मुलांच्या चालूगिरीची काय वर्णांवी गाथा….

Submitted by रेणू on 26 January, 2010 - 09:39

या मुलांच्या चालूगिरीची
काय वर्णांवी गाथा….
तडतडते शीर नि
ठणठणतो माथा…

बोलशील का माझ्याशी
आवडतेस मला खूप…
डोके फिरले का तुझे?
कहाँ बारिशमें निकली धूप..

तुझे नाव कोरले मनात
तूच सर्वांहून खास…
जागा हो आधी
तुझे हे निव्वळ भास…

इंप्रेशन मग पाडायला
केल्या कविता पेस्ट…
ओळखीच्याच कविता-कवी
सगळीच मेहनत वेस्ट….

थांब म्हटलं जरा
वेगळ्या आपल्या वाटा….
म्हणे तू असा नको
विषयाला देऊ फाटा….

तुझ्याशिवाय जगायचं?
जमणारच नाही मला….
न जमायला काय झालं
ओपशन्स आहेत की तुला

पटकन जागा होत त्याने
स्क्रॅप्स डिलीट केले….
एकावेळी दहा तीर्
मारतात हलकट मेले…:राग:

-रेणुका खटावकर (रेपाळ)

तुम्ही किति तीर सोडले ते पण सांगा की... Happy

स्क्रॅप्स डिलीट केले…. >>>
==================
हे ऑर्कुट प्रकरण दिसतंय Happy ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म

Biggrin