CWG

सांग सांग भोलानाथ...

Submitted by मन-कवडा on 1 October, 2010 - 20:02

सांग सांग भोलानाथ, पाउस पडेल काय?
मैदानात तळे साचून कलमाडी बुडेल काय?
सांग सांग भोलानाथ.........

भोलानाथ वेटलिफ्टींगची स्पर्धा होईल काय?
वजने उचलताना छत खाली पडेल काय?
सांग सांग भोलानाथ.........

भोलानाथ भोलानाथ, खर सांग एकदा
डास चावून सगळ्यांना डेंग्यू होईल का रे यंदा
सांग सांग भोलानाथ.........

भोलानाथ, कलमाडी पुंगी वाजवेल काय
CWG Village मध्ये साप डोलेल काय?.
सांग सांग भोलानाथ.........

भोलानाथ, माकडांनाच पोलिस करतील काय
पंतप्रधानांना सॅल्यूट मारायला उभे करतील काय?.
सांग सांग भोलानाथ.........

सांग सांग भोलानाथ, पाउस पडेल काय?..
मैदानात तळे साचून कलमाडी बुडेल काय

गुलमोहर: 
Subscribe to RSS - CWG