रसिकता

रसिकता वाढत चाललीय......

Submitted by डॉ अशोक on 20 April, 2018 - 00:35

काही बदलांची नोंद. रसिकता वाढत चाललीय. झाकिर हुसेनचा तबला, किशोरी आमोणकरांची दुर्मिळ रेकार्डींग, वसंतरावांचं गाणं कुणीतरी कुठूनरी शोधून काढतं. नक्की ऐका आणि पुढे पाठवा असा आग्रह असतो. कधी। पुलं, अत्रेंचा किस्सा येतो.. बऱ्याचदा ऐकलेला असतो. पण। पाठवणारानं पहिल्यांदाच ऐकलेला असतो. त्याचाही नाईलाज असतो. मग कुणी तरी कधीतरी संदीप खरेची "दमलेला बाबा" वाचून कासावीस होतं. आपण एकट्यानंच का कासावीस व्हायचं? हा सुविचार मनात घेऊन मग। तो इतरांना कासावीस करायला धडाधडा पोस्ट करत सुटतो. तत्वज्ञानाला आता कधी नाही इतके चांगले दिवस आलेत.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रसिकता