पुलं

पुलंच्या लेखनातील पूर्ववाङ्मयीन (गाळीव/न कळीव) संदर्भ

Submitted by हरचंद पालव on 18 June, 2022 - 10:28

विल्यम हेझ्लट नावाचा एक जुना इंग्रजी साहित्यिक म्हणून गेला आहे, की हास्य आणि रुदन हे 'काय आहे' आणि 'काय असायला हवं' ह्यातल्या फरकावर अवलंबून असतात. जेव्हा वस्तुस्थिती ही आपल्याला ह्या फरकामुळे दु:ख देते तेव्हा आपण रडतो आणि जेव्हा अनपेक्षित आनंद देते तेव्हा आपण हसतो. पुढे मराठीत आचार्य अत्र्यांनी त्यांच्या 'विनोदाचे व्याकरण' ह्या विषयावरील व्याख्यानातही 'विनोद हा, काय आहे आणि काय असायला हवं, ह्यातल्या फरकावर अवलंबून असतो' अशीच सोपी व्याख्या केली आहे. काही विनोद हे त्यात 'काय हवं' हे आपल्याला माहीत नसेल तर कदाचित तितके भावतीलच असं नाही.

पु.लं. स्पर्श - विशेष लेख - शाली

Submitted by मभा दिन संयोजक on 2 March, 2019 - 01:46

सांगायचं म्हटलं तर ‘अफाट’ या एकाच शब्दात पुलंची कहाणी सांगता येईल पण लिहायचं ठरवलं तर मात्र हजारो
पानांचे खंड लिहूनही त्यात पुलंना पकडता येईलच याची खात्री नाही. काय लिहायचं भाईंविषयी? त्यांच्या
लेखनावर लिहायचं की त्यांच्या संगीतावर लिहायचं, त्यांच्या अभिनयावर लिहायचं की एक माणूस म्हणून
त्यांच्यातल्या नैतिकतेविषयी लिहायचं, दातृत्वाविषयी लिहायचं की समाजाचे ऋण फेडण्याच्या त्यांच्या
प्रामाणिक वृत्तीबद्दल लिहायचं? एका माणसात खरं तर किती गुण विधात्याने द्यावेत याला काही मर्यादा

शब्दखुणा: 

मला ' दिसलेले' पुलं : थोडे वेगळे पैलू

Submitted by वावे on 28 February, 2019 - 23:31

मराठी भाषा दिवसानिमित्त पुलंबद्दल लिहायचं ठरवल्यावर किती लिहू आणि किती नको असं वाटायला लागलं. कितीही लिहिलं तरी ते कमीच पडेल. यातून मार्ग काढण्यासाठी विनोदी लेखनाच्या पलीकडे असलेले पुलं मला ज्यातून दिसले, त्या पुस्तकांबद्दल आणि कॅसेटबद्दल लिहायचं ठरवलं. अलूरकर म्युझिक हाऊसची ’ एक आनंदयात्रा कवितेची’ ही, पुलं-सुनीताबाईंनी केलेल्या बा. भ.

विषय: 
शब्दखुणा: 

‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव

Submitted by कुमार१ on 14 February, 2019 - 04:20

यंदा पुलंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यासंबंधी बरेच लेखन प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळतो आहे. त्यातून मला हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. एकंदरीत पुलंसंबंधित लेखन वाचताना मला एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे बरीचशी चर्चा ही पुलंच्या हयातीत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पुस्तकांबद्दल असते. त्यातही त्यांचे विनोदी लेखन, व्यक्तीचित्रण आणि शाब्दिक कोट्या हे बहुचर्चित विषय आहेत. या पार्श्वभूमीवर पुलंच्या वैचारिक लेखनाकडे वाचकांचे लक्ष वळवावे या हेतूने हा लेख लिहीत आहे.

विषय: 
Subscribe to RSS - पुलं