Submitted by तुष्कीनागपुरी on 9 January, 2010 - 11:55
रोज चमचमीत खाउ वाटले तरी
ऐक नीट भोजनास जा तुझ्या घरी
तो चटोर चायनिज वाट रोखतो
हासुनी खुशाल मेनु कार्ड टाकतो
रंगवून, रंगुनी नुडल्स वाढतो
सांगतो अजूनही तुला परोपरी
ऐक नीट भोजनास जा तुझ्या घरी
सांग श्याम पाटलास काय जाहले
रोज मस्त खाउनी हे पोट वाढले
वेढती भल्याभल्यांस जीभ चोचले
एकटाच वाचशील काय तू तरी
ऐक नीट भोजनास जा तुझ्या घरी
जो ईथे घरीच जेवणात रंगला
बायको मुलांसवे मजेत दंगला
त्यास रामबाण स्वास्थ्यलाभ लाभला
आजकाल जीवनात रीत ही खरी
ऐक नीट भोजनास जा तुझ्या घरी
गीतकार : सुरेश भट
विडंबनकार : तुषार जोशी, नागपूर
गुलमोहर:
शेअर करा
मस्त
मस्त लिहीलयं
मस्त लिहीलयं
आवडले, भारी लिहीलय.
आवडले, भारी लिहीलय.
झक्कासच
झक्कासच
लय भारी रे!
लय भारी रे!
मस्त जमलीये....
मस्त जमलीये....
पुन्हा भोजनास जाऊ वाटले
पुन्हा भोजनास जाऊ वाटले घरी,
बायको म्हणे बाहेर नेणार कधी ...
रोज मस्त खाउनी हे पोट वाढले
डॉक्टरांनी तुला "मोट्यांत" काढले
जींस मध्ये मावणार काय तू तरी
बायको म्हणे बाहेर नेणार कधी ...