सोळा आण्याच्या गोष्टी - दुरुस्ती - अमितव

Submitted by अमितव on 4 September, 2019 - 20:02

पहिलीचा वर्ग. राष्ट्रगीत संपवून बाई लहानग्याचे ग्रूप पाडताहेत.
शहरातली रात्र. क्लबबाहेर तरुणांची गर्दी. हास्यविनोद रंगलेत. आतून संगीताचे आवाज आणि आपल्याला कधी आत जायला मिळेल आणि कोण भेटेल अशी मनात हुरहुर.
मोठ्ठ्या मैदानात गाण्याचा कार्यक्रम चालू आहे, श्रोतृवृंद एका बहारदार क्षणी टाळ्यांचा कडकडाट करतोय.
वीकांताला समुद्रकिनार्‍यावर ब्लँकेटवर शांतपणे वाचत बसलोय, मुलं किल्ला करताहेत पाण्यात डुंबताहेत, बार्बेक्यू आणि भुट्ट्याचा वास नाकाला हुळहुळतोय.
ऑफिसातलं हॉलिडेज पॉटलक उरकलं की एअरपोर्टला कारपूल करायचं का असं तो तिला विचारतोय.
जुळ्यांना जन्म देऊन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर आई-बाबांच्या तोंडावरचं हसू लपत नाहीये, दोघे लहानग्यांना छातीशी घट्ट धरून बाथटब, डायपर घेऊन चेकाऊटला येताहेत.

आणि.... ठो! ठो! ठो! कानठळ्या बसवणारा आवाज!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
टीपः- संयोजकांनी कथेचे परिक्षण करणे मान्य नसल्याने जोवर सालाबादप्रमाणे लोकशाही पद्धतीने मतदान होत नाही तोवर कृपया ही कथा स्पर्धेतून बाद समजावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचक आहे.
एकाच माणसाच्या नॉन क्रोनोलॉजिकल आठवणी आहेत की सगळी वेगवेगळी लोकं आहेत आणि कुठेही गोळीबार होऊ शकतो?

टीपः- संयोजकांनी कथेचे परिक्षण करणे मान्य नसल्याने जोवर सालाबादप्रमाणे लोकशाही पद्धतीने मतदान होत नाही तोवर कृपया ही कथा स्पर्धेतून बाद समजावी. >>>>> हे काही समजलं नाही. स्पर्धेचे नियम आधीच स्पष्ट केलेले आहेत. जर तुला नियम मान्य नाहीत तर प्रवेशिका देतोस कशाला? साधी गुलमोहरात लिहा की शशक!
रच्याकने, कथा फारशी आवडली नाही.

Oh Sad

लोकशाही हवी म्हणून 'बाद'शाही सुरू Happy
कथा छान आहे. आवडली. गणपतीच्या वेळेला असं अभद्र नको वाटतं. पण आपल्याला नको वाटतं म्हणून विपरित घडायचं काही थांबत नाही.

मनमानी नियम बदलावे, चांगले आणि जास्त फेअर पायंडे असताना आले संयोजकांच्या मना म्हणून केलेले नियम बदलावे.
असे नियम का बदलले हे कोणी विचारल्यावर सरळ तो धागाच उडवणे, नंतर प्रतिक्रिया उडवणे आणि धागा परत आणणे. त्या धाग्यात तो नियम नसणे पण इतर स्पर्धात तोच नियम असणे, त्याचे कसलेही स्पष्टीकरण न देणे अत्यंत उर्मटपणाचे आहे. त्या विरुद्ध बोलण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. स्पर्धेत भाग घ्यायची अर्थात इच्छा आहे.

कोण माथेफिरू कधी गोळीबार करेल आणि रंगाचा बेरंग होऊन निष्पाप लोकांचा बळी जाईल याची कसलीही शाश्वती आजकाल राहीली नाही. आहे तोपर्यंत दिवस आपला म्हणायचं. हे असं कधीही कुठेही कुणाच्याही बाबतीत घडू शकते. Sad

खरय ! माथेफिरुंच्या हातात बंदुका आल्यावर काय घडते हे बर्‍याच वेळा वाचले आहे. निष्पापांचा मात्र बळी जातो. कथा आवडली. वास्तव आहे हे. Sad

एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी केलेली बॉम्बस्फोट मालिका नसावी ही. तो आवाज धडाम धुडूम असतो, हा ठो ठो आहे.

मलातरी अमेरिकेत शाळेत, क्लबमध्ये वगैरे वेगवेगळ्या वेळी झालेले गोळीबार आणि गन्स कंट्रोल ऍक्ट 'दुरुस्ती'बद्दल वाटली गोष्ट.
किंवा यातील कोणत्यातरी एका घटनेत गोळी लागून मरताना एका व्यक्तीच्या डोळ्यापुढून गेलेल्या आठवणी (किंवा भविष्याविषयी पाहिलेली स्वप्न).

