Submitted by कौतुक शिरोडकर on 24 September, 2010 - 03:08
प्रेरणा - http://www.maayboli.com/node/19971
(बेफिकीरजी, 'माकडाच्या हाती कोलीत' ही म्हण माहीत असेलच तुम्हाला.)
काय सांगू तुला कसा आहे ?
सिंह वर, आत मी ससा आहे
शक्य नाही पदोन्नती आता
'बॉस' ही एक अवदसा आहे
खे़ळतो तोच जो बुकी असतो
पीचवर पाकचा ठसा आहे
काल होता प्रभावही माझा
आज नुसताच वारसा आहे
माणसे सर्व चांगली दोस्ता
फक्त वाईट लालसा आहे
आपल्यासारखेच सारे हे
ओळखा, कोण आरसा आहे ?
मी जरा घेत चाललो आहे
शुद्ध हरपेल..... भरवसा आहे
काय संबंध नेमका अपुला
बघ, मुलाचाच बारसा आहे
'कौतुके' मी विडंबनी रमतो
घेतला हाच मी वसा आहे
गुलमोहर:
शेअर करा
या तुझ्या विडंबने
या तुझ्या विडंबने घेतला
काळजाचाच ठाव सा आहे
वा कौतुका.... ,तु का इतके चांगले विडंबतो..
मस्त...
मस्त...
कौतुक, दोन गोष्टींसाठी आपले
कौतुक,
दोन गोष्टींसाठी आपले अभिनंदन!
१. उत्तम विडंबन!
२. आपण पक्का काफिया घेतलात, मी स्वरकाफिया घेतला होता. पक्का काफिया घेऊनही आपण जमीन चांगली हाताळलीत.
आपले धन्यवाद यासाठी की:
आपण माझी गझल निवडलीत विडंबन करण्यासाठी!
मनःपुर्वक आभार!
-'बेफिकीर'!
व्वा चांगले विडंबन... ससा,
व्वा चांगले विडंबन... ससा, लालसा, आरसा आवडले...
लालसा शेरात 'ऐक' च्या जागी फक्त घालून वाचले
गुरु आहेस मित्रा
गुरु आहेस मित्रा
धन्यवाद सगळ्यांनाच
धन्यवाद सगळ्यांनाच !!!
बेफिकीरजी, आपल्या प्रोत्साहनासाठी आभार.
मिल्याभौ, तुम्ही जे वाचलत आम्ही तेच लिव्हलं बगा.
क्लास विडंबन!
क्लास विडंबन!
बढिया !! मस्तच..
बढिया !! मस्तच..
अरे वा... मस्त जमलय... !
अरे वा... मस्त जमलय... !
व्वा रे
व्वा रे
कौतूक.. मस्तच..
कौतूक.. मस्तच..
मस्त ! >>माणसे सर्व चांगली
मस्त !
>>माणसे सर्व चांगली दोस्ता
फक्त वाईट लालसा आहे<<< वा !
कौतुकराव, किती कौतुक करावं
कौतुकराव,
किती कौतुक करावं तुमचं हेच कळत नाही, मुळ गझलेला जराही धक्का न लावता प्रभावी विडंबने करण्याची तुमची हातोटी जगावेगळी................
अरे तु कित्ती आणि काय काय
अरे तु कित्ती आणि काय काय लिहितोस? बरचचं मिस झालंय माझ्याकडून...
छान जमलंय विडंबन..
विडंबन कसलं... ही पक्की गझल
विडंबन कसलं... ही पक्की गझल झालिये....... ग्रेट...!!!!!
वा
वा
विडंबन कसलं... ही पक्की गझल
विडंबन कसलं... ही पक्की गझल झालिये....... ग्रेट...!!!>> अनुमोदन.. !!!
मस्त !
मस्त !:)