बाप्पा

Let's hope for the best !

Submitted by विशाल कुलकर्णी on 4 October, 2010 - 08:43

खुदाने विचारलं बाप्पाला...
का रे बाबा, तू कुठल्या धर्माचा?
बाप्पा म्हणाला...
ये शाने, गाली देनेका काम नै!
कसला धर्म अन कसली जात रे बाबा..?
तु आणि मी काय वेगळे आहो का?

पण हे त्यांना कुठे पटतय?
तसं नाही रे बाबा...
म्हणजे बघ...
आपण सृष्टी निर्माण केली....
हो ना....., वनस्पती, प्राणी...
मग आपण माणुस निर्माण केला...!

त्या माणसानेच सगळा घोटाळा केला बघ...
बाप्पा, खुदकन हसला...
तुला सांगितलं होतं मी..
नको त्या भानगडीत पडू...
वनस्पती, प्राणी ठिक..., पण माणुस...?
हे प्रकरण आपल्याला झेपणारं नाहीये रे बाबा !

डोक्यावर हात मारुन खुदा म्हणाला...

गुलमोहर: 

बस्स..., बहोत हो गया भिडू....!

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 September, 2010 - 01:39

आत असताना कधीकधी...
फारच एकटेपणा जाणवायचा
मग माझी चुळबुळ सुरू व्हायची
नेमका त्याचवेळी तो...
आईच्या पोटाला कान लावायचा...
ती उब जाणवून मी म्हणायचो...
बाबा, खुप एकटं एकटं वाटतय रे...
बाबा हसुन म्हणायचा....

"बाप्पा आहे ना ......!"

आपल्या पायातली ताकद जोखत
जेव्हा पहिलं पाऊल टाकलं...
तेव्हा हातात बाबाचं बोट होतं..
मी दुसरा हात पुढे केला...,
बाबा हसुन म्हणाला...
दोन्ही हात मीच धरले तर...
त्याच्यासाठी काय उरेल?
त्याच्यासाठी...?

"बाप्पा आहे ना....!"

नोकरीसाठी पहिली मुलाखत ...
जाताना आई-बाबाला नमस्कार केला
आता पण असेल का रे बाप्पा सवे?
बाबा हसला, हसुन म्हणाला...

गुलमोहर: 

Miss You गणपती बाप्पा........!

Submitted by जग्या on 17 September, 2010 - 22:12

गणपती बाप्पा जेम्वा आले घरी
सारे वातावरण झ्हाले एकदम सही
बाप्पा बसण्या आधीपासूनच होती
मोदक खायची आमची घही Wink

बाप्पांच्या पूजेचा तयारी मध्ये
आई ची धांदल असतेच म्हणा
आरतीच्या प्रसादाची आमची मागणी
"बाबा चितळ्या न कडून बाखरवडी आणा " Happy [सणासुदीत पण दुपारी १ ते ४ बंद ]

बाप्पांच्या आरतीला दिला प्रत्तेकाने
मस्त टाळ्या न चा सुरेल कोरस
आरतीचे ताम्हण जरी हातात नसले
तरी घंटी वाजवायला होती आमची चुरस Wink

बाप्पांची भक्ती करण्याचा
सार्वजनिक मंडळांचा होता वेगळाच थाट
सकाळीच तेवढी लता बायींची रेकॉर्ड
अन दिवसभर हिमेश ची गाणी भन्नाट

शब्दखुणा: 

बाप्पा मोरया रे !! (एक कविता)

Submitted by जग्या वालचंदनगरी on 11 September, 2010 - 01:02

बाप्पा मोरया रे !!

गणपती बाप्पा आले कि घरी
सारे वातावरण होते एकदम सही
बाप्पा बसण्या आधीपासूनच
मोदक खायची आमची घही Wink

बाप्पांच्या पूजेचा प्रसाद तेवढा
फक्कड हवा एवढे तुम्ही जाणा
जमत नसेल किंवा आळस असेल तर
सरळ "चितळ्या" न कडून आणा Happy [सणासुदीत पण दुपारी १ ते ४ बंद ]

बाप्पांच्या आरतीला देतो प्रत्येक जण
मस्त टाळ्या न चा सुरेल कोरस
आरतीचे ताम्हण जरी हातात नसले
तरी घंटी वाजवायला आमची चुरस

बाप्पांची भक्ती करण्याचा
सार्वजनिक मंडळांचा असतो वेगळाच थाट
सकाळीच तेवढी लता बायींची रेकॉर्ड
अन दिवसभर हिमेश ची गाणी भन्नाट

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - बाप्पा