मायबोली गणेशोत्सव २०१९

सोळा आण्याच्या गोष्टी - कूल मॉम-आशिका

Submitted by आशिका on 13 September, 2019 - 21:58

"अभ्या, चल उशीर झालाय आधीच. आपण काय या ऱोहनसारखे लकी थोडीच आहोत? त्याची मॉम एकदम कूल आहे. आपलं आहे का तसं? घरी प्रवेशताच प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरं जावं लागतंय आपल्याला रोज, वीट येतो अगदी."

अभि आणि जितुचा हा नेहमीचा, मैदानात खेळतानाचा ठरलेला डायलॉग, रोहन कायमच हसत ऐकायचा. क्वचित दुजोराही द्यायचा, "हो आहेच माझी मॉम एकदम कूल. नाही विचारत मला उशीरा येण्याचं किंवा कमी मार्क्स पडल्याचं कारण".

"ग्रेट यार, आम्हाला भेटायचंय एकदा तुझ्या मॉमला ".

ठरल्याप्रमाणे ऱोहन घेऊन आला आपल्या मित्रांना मॉमला भेटवायला, तिच्या खोलीत.

विषय: 

सोळा आण्याच्या गोष्टी - इजा बिजा...- कविन

Submitted by कविन on 12 September, 2019 - 13:02

गॅलरीत कावळा कधीचा केकाटत होता. "आता नको रे बाबा कोणी पाहुणा!" म्हणत ती उठायला गेली तर ओल आलेल्या फरशीवरुन तोलच गेला.

आज काही खरं नाही सकाळी पायऱ्यांवरुन पडत होते. इजा झालं बिजा झालं, मन परत अस्वस्थ झालं. तिने मूड बदलायला रेडीओ सुरु केला.

"तू जहां जहां चलेगा मेरा साया.." स्वरांनी कानाला हलकेच स्पर्श केला. हेच गाणं का? तिला अजूनच अस्वस्थ वाटायला लागलं. चॅनल बदलून ती दिवा लावायला उठली.

सोळा आण्याच्या गोष्टी - घटनाक्रम - कविन

Submitted by कविन on 12 September, 2019 - 01:16

घटना घडत गेल्या, क्रम काहीही असेल याचा.

थांब ॲडम! ती विनवणीच्या स्वरात म्हणाली. माझा श्वास थांबला एक क्षण.

त्या बंद दारापलिकडे म्हणे सैतानाचे राज्य आहे आणि कसलेसे संस्कार केलेल्या मंतरलेल्या धाग्याने म्हणे त्याला रोखून धरलय. बूलशीट! या अंधश्रद्धेलाच मला तोडायचे आहे.

तिच्या म्हाताऱ्या हाताचा खरखरीत स्पर्श गालाला झाला. फूल पडलेल्या डोळ्यातून अश्रू तिच्या गालावर ओघळले.

“ती सैतानाची खोली आहे. त्याला बाहेर येऊ दिला तर अनर्थ होईल. काळजी वाटते रे मला तुझी” ती कळवळून म्हणाली.

म्हातारी सरणावर गेली. मी दोर कापून टाकला. दार उघडले. खोल भरून श्वास घेतला.

सोळा आण्याच्या गोष्टी - चक्रव्यूह- कविन

Submitted by कविन on 11 September, 2019 - 12:52

किती पावलं चालले असेन? १०००? २०००? आणि किती बाकी आहेत? काहीच कळेना आता. परत फिरले तर बाहेर पडायची वाट तरी सापडेल का माहिती नाही.

“फार काही वेळ नाही लागणार मला. पायाखालची तर वाट आहे माझ्या” असं ऐकवलं होतं ना मी, मला जाण्यापासून अडवल्यावर?”

पण हा रस्ता, या गल्ल्या.. चकवा लागल्यासारखं झालय मला. बहूतेक मी फिरुन परत तिथेच येतेय. मंद सुगंधाची गल्ली लागली होती मगाशी. बहूतेक त्याच्या पुढच्या वळणावर आहे एक्झिट. पण ती गल्ली परत फिरुन लागतच नाहीये. I am sorry dear, you were right हे चक्रव्यूह भेदायची ताकद नाहीये माझ्यात. ’down the memory lane’ मधे आज माझा अभिमन्यु झाला गं.

सोळा आण्याच्या गोष्टी- साखरझोप - कोहंसोहं१०

Submitted by कोहंसोहं१० on 5 September, 2019 - 14:23

"आत्ताशी ५:३० वाजलेत...आज लवकर जाग आली.... सुपू उठायला अजून तासभर आहे.... परत झोपावं का? जाऊदे उठतेच.
आज एकदम फ्रेश वाटतंय... अंगही हलकं झालय....गुडघ्याचं दुखणंही खूप कमी झालंय..देशपांडे डॉक्टरचं तेल उपयुक्त आहे म्हणजे….आता उठलेच आहे तर मस्त फिरून येऊ...
अरेरे बाळू जरा जपून चालवावी सायकल.... पडले असते ना मी....ओरडून सुद्धा न ऐकता गेला...काय हल्लीची मुले...
हुश्श... थोडक्यात वाचले....नाहीतर छोटूचा पेपर बाल्कनीत पडण्याआधी मला पाडून गेला असता... बरंय लगेच खाली वाकले....
अहाहाहा...मस्त गार हवा...मनमोहक निसर्गसौंदर्य....अप्रतिम सूर्योदय…

विषय: 

सोळा आण्याच्या गोष्टी - दुरुस्ती - अमितव

Submitted by अमितव on 4 September, 2019 - 20:02

पहिलीचा वर्ग. राष्ट्रगीत संपवून बाई लहानग्याचे ग्रूप पाडताहेत.
शहरातली रात्र. क्लबबाहेर तरुणांची गर्दी. हास्यविनोद रंगलेत. आतून संगीताचे आवाज आणि आपल्याला कधी आत जायला मिळेल आणि कोण भेटेल अशी मनात हुरहुर.
मोठ्ठ्या मैदानात गाण्याचा कार्यक्रम चालू आहे, श्रोतृवृंद एका बहारदार क्षणी टाळ्यांचा कडकडाट करतोय.
वीकांताला समुद्रकिनार्‍यावर ब्लँकेटवर शांतपणे वाचत बसलोय, मुलं किल्ला करताहेत पाण्यात डुंबताहेत, बार्बेक्यू आणि भुट्ट्याचा वास नाकाला हुळहुळतोय.
ऑफिसातलं हॉलिडेज पॉटलक उरकलं की एअरपोर्टला कारपूल करायचं का असं तो तिला विचारतोय.

विषय: 

सोळा आण्याच्या गोष्टी- वारस - कोहंसोहं१०

Submitted by कोहंसोहं१० on 4 September, 2019 - 17:32

पाटीलसाहेबांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला निष्प्राण देह, बाजूला अर्धवट नशेत बसलेला साहेबांचा मुलगा अन वर्गमित्र रमेश, त्याच्या हातातली पिस्तूल, कोपऱ्यात विमनस्क बसलेली त्याची गर्भवती पत्नी लीना हे दृश्य पाहून इन्स्पेक्टर विजयच्या डोळ्यातही अश्रू तरळले. पिस्तूल, दारूची बाटली, घराची कागदपत्रे, रमेशच्या हाताचे ठसे त्याने गोळा करून तपासासाठी पाठवले. घर नावावर करावे यासाठी रोज रात्री दारू पिऊन रमेशची पाटीलसाहेबांशी भांडणे होत हे माहित असूनही रमेश खून करेल हे विजयला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते.

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०१९