सत्य काय,...?
ज्यांच्याकडून भविष्य घडवायचे
त्यांचेच भविष्य घडवले जातात
आपले पदाधिकारी निवडताना
इथे अशिक्षितही निवडले जातात
आता उच्चशिक्षिता पेक्षाही इथे
आम्ही अशिक्षित सरस जाणावा,.!
की आपले भविष्य घडवतानाही हा
मतदारांचा आंधळेपणा म्हणावा,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सत्यापनाची साक्ष
नवा होश,नवा जोश आणि
नव्या उमेदीचे वारे आहेत
एकामागुन एका ठिकाणी
राहूलजींचे दौरे आहेत
यामुळे कुणी आनंदी होईल
तर कुणी तोंडसुखही घेईल
अन् या गोष्टींच्या सत्यापनाला
साक्षीमहाराजही साक्ष देईल,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
आठवणींचे सत्य,...
कधी मनं खुलवणारे असतात
तर कधी हेलावणारे असतात
जिवनामधले कित्येक क्षण
आठवणींत सामावणारे असतात
आठवणींना उजाळा देत-देत
कधी-कधी मनं स्फूरले जातात
तर आठवणींच्या गाभार्यात
कधी मनं गहिवरले जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
मदतीचा हात,...
माणसांमधली माणूसकी
माणसांनीच जपली जावी
आप-आपसातील आत्मीयता
आपुलकीने टिकली जावी
आलेल्या प्रत्येक संकटावर
सहकार्यानं मात पाहिजे
माणसांकडून माणसांसाठी
मदतीचा सदैव हात पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
नुकसान भरपाई,..!
घडलेल्या या घटणेवरती
कुणी निसर्गावर रोष केला
तर जबाबदारी स्वीकारत
कुणी स्वत:लाही दोष दिला
मात्र मानवता जोपासत मदतीला
माणूस इथला थकणार नाही
पण झाल्या नुकसानाची भरपाई
कदापीही होऊ शकणार नाही,.!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
ऐक निसर्गा,...
हे आम्हाला मान्य आहे की
तु नैसर्गिक संपत्ती दिलीस
पण तुलाही मान्य करावं लागेल
की तुही नैसर्गिक आपत्ती दिलीस
मानवी कुकर्माचा सूड म्हणून
जरी तु नैसर्गिक प्रहार आहेस
पण झालेल्या या विध्वंसाचा
तु ही तितकाच गुन्हेगार आहेस
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
नैसर्गिक हाहा:कार
कधी अवकाळ छळतोय
कधी दूष्काळ जाळतोय
कधी भुकंपाचा धक्का
काळजालाच पोळतोय
यात माणसांच्या बळींसह
कुठे निसर्ग सुध्दा ठार आहे
अन् अभुतपुर्व आपत्तीचा
हा नैसर्गिक हाहा:कार आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
हे निसर्गा,...
तुझ्या सौंदर्याचे गाणेही
आम्ही इथे गायली आहेत
तुझी उग्रवादी रूपे ही
सदैव आम्ही पाहिली आहेत
हे निसर्गा सांग असा का
आम्हावरती कोपतो आहेस
कोपता-कोपता आमच्यावर
का स्वत:लाही कापतो आहेस,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
महत्वाचे पदं
ज्याच्याशी मैत्री केली
तो ही कात्रीत बघू शकतो
जवळचा समजला मित्रही
स्वार्थ पाहून वागू शकतो
राजकीय मैत्रीतही कधी
याच सुत्राने वादं असतात
अन् आकड्यांच्या लफड्यांत
सदा महत्वाचे पदं असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
पोलिस
जनतेच्या रक्षकांकडून
जनतेवरच वार आहेत
ज्यांचा आधार घ्यायचा
तेच कुठे गद्दार आहेत
पोलिस जरी असले तरी
गतानुगतिक वेश असावा
अन् कार्य असं करावं की
जनतेच्या मनी द्वेश नसावा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३