पुल

पुलंच्या लेखनातील पूर्ववाङ्मयीन (गाळीव/न कळीव) संदर्भ

Submitted by हरचंद पालव on 18 June, 2022 - 10:28

विल्यम हेझ्लट नावाचा एक जुना इंग्रजी साहित्यिक म्हणून गेला आहे, की हास्य आणि रुदन हे 'काय आहे' आणि 'काय असायला हवं' ह्यातल्या फरकावर अवलंबून असतात. जेव्हा वस्तुस्थिती ही आपल्याला ह्या फरकामुळे दु:ख देते तेव्हा आपण रडतो आणि जेव्हा अनपेक्षित आनंद देते तेव्हा आपण हसतो. पुढे मराठीत आचार्य अत्र्यांनी त्यांच्या 'विनोदाचे व्याकरण' ह्या विषयावरील व्याख्यानातही 'विनोद हा, काय आहे आणि काय असायला हवं, ह्यातल्या फरकावर अवलंबून असतो' अशीच सोपी व्याख्या केली आहे. काही विनोद हे त्यात 'काय हवं' हे आपल्याला माहीत नसेल तर कदाचित तितके भावतीलच असं नाही.

रसिकता वाढत चाललीय......

Submitted by डॉ अशोक on 20 April, 2018 - 00:35

काही बदलांची नोंद. रसिकता वाढत चाललीय. झाकिर हुसेनचा तबला, किशोरी आमोणकरांची दुर्मिळ रेकार्डींग, वसंतरावांचं गाणं कुणीतरी कुठूनरी शोधून काढतं. नक्की ऐका आणि पुढे पाठवा असा आग्रह असतो. कधी। पुलं, अत्रेंचा किस्सा येतो.. बऱ्याचदा ऐकलेला असतो. पण। पाठवणारानं पहिल्यांदाच ऐकलेला असतो. त्याचाही नाईलाज असतो. मग कुणी तरी कधीतरी संदीप खरेची "दमलेला बाबा" वाचून कासावीस होतं. आपण एकट्यानंच का कासावीस व्हायचं? हा सुविचार मनात घेऊन मग। तो इतरांना कासावीस करायला धडाधडा पोस्ट करत सुटतो. तत्वज्ञानाला आता कधी नाही इतके चांगले दिवस आलेत.

शब्दखुणा: 

तीन पैशाचा तमाशा!

Submitted by चिमण on 11 December, 2016 - 14:10

१९७८ मधे पुलंचा तीन पैशाचा तमाशा मी प्रथम पाहिला आणि त्यानं मला झपाटलं. फक्त माझीच नाही तर तेव्हाच्या सर्व तरुण वर्गाची हीच अवस्था होती! सुमारे १०/१२ वेळा तो तमाशा मी पाहिला असेन. तो ब्रेख्टच्या थ्री पेनी ऑपेराचं स्वैर रुपांतर आहे असं कळल्यावर मूळ ऑपेरा बघणं अपरिहार्यच होतं. तमाशा बघताना असं कुठेही जाणवत नाही की आपण हे रुपांतर बघत आहोत इतकं पुलंनी ते रुपांतर चपखल आहे, आपलंसं करून टाकलं आहे. त्यामुळेच मूळ नाटकात नक्की काय होतं आणि पुलंनी रुपांतर करताना कुठे आणि कसे बदल केले हे समजून घेण्यात मला स्वारस्य होतं. पण ते नाटक बघण्याचा योग बरीच वर्ष काही आला नाही.

शब्दखुणा: 

विनोदाशी जडले नाते

Submitted by मंदार शिंदे on 22 August, 2010 - 19:11

"ह्या जगात येताना जसा गुपचुप आलो, तसा जाताना देखील आपल्या हातून या जगाला फारसा धक्का न लावता निघून जाण्याची इच्छा बाळगणारा असा मी एक असामी आहे." हे उद्गार आहेत, आपल्या निखळ विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवत राहणार्‍या एका असामान्य 'वल्ली'चे अर्थात्‌ आपल्या सर्वांच्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांचे !

गुलमोहर: 
Subscribe to RSS - पुल