Suspense Story
क्रिप्टो ( Crypto ) भाग - ६
₿₿₿
जयसिंग नॉर्मल झाला आणि त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला , आणि तो घरी आला . त्याची बायको यमुना , त्याच्या तब्येतीची जास्तच काळजी घेऊ लागली. अधून मधून चौकशी करण्यासाठी सुहासिनी ताईसाहेबांचा फोन येत होता. जयसिंगची तब्येतही आता सुधारू लागली. वरून सर्व आलबेल दिसत असलं तरी एक अशी गोष्ट होती , कि ती जयसिंगच्या जीवाला खात होती,
“ काय हो ? मी बघतेय , बरेच दिवस तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय ? काय झालंय असं ? ”, यमुनेने त्याला विचारलं.
“ काही नाही . कुठं काय ? ” , त्याने उत्तर द्यायचं टाळलं .
क्रिप्टो ( Crypto ) भाग ५
क्रिप्टो ( Crypto ) भाग - ४
क्रिप्टो (Crypto ) - भाग - ३
क्रिप्टो (crypto ) भाग - २
बांद्रा वेस्ट - लास्ट
बांद्रा वेस्ट लास्ट
ती बँडस्टँडवर एकटीच बसली होती. तिची नजर अजुनही त्याच्या वाटेवर लागली होती. त्याची नेहमीच उशीरा येण्याच्या सवयीमुळे ती त्याच्यावर चिडायची. रागवायची, पण तिचं त्याच्यावर जिवापाड प्रेम होतं. त्याने कितीही उशीर केला तरी ती आधी रागवायची पण तो राग प्रयत्न करुनही जास्त टिकत नसे . उशीरा का होईना पण तो येईल ह्या आशेवर ती बराच वेळ बसुन होती. पण तिच्या एका मनाने तिला समजावले. तिच्या हातात आजचा पेपर होता. त्यातल्या पहील्याच पानावर ती बातमी होती.
बांद्रा फोर्ट येथे उशीरा रात्री गोळीबार … !!!
बांद्रा वेस्ट - २४
बांद्रा वेस्ट २४ Bandra West- 24
” रॉडी, बराच वेळ झाला रे …. दोघे येतील ना …? ”
” येतील तर काय ? येणारच ! दोघेही पैशाचे भुकेले आहेत. फक्त दोघांनी दिलेली वेळ पाळली पाहीजे… टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट… ” तो घड्याळात बघत म्हणाला.
” तु नीट सांगितलंय ना फोन करुन …? ”
” हो रे …. प्रत्येकाला दोनदोनदा सांगितलंय …. तसे अजुन दहा मिनीट बाकी आहेत ” रॉड्रीक मनगटावरच्या घड्याळाकडे बघत म्हणाला.
बांद्रा वेस्ट - २३
बांद्रा वेस्ट २३ Bandra west- 23
” व्हेअर आर यु ? आय हॅव बिन वेटिंग सिन्स फाईव ओ क्लॉक…. ” मोबाईलवरुन एलिनाचा चिडका स्वर आला. तसा रॉड्रीक जोरजोरात पळु लागला. आज संध्याकाळी माऊंट मेरीला भेटायचं ठरलं होतं. अनपेक्षित पणे सुरु झालेल्या नाटकाचा शेवट कसाही होऊ शकतो त्याआधी रॉड्रिकला एलीनाला भेटावसं वाटत होतं .
” सॉरी हनी. जस्ट रिचींग इन फाईव मिनीटस्… “
बांद्रा वेस्ट- २२
बांद्रा वेस्ट- २२
दोघे घरी आले तेव्हा कोणालाच काही सुचत नव्हतं . एक ए पी आय जामसंडे पुरेसा नव्हता तर त्यांच्या पुढे आता वैनीसाहेब येउन उभी राहिली रॉड्रिक आधीच इन्स्पेक्टर जामसंडेला दहा करोड देण्याचं काबुल करून बसला होता . दहा करोड तर सोडाच पण त्याच्याकडे खर्च करण्यासाठी दहा रुपयेही शिल्लक नव्हते . त्या गुंडांचा कोकेनचा बॉक्स पोलिसांच्या ताब्यात होता . हे त्या वैनीसाहेबांच्या टोळीला सांगून उपयोग नव्हता . तो बॉक्स दोन दिवसात परत करू असा वायदा मॉन्ट्या देऊन बसला होता , आणि तेही अशक्यच होतं .
Pages
