काय हवयं आणि?

Submitted by वर्षा_म on 20 January, 2010 - 02:30

अमोल बारई कविमोल यांची माफी मागुन >>>

माझ्या डोळ्यामध्ये तू
तुझ्या डोळ्यामध्ये मी,
असे सलत असतांना
काय हवयं आणि?

जेंव्हा कधी ओरडतेस
किती ती रुक्श वाणी,
तू अशीच ओरडतांना
काय हवयं आणि?

कुरुप तरी किती
वर्णितो जशी माकडीण,
शब्द शब्द पडलेत कमी
काय हवयं आणि?

कुरळलेले तुझे केस
शिरत नाही फणी
त्याच्या वेण्या घालत रहातो
काय हवंय आणि ?

तुझे तिरळे नयन
पहाताच माझ्या डोळ्या पाणी,
नजर तुझी शोधतो
काय हवयं आणि?

गुलमोहर: 

Happy

वर्षा,

कुरडलेले तुझे केस
जसे निग्रो वानी,
त्याच्या वेन्या घालत रहातो
काय हवयं आणि?

हे

कुरळलेले तुझे केस
शिरत नाही फणी
त्याच्या वेण्या घालत रहातो
काय हवंय आणि ?

असं असलं तर?

छान!

दुसरं काही सुचतय कि नाही तूला..रिकामटेकडे उद्योग चालवलेत नुसते Lol

हे सुद्धा जबरदस्तच...