असे नियम का बदलले हे कोणी विचारल्यावर सरळ तो धागाच उडवणे, नंतर प्रतिक्रिया उडवणे आणि धागा परत आणणे. त्या धाग्यात तो नियम नसणे पण इतर स्पर्धात तोच नियम असणे, त्याचे कसलेही स्पष्टीकरण न देणे अत्यंत उर्मटपणाचे आहे. त्या विरुद्ध बोलण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. स्पर्धेत भाग घ्यायची अर्थात इच्छा आहे. >>>>> धागा उडवणे, प्रतिक्रिया उडवणे वगैरे परमिशन्स संयोजक मंडळाला नसतात. हे अ‍ॅडमिन किंवा वेमांना करावे लागते (निदान मी मंडळात होतो तेव्हा तरी असच होतं.) अ‍ॅडमिन आणि वेमा ही काय राष्ट्रपती किंवा राणी सारखी नामधारी पदं नाहीयेत की मंडळाने सांगितलं आणि त्यांनी हो म्हंटलं. Happy वेमांनी मागेच स्पष्ट केलं आहे की मायबोली ही खाजगी जागा आहे. त्यामुळे इथे घडणारं पटत नसेल तर तुमचा प्रश्न.

मनमानी नियम बदलावे, चांगले आणि जास्त फेअर पायंडे असताना आले संयोजकांच्या मना म्हणून केलेले नियम बदलावे. >>>>> आधीच्या मंडळांनी काही पायंडे पाडले म्हणून नव्या मंडळाने ते पाळलेच पाहीजेत असं नाही. नवीन मंडळ त्यांना हवे ते बदल करूच शकते. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अजून दिलेली नाहीत हे बरोबर आहे. पण मला खात्री आहे की मंडळाच्या आत त्याबद्दल जोरदार चर्चा नक्कीच सुरू असेल. अश्या नाजूक प्रश्नांवर उत्तर देताना त्याचा प्रचंड कीस पाडावा लागतो कारण त्या उत्तरांचा लोकं त्याहून जास्त कीस पाडतात आणि एखाद्या शब्दावरून गदारोळ माजवतात! (तू मंडळात होतास बहुतेक, तुला हे माहीत असेलच). त्यामुळे जरा वेळ गेला तरी ठिकच.

ती तळटीप उगीच "क्रांती" वगैरे करायचा आव आणून टाकल्यासारखो वाटते आहे आणि माझा आक्षेप त्याला
आहे.

न्यू टाऊन, फ्लोरिडातला क्लब, एक पाकिस्तानी कपलवाला आणि शेवटचा वॉलमार्टमधला एवढे चटकन आठवले.
मैदान आणि बीच संदर्भातला नाही आठवला... बरेच झाले. चटकन विसरले जात नाहीत असे प्रसंग.
ह्या निमित्ताने ने तू कथा लिहायला लागलास हे छानच झाले.

धडाम नसून ठो ठो आहे म्हणजे मास शूटींग्स चा संदर्भ आहे असे मला वाटते. कल्पना चांगली इम्प्लिमेन्ट केलीयेस अमित! Happy

ओह! तो मैदानात गाण्याचा कार्यक्रम म्हणजे वेगास वाला का?

दुरूस्ती.. माझ्या मते हे प्रत्येक प्रसंग घडवून आणणार्‍यांचे ईप्सित होते.

सर्वांना धन्यावाद. Happy
मास शूटिंग बद्दलच लिहायचा प्रयत्न होता. दुसरी घटनादुरुस्ती आणि त्याचे विचित्र इंटरप्रिटेशन आणि तयार झालेल्या आजच्या परिस्थितीवर. अर्थात सँडी हुकला होक्स ठरवणारे चिक्कार लोक आहेत इथे. आणि त्यानंतरही काही ढिम्म होत नाही सो काही बदलेल अशी अजिबात आशा नाही. सॉरी गणपतीत ग्लूमी लिहिलंय. पण असेच देखावे आणि विषय मांडत रहावे असं वाटतं.

रश्मी, माथेफिरू सगळ्या जगात सारखेच डिस्ट्रिब्युट झाले असतील. व्ह्यायोलंट व्हिडिओ गेम्स सगळ्या जगात कमी जास्त प्रमाणात सारखेच खेळले जात असतील. पण या प्रमाणात मास शूटिंग फक्त अमेरिकेतच होतात. सहज बंदुका मिळणे आणि 'सेल्फ प्रोटेक्शनला' एके ४७ आणि अविरत गोळ्या उडत रहातील अशी काडतुसं किराण्याच्या दुकानात काहीही चेक न करता मिळणे ही मुख्य समस्या आहे आणि तुमच्या वाक्यातला 'बंदुका आल्यावर' हा पार्ट जास्त महत्त्वाचा आहे. गोळ्या घालायला माथेफिरू असणे ही अट नाहीच आहे ना?

