मीच माझा...
डोळे सताड उघडे..
आणि नजर एकटक छताकडे..
सभोवताली किर्र्..काळोख..
पण माझा रोख मात्र स्वतःकडे..
आठवणींचा लख्ख प्रकाश..
डोळे घट्ट मिटल्यावरही दिसणारा..
खिडकीभर जुनच आकाश..
पण आज रंग .. नवखा भासणारा..
काल तिथं तू होतीस..
डोळे सताड उघडे..
आणि नजर एकटक छताकडे..
सभोवताली किर्र्..काळोख..
पण माझा रोख मात्र स्वतःकडे..
आठवणींचा लख्ख प्रकाश..
डोळे घट्ट मिटल्यावरही दिसणारा..
खिडकीभर जुनच आकाश..
पण आज रंग .. नवखा भासणारा..
काल तिथं तू होतीस..
नुकताच आसवांना.. बिलगून स्पर्श गेला..
हळुवार हुंदक्यांना..रडवून स्पर्श गेला..
अनभिज्ञ .. तृप्त गात्री.. रोमांच वेचताना..
अस्थिर स्पंदनांना.. अडवून स्पर्श गेला..
अलगुज भावनांचे .. शब्दात मांडताना..
अक्षम्य चुका टाळता आल्या असत्या तर..
किती बरं झालं असतं..
तुला भेटणंच मी सर्वात आधी टाळलं असतं !
मग....
सगळे संदर्भ आपोआपच टळले असते.
छे..
पण असं ठरवल्या प्रमाणे घडतं का कधी..?
अगदी मोजून मापून... पाउल पडतं का कधी..?
तुझी याद येता शब्द मुकेपण पांघरती
तुझ्या आठवणींसंगे पाउसथेंब झेलती
कसा कळेना चुकतो ठोका त्या क्षणा आठवुन
पुन्हा शहारा उठतो अंगी तुझे नाव घेउन.
असा कसा रे परका तु? मी स्वतःला तुझी समजते,
जेव्हा मी प्रेमात पडलो!
मी प्रथमच जेव्हा प्रेमात पडलो........
असा धडपडलो.........
खरचटले.....मोडले.....रक्त वाहिले.
पण तिने..एक कटाक्ष.. फक्त पाहिले.
मला वाटले काम झाले.......
मित्रानां केलेला, पूर्ण झाला ना वादा......
लिहित रहा लिहित रहा राणी
जोवर आहेत ओठांवर शब्द आणि गाणी...
हळव्या शब्दांना गाणं मिळेल
गाण्याला शब्दांचं नव घर मिळेल!
प्रसन्न राहिल जोवर तुजवर सरस्वती
उधळीत रहा असेच देखणे शब्दांचे मोती.
लिहित रहा जोवर आठवतंय सारं
जीवन देवाने फार लहानसे दिले आहे पण जीवन हे एक देवाने दिलेले बर्थडे गिफ्ट आहे..ते जगले पाहिजे..जीवन एक गीत आहे,जीवनगीत..
जीवन सुखदु:खांची रीत,
जीवन गातच राहते एक जीवनगीत.
आल्या कितीही अडचणी,
आयुष्य एक पारस मणी.
त्या क्षणाचा आभार मानु
की सुखाचा अवतार मानु
अभिमान मानु मी तुझा
की स्वतःला धन्य मानु?
दारापल्याड दाहक ऊन
मज दाखवी तप्त वाकुल्या
भेटलास मित्रा तु जसा
ना भेटल्याही सावल्या.....
आज मी एकांत यात्री
क्लांत मनाच्या काहिल्या
मी कोण, कुठूनी आलो,
मी का जगतो आहे ?
माझ्या प्रश्नामध्ये
मी रोज गुन्ततो आहे...
कुणाशी सुर हे जुळती अन
कुणी तोडतो नाते..
कोणी आपला होतो अन
कुणी