दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी..!

Submitted by मी अभिजीत on 31 July, 2008 - 03:21

दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी.
हरता हरता डाव जिंकला बनली एक कहाणी..!

राजा वदला कशी बिनसली "न्युक्लिअर डील" ची भाषा.
माझ्या नशीबासवे खेळती या "पंज्याच्या रेषा.
त्या राणीच्या डोळा पण ना दाटून आले पाणी ..! ..१

तिला विचारी राजा खासदार कसे फोडावे ?
का डाव्यांनी पाठिंब्याचे हात असे सोडावे ?
या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी..! ..२

राणी वदली बघत एकटक युपीकडच्या वाटा.
उद्या पहाटे अमरसिंग अन मुलायमाला गाठा.
अन राजाला लगेच पटली "मायाजाल" निशाणी..! ..३

त्या राणीने मिटळे डोळे "क्रॉस व्होटिंग" होताना.
त्या राजाचा भाव वाढला गीत तिचे गाताना.
विरोधकांच्या मुखात उरली "सिंग इज किंग" विराणी..! ..४

दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी.
हरता हरता डाव जिंकला बनली एक कहाणी..!

-- अभिजीत दाते

गुलमोहर: 

फक्त चौथ्या कडव्याच्या पहिल्या ओळीत गडबड होती आहे चालीत म्हणताना... बाकी एकदम झकास..
==================
सुसाट वारा वीज कडकडे पाऊस झाला सुरू
पाणीच पाणी रस्त्यावरती मुठीत गारा धरू

>> राणी वदली बघत एकटक युपीकडच्या वाटा.
>> उद्या पहाटे अमरसिंग अन मुलायमाला गाठा.

हे तर खासच रे अभिजीत Happy

ओय होय... क्या बात है. अभिजीत, झ'ख्खास!

अल्टी आहे रे.... झकास ... खल्लास विडंबन...!!!

मस्तच विडंबन Happy

झक्कास अभिजीत्...आता अरुण दातेसाहेबाना गळ घाल गाण म्हणायची !