चंद्रा, शीर्षक आधी 'दुसरी दुरुस्ती' देणार होतो. पण त्याने शीर्षकात किंवा कथा वाचायला सुरुवात केल्यावर लगेचच समजुन जाईल आणि की काय असं वाटू लागलं. धक्का शेवट पर्यंत रहावा म्हणून मग 'दुसरी' शब्द काढून टाकला. आणखी काही समर्पक सुचलं तर बघतो.

पराग, 'ही खाजगी जागा आहे' हे माझ्या मनात मी कोरुन ठेवलं आहे. पण म्हणून मी मनमानी झाली/ चुकीचं काही होत असेल तर गप्प बसावं अशी अ‍ॅडमिन वेमांची इच्छा असेल तर ते गप्प कसं करायचं हे त्यांना पक्क माहित आहे.
बाकी क्रांती वगैरे काही नाही. इफ यू सी समथिंग से समथिंग इतकं सिंपल आहे हे.

गोळ्या घालायला माथेफिरू असणे ही अट नाहीच आहे ना?
>> पोलिस, आर्मी वगैरे लोकांकडे नेहमीच बंदुका असतात म्हणून ते गोळ्या मारत सुटत नाहीत.

क्रांती" वगैरे >>> डोक्याला मुंडासे बांधलेला , हातात दंबुक घेतलेला , कमरेला काडतुसाची माळ असलेला, कपाळावर भला मोठा टिळा लावलेला अमितकुमार आपलं ते हा अमितव डोळ्यासमोर आला ..
अमित Light 1 Light 1 दीपत्कार Wink

पोलिसांना किमान प्रशिक्षण, काटेकोर सेवा नियम, डिएस्कलेशन ट्रेनिंग इ. असतं. आणि 'नॉर्मल' पोलिसांकडे सेवेत असताना असॉल्ट व्हेपन्स नसतात. इथे विषय मास किलिंग्जचा आहे म्हणून थांबतो. पण पोलिस ब्रुटॅलिटी हा वेगळा आणि तितकाच महत्त्वाचा विषय आहे.
अहो दोन वर्षाच्या मुलाच्या हातात बंदुक पडून त्याच्या आईवर गोळ्या झाडल्या जातात...
सॅन फ्रान्सिस्को मध्ये बोर्ड ऑफ सुपरवायझर्सनी एनआरए ही डोमेस्टिक टेररिस्ट संघटना आहे असं कालच जाहिर केलं. होपफुली आमचं राज्य आणि इतर सिटी फॉलो करतील.

मी मनमानी झाली/ चुकीचं काही होत असेल तर >>>>> Happy संयोजकआंनी केलेली प्रत्येक गोष्ट ही मनमानीच असते. कारण ती त्यांनी त्यांच्या मनाने केलेली असते. संयोजक म्हणून तेच करणं अपेक्षित आहे. चुकीचं होतं आहे असं तुला "वाटतं आहे". Theoretically त्यांनी कोणताही नियम मोडलेला दिसत नाहीये. कारण स्पर्धेचा निकाल कसा लावायचा ह्याबद्दल मायबोलीवर कुठलाही नियम नाहीये. कोणाला पतत नसेल तर प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही. पण मी वर म्हटलं तसं स्पर्धेचे नियम पटत नसल्यास स्पर्धेसाठी प्रवेशिका न देता ही कथा गुलमोहरात लिहीता येऊच शकली असती. असो. हेमाशेपो. Happy

मला जे चूक वाटतं ते मी बोललो. आणि नुसत्या पोकळ कमेंट करण्यापेक्षा ज्या प्लॅटफॉर्मवर घडतंय त्याचा भाग होऊन बोलणं जास्त महत्त्वाचं म्हणून त्याचा भाग होऊन बोललो. गुलमोहोरात लिही सांगुन तू मला गप्प करायला का जातोयस?
असो आणखी बोलायचं असेल तर दुसरीकडे बोलू.

बार मध्ये बोलावे. थोडी थोडी घेत चर्चा सुरू करायची. फार चढेल इतकी घ्यायची नाही हं. नाहीतर मनमानी वाढेल. Light 1

चंद्रा, शीर्षक आधी 'दुसरी दुरुस्ती' देणार होतो. पण त्याने शीर्षकात किंवा कथा वाचायला सुरुवात केल्यावर लगेचच समजुन जाईल आणि की काय असं वाटू लागलं. धक्का शेवट पर्यंत रहावा म्हणून मग 'दुसरी' शब्द काढून टाकला. आणखी काही समर्पक सुचलं तर बघतो. >>> अमेरिकेत स्थायिक लोकांनाच हा संदर्भ समजेल. आणि हा संदर्भ माहित असतानादेखिल ते पूर्णपणे रँडम प्रसंग वाचताना हा विषय असेल असे वाटेल असे मला वाटत नाही. मी काही अमेरिकेत राहात नाही त्यामुळे खात्री नाही.
कथा आणि धक्का छान जमलाय.

Pages