बांद्रा वेस्ट - २३

Submitted by मिलिंद महांगडे on 6 December, 2020 - 11:31

बांद्रा वेस्ट २३ Bandra west- 23

” व्हेअर आर यु ? आय हॅव बिन वेटिंग सिन्स फाईव ओ क्लॉक…. ” मोबाईलवरुन एलिनाचा चिडका स्वर आला. तसा रॉड्रीक जोरजोरात पळु लागला. आज संध्याकाळी माऊंट मेरीला भेटायचं ठरलं होतं. अनपेक्षित पणे सुरु झालेल्या नाटकाचा शेवट कसाही होऊ शकतो त्याआधी रॉड्रिकला एलीनाला भेटावसं वाटत होतं .

” सॉरी हनी. जस्ट रिचींग इन फाईव मिनीटस्… “

रॉड्रीक धावत पळत लांबुन येत असलेला तिला दिसला. त्याला येताना बघुन एलिना मनातुन सुखावली खरी, पण दुसऱ्याच क्षणी त्याने यायला उशीर केल्यामुऴे आपल्याला चेहऱ्यावर राग आणायचाय हे ठरवुन हाताची घडी घालुन उभी राहीली. तो जवळ आला तशी तिने आपली मान दुसरीकडे वळवली. ‘ तिला खुप राग आला असावा ‘ रॉड्रीकने विचार केला. आणि लगेच तिची समजुत काढण्यासाठी म्हणाला

” सॉरी यार, आय स्ट्रक्ड इन ट्रॅफिक ”

” तुझी कारणं पण ठरलेली असतात ना ? ”

” नो… आय मीन इट… ”

” डोंट टॉक टु मी … ” म्हणत तिने मान दुसरीकडे वळवली.

” प्लीज ट्राय टु अंडस्टँड हनी…माझ्यावर रागावू नकोस . कदाचित ही आपली शेवटची भेट असेल. ” रॉड्रीकने हे वाक्य उच्चारताच तिने झटकन त्याच्याकडे वळुन पाहीलं.

” व्हॉट….? व्हॉट डिड यु से …? “

” येस, धिस मे बी अवर लास्ट….. ” तो पुढे काही म्हणणार एवढ्यात एलिनाने त्याच्या ओठांवर आपला हात ठेवला.

” प्लीज, व्हाय आर यु सेंईंग धिस ? “

” एलिना , मी जे बोलतोय ते खरं आहे. ”

” पण काय झालंय एवढं…? व्हॉट हॅपन्ड रॉडी ? ”

” डोन्ट आस्क मी दॅट…. आय कान्ट टेल यु … “

” तु टेंन्शनमधे दिसतोयस काही दिवस… इतकं काय झालंय की तुला मला सांगता येणार नाही ? “

” मला नको विचारुस, सांगितलं ना एकदा …. ”

रॉड्रीक चिडुन बोलल्यावर ती शांत राहीली. बराच वेळ कोणीच बोललं नाही. रॉड्रीकला एकुण सर्व परीस्थितीचाच राग आला होता. आणि जेव्हा राग येतो तेव्हा तो जवळच्या माणसावरच निघतो. पण थोड्या वेळाने त्याचं त्यालाच वाईट वाटु लागलं. इतकं तिच्याशी रागात बोलायला नको होतं.

” सॉरी हनी … पण टेन्शनमुळे मी काय बोलतोय ते मलाही कळत नाही. प्लीज ट्राय टु अंडस्टँड. ” त्यावर ती काहीच बोलली नाही. फक्त खाली मान घालुन उभी राहीली.

” अँड वन मोअर थिंग, आता मला तुला पुन्हा भेटता येणार नाही. तु मला विसरुन जा. ” त्याला तिच्याकडे बघता येईना. तो दुसरीकडे पाहु लागला. ते ऐकल्याबरोबर एलिना त्याच्याकडे अविश्वासाने पाहु लागली. तो अजुनही दुसरीकडेच पहात होता.

” काय बोललास तु ? लुक एट मी …. ”

” हो मी बोललो ते बरोबरच आहे. मी एका मोठ्या संकटात सापडलोय. आणि त्यातुन वाचण्याचा काही चान्स नाही. आपण जे काही ठरवलं होतं ते तू विसरून जा . आय डोंट वॉंन्ट टु स्पोईल युअर फ्युचर . डु यु हर्ड व्हॉट आय से. ? ”

” नो आय डोंट …! आय कान्ट लिव विदाऊट यु. अँड यु नो दॅट… ” ती कळवळुन म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. ओठ थरथरु लागले. त्याच्या पासून दूर होण्याची कल्पनाच तिला सहन होईना . इतकं वर्षे टिकवलेलं प्रेम सहज कसं विसरता येईल ? ती ओंझळीत तोंड लपवून रडू लागली . रॉड्रिकला कळेना आता काय करावं . त्याने तिचे दोन्ही खांदे पकडले .

