Let's hope for the best !

Submitted by विशाल कुलकर्णी on 4 October, 2010 - 08:43

खुदाने विचारलं बाप्पाला...
का रे बाबा, तू कुठल्या धर्माचा?
बाप्पा म्हणाला...
ये शाने, गाली देनेका काम नै!
कसला धर्म अन कसली जात रे बाबा..?
तु आणि मी काय वेगळे आहो का?

पण हे त्यांना कुठे पटतय?
तसं नाही रे बाबा...
म्हणजे बघ...
आपण सृष्टी निर्माण केली....
हो ना....., वनस्पती, प्राणी...
मग आपण माणुस निर्माण केला...!

त्या माणसानेच सगळा घोटाळा केला बघ...
बाप्पा, खुदकन हसला...
तुला सांगितलं होतं मी..
नको त्या भानगडीत पडू...
वनस्पती, प्राणी ठिक..., पण माणुस...?
हे प्रकरण आपल्याला झेपणारं नाहीये रे बाबा !

डोक्यावर हात मारुन खुदा म्हणाला...
बघ ना..., आता ही माणसे आपसातच भांडतात...
हिंदु, मुस्लिम, शिख ..इसाई म्हणुन
नेहमी एकमेकांचे गळे पकडतात...
आपण माणुस आहोत.... माणुस...!
हे मात्र सोयिस्कररित्या विसरतात....

आरशात बघत, त्या आतल्याला डिवचत
बाप्पा मिस्कीलपणे म्हणाला...
बघ रे खुदा, शब्द जपून वापर...,
नाहीतर स्वतःच्याच शब्दात अडकशील
हिंदु, मुस्लिम, शिख , इसाईंचा विचार करताना..
बौद्धांना विसरशील आणि पक्षपाती ठरशील...!

खरय रे बाबा, खरं बोललास अगदी...
परिस्थिती हाताबाहेर गेलीय खरी..
पण खरे सांगु बाप्पा...
मी अजुनही आशावादी आहे...
माणसातला माणुस जागा होण्याची वाट पाहतोय...
Let's hope for the best !

अजुनही आपण मंदीर आणि मशिदीचा विचार करणार आहोत का?
सौजन्य : सागर नेरकर यांचा बझ
58847_10150254641065650_515425649_14818092_7917200_n.jpg

इरसाल म्हमईकर

,

गुलमोहर: 

Let's hope for the best ! >>> छानच आहे.

पण कैच्यकै मधे का Uhoh

मस्त जमलीय !
पण कायच्याकाय मध्ये काय ? कवितेत हलवा बघू !
>>>आपण माणुस आहोत.... माणुस...!
हे मात्र सोयिस्कररित्या विसरतात....
....................................
माणसातला माणुस जागा होण्याची वाट पाहतोय...
Let's hope for the best ! <<<
चाऊ म्हणतात तसं >>>उपरवालेनेच होप सोडली तर मात्र काय खर नाय!<<<

खुदाने विचारलं बाप्पाला...
का रे बाबा, तू कुठल्या धर्माचा?
बाप्पा म्हणाला...
ये शाने, गाली देनेका काम नै!
कसला धर्म अन कसली जात रे बाबा..?
तु आणि मी काय वेगळे आहो का

एकदम मस्त. दिलसे. !!

Let's hope for the best !>>>>> खरंय रे दादा...ह्या आशेवरच सगळं आहे.
एकदम शार्प, क्लीअर कविता झालीये विशाल दादा..छान!