माझे क्रश (द्विशतशब्दकथा)

Submitted by Aditiii on 27 January, 2019 - 23:49

आज मला तो दिसला, काय क्युट दिसत होता म्हणून सांगू? निळा रंग त्याला शोभून दिसत होता. अर्थात कुठलाही रंग छानच दिसतो. आहेच तो इतका हँडसम. माझी निवड काही अशीतशी नसते. आधीचा पण असाच होता, खरंतर ह्याच्या पेक्षा छान. अगदी बॉलीवूड हिरो. पण काय करायचं? मला समजून घ्यायची, माझ्या बरोबर राहायची त्याची इच्छाच नसायची. सारखा लांबच राहायचा. मी जरा काही बोलायला गेले किंवा काही केलं तरी डोकं फिरल्यासारखं आरडाओरडाच करायला लागायचा. असा राग यायचा ना मला. तशी मी काही वाईट नाही दिसायला आणि सगळ्यांचंच कमी जास्त असतंच. पण माणसाचा स्वभाव पण बघावा ना. पण ह्यांचं आपलं वेगळंच. आधी तर मी अस्तित्वात आहे हेच त्याला माहित नव्हतं. मग मी जरा त्याला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली तेव्हा कुठे त्याला मी आहे ह्याची जाणीव झाली. पण ते सगळं आता मागे पडलं, तसं म्हणाल तर माझ्या प्रेमाची त्याला कदरच नव्हती. त्यामुळे मला हि काही फार वाईट वाटलं नाही, आमचं जमलं नाही ह्याचं . आता हा माझा नवीन क्रश आहे. ह्याला मात्र मी हातातून जाऊन देणार नाही. ह्या वेळेस जरा वेळ द्यायला हवा. हळुवार सुरुवात हवी. उगाच मागच्या वेळेसारखं काहीतरी होऊन बसायचं.

आधीचा काही दिवसांत भितीनी गचकला तसा ह्याला घालवून चालणार नाही.

Group content visibility: 
Use group defaults

मस्त जमलीय.
शेवटचे वाक्य नसते तर You मालिकेचा स्त्रीअवतार वाटतोय अगदी!

विजय देशमुख, सस्मित, एमी, हर्पेन, वावे, शब्दरचना धन्यवाद.

हर्पेन तुमचा मुद्दा अगदी मान्य. पण सगळेच काही भटकत नसावेत व नायिकेला जिवंत माणसांमध्ये जास्त रस आहे.

एमी, You मालिका कोणती? पाहिली नाही. पण गुगलून पाहीन.

शेवटचे वाक्य उडवले आहे.

L Lawliet, विनिता. झक्कास, धन्यवाद.

किल्ली तुम्हाला खास धन्यवाद, तुमच्या कथेवरून प्रेरणा मिळाली. पुढचा भाग म्हणायला हरकत नाही.