” आय एम सॉरी . प्लीज एलिना , डोंट क्राय . आय एम व्हेरी सॉरी . मी थोडं टेन्शन मध्ये होतो म्हणून तसं म्हणालो . पण तुला दुखवायचा माझा तसा काहीच हेतू नव्हता . प्लीज कम , सीट . ” त्याने तिला चर्चच्या बाजूच्या एका सिमेंटच्या बाकड्यावर बसवले . अगदीच स्पष्ट बोलल्याने एलिना दुखावली होती . त्याला हे कळून चुकलं . जर एलिना सोबतची ही त्याची शेवटची भेट असेल तर ती अशी दुखःद नसावी असं त्याला वाटून गेलं . ते दोघे माउंट मेरी चर्चच्या आवारात होते . वातावरणात एक प्रकारची सकारात्मकता होती . आता काहीतरी केलं पाहिजे . एलिनचा मूड ठीक केला पाहिजे . तिला आपण हे का बोललो ते समजावून सांगितलं पाहिजे . ह्या विचाराने त्याने तिचा चेहरा स्वतः कडे वळवला .

“ एलिना , आय एम रिअली सॉरी . पण मी हे का बोललो ते सांगतो तुला. एक्चुली मी एका प्रॉब्लेम मध्ये फसलोय . आता तुला मी सगळं डिटेल मध्ये सांगू शकत नाही . पण शॉर्ट मध्ये सांगतो . उद्या रात्री मला एक मीटिंग आहे . मी आणि मॉन्ट्या चुकून एका ड्रग डीलिंग करणाऱ्या गँगच्या जाळ्यात अडकलो आहोत… आमचा काहीही फॉल्ट नाही ह्यात . पण त्या लोकांनी जबरदस्ती केल्याने आम्हाला कोकेनचा बॉक्स एके ठिकाणी पोहोचवायला जावं लागलं . ”

एलिना आश्चर्याने आणि अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती. ती काही बोलणार एवढ्यात रॉड्रिकच तिला म्हणाला , “ आय नो , व्हॉट यु आर थिंकिंग … बट जस्ट लिसन टू मी … तो बॉक्स नेत असताना आम्हाला पोलिसांनी पकडलं . ” एलिनने घाबरून तिच्या ओठांवर हात ठेवला . “ लिसन , पण आम्ही त्यांना सांगितलं कि आम्हाला जबरदस्तीने ह्यात अडकवलं आहे . सो … आज त्यांना भेटायला जायचं आहे . ”

“ रॉडी , आय… आय डोन्ट नो व्हॉट टु से … मला भीती वाटतेय … हे असं कसं झालं ? ” तिच्या चेहऱ्यावर चिंता साफ दिसत होती .

“ डोन्ट वॉरी … मी त्यातून सुटण्याचा एक रस्ता शोधून काढलाय . पण तो थोडा रिस्की आहे . लेट्स होप फोर दि बेस्ट … ह्यातून सुटलो कि मी तुला सगळं सांगेन … पण आत्ता काहीही विचारू नकोस … प्लीज . ”

“ रॉडी, आय रिअली स्केअर्ड … ”

“ डोन्ट वॉरी … चल , आत जाऊ ” म्हणत रॉड्रिक तिला घेऊन आत माउंट मेरीच्या चर्च मध्ये गेला . एलिनाने २ कँडल घेतल्या . एक रॉड्रिकच्या हातात दिली . दोघांनी कँडल पेटवल्या आणि प्रेअर केली .

‘ मदर मेरी , तू तर पहातेच आहेस कि माझा ह्यात काहीच दोष नाही . मला शक्ती दे . ’ रॉड्रिकने डोळे उघडले . बाजूला एलिना कडे पाहिलं ती अजूनही डोळे मिटून प्रेअर करत होती … ती काय प्रेअर करत असेल हे रॉड्रिकला माहित होतं . ती प्रेअर करताना फार सुंदर दिसत होती … इनोसंट …! रॉड्रिक तिच्याकडे पहात तसाच उभा राहिला . त्याला असलेलं टेन्शन तो विसरून गेला , त्याला वाटत होतं कि तिची ही प्रेअर अशीच चालू राहावी …

क्रमशः

https://kathakadambari.com

माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users