुरांची याद करतो
आठवणीनं जग भरून
भगतसिंग,राजगुरू,सुखदेव
आठवून घ्यावेत सर्वांनी
येतील शहारे रोमा-रोमात
ऊनकी याद करो कुर्बानी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
मला तिच्या आजही मनाशी बघून आरोप छान झाले !
तिनेच होता दिला पुरावा अजून आरोप छान झाले !
कबूल व्हावे असेच होते , तिचे म्हणे ते हृदय असावे
असेल माझी कशीच चोरी ? नसून आरोप छान झाले !
मिठीत घेता तिला जरा मी, कसे कसे मोहरून आले
कवेत लाजून लाल झाली ! हसून आरोप छान झाले !
निभावयाला नशीब नसते तिचे बहाने करून झाले
अपूर्ण स्वप्ने तहान झाली रडून आरोप छान झाले!
बरेच प्रेमात राख झाले, असेच वेडे जळून मेले
मलाच होते गृहीत सारे धरून आरोप छान झाले !
विलास खाडे
सांग, त्यावर निघेल का आैषध
आणि दारू बनेल का आैषध
पोट आहे तुझे बिघडलेले
घेतल्यावर पचेल का आैषध
एक सल्ला तुला दिला असता
घ्यायला हे जमेल का आैषध
हाच पर्याय राहिला आहे
वेळ देणे असेल का आैषध
जात आहेस दूर, परदेशी
हे तिथेही मिळेल का आैषध?
जयदीप
वाहन अवाहन
हल्ली वाहन म्हटलं की
गरजेची गोष्ट झाली आहे
कित्तेक कामांची जबाबदारी
वाहनांवरती आली आहे
प्रवासासह इतरही कामे
वाहन बिगीनं करू शकते
पण त्याची काळजी न घेणं
हे जीव घेणंही ठरू शकते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
इतक्या सहज नसतं शक्य, तोडणं आपल्या श्वासाची लय…
आणि आपल्या रात्रीला लागलेली, तिच्या स्वप्नांची सवय…
तसं काहीच नसायचं सोप्पं.. ती असताना आणि नसतानाही…
हातही थरथरतो हल्ली, करताना तिच्या कवितेखाली सही…
प्रश्न पडतो कसं सांभाळायचो, आपण स्वतःला तिच्यासोबत…
प्रत्येक गोष्टीला अफाट मुल्य.. तसं काहीच नसायचं मोफत…
म्हणजे चंद्राला अश्रू.. रात्रीला स्वप्न.. आणि तिच्या आठवणींना कविता द्याव्याच लागायच्या…
नाहीतर कळ्याही फुलायच्या नाहीत… तश्याच रात्रभर जागायच्या…
मग त्यांना पहाटे फुलवता फुलवता, माझ्या नाकी यायचे नऊ..
मग त्याच मला म्हणायच्या, "नकोस ना रे, असा वागत जाऊ..
तुला मिळावे हास्य म्हणोनी
दु:खाशी मी नाळ जोडतो
प्रकाश बिखरू नये म्हणोनी
अंधाराचा बांध बांधतो
खेळामध्ये जिंकताच तू
तुझा चेहरा उजळत असतो
लोभसवाण्या रुपावरी मी
भान विसरुनी बहकत असतो
चिन्ह तुझ्या हारण्याचे दिसता
अर्ध्यातच मी डाव मोडतो
प्रकाश बिखरू नये म्हणोनी
अंधाराचा बांध बांधतो
उगाच का तू खडा टाकला?
डोहामध्ये तरंग उठले
तरंग कसले? आठवणींचे
झंझावाती वादळ सुटले
दिवाळखोरी झोपेची पण
स्वप्नांना मी साद घालतो
प्रकाश बिखरू नये म्हणोनी
अंधाराचा बांध बांधतो
धन्यवाद ! तू दु:ख दिले मज
दुसरी दु:खे पळून गेली
एक दु:ख अन् एक वेदना
भोगायाची सवय जाहली
दोष तुला ना देणे जमले