मी नाही प्रोजेक्ट केला

Submitted by वर्षा_म on 27 September, 2010 - 00:57

घड्याळात वाजले नउ
मायबोली उघडा पाहु
नविन लेखन पहाण्यात एक तास गेला Happy
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले दहा
एक बीबी पेटला पहा
वाद घालण्यात एक तास गेला Biggrin
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले अकरा
जिगांना केलेय बकरा
मुक्ताफळे उधळण्यात एक तास गेला Angry
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले बारा
विंपुचा झालाय मारा
विपु विपु खेळण्यात एक तास गेला Rofl
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजला एक
प्राचीने लिहीला केक
रेसिपी वाचण्यात एक तास गेला Proud
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले दोन
हा नविन आयडी कोण
डु आयडी ठरवण्यात एक तास गेला Uhoh
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले तीन
नविन काहीतरी लिहीन
कॉपी पेस्ट करण्यात एक तास गेला Wink
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले चार
योडीला कंटाळा फार
कंटाळा घालवण्यात एक तास गेला Light 1
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले पाच
मंदार म्हणाला कविता वाच
कविता वाचण्यात एक तास गेला Proud
मी नाही प्रोजेक्ट केला

घड्याळात वाजले सहा
दिवाळी अंकाची जहिरात पहा
विषय शोधण्यात एक तास गेला Lol
मी नाही प्रोजेक्ट केला

गुलमोहर: 

वर्षे, एकदम सह्ही :), एकदम जबराट Happy

घड्याळात वाजले दहा
एक बीबी पेटला पहा
वाद घालण्यात एक तास गेला
मी नाही प्रोजेक्ट केला>>>>>> Proud Biggrin Happy

आज बहुदा सात पण वाजतील Proud

घड्याळात वाजले सात
विडंबनाला मिळाले प्रतिसाद
प्रतिसाद वाचण्यात एक तास गेला
मी नाही प्रोजेक्ट केला

धन्यावाद लोकहो Happy

वर्षा,
लहान्पणि असलं एक गाण म्हणायचो आम्ही

घड्याळात वाजला एक
मिनीने आणला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

घड्याळात वाजले दोन.
घरात वाजला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

घड्याळात वाजले तीन
मिनीची हरवली पिन
पिन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

अस रात्रि पर्यंत होत काय काय.
तुझ्या कवितेच शिर्षक वाचुन मला तीच कविता आठवली म्हणुन वाचाय्ला आले.

छान Happy

घड्याळात वाजले आठ
बॉसची पडली गाठ
कारणं देण्यात एक तास गेला
हातात मेमो आला >> योग्या मला खरच वाटतय आता माझ्यावर हिच वेळ येइल. खुप टीपी करते सध्द्या मी माबोवर Lol

पुन्हांदा धन्स लोकहो Happy

वर्षे Lol

केक कसा होता Proud

माबोचा लागला चसका
सर्वर ने घेतला धसका
दृपाल च्या विनवणीत एक तास गेला
मी नाही प्रोजेक्ट केला Proud

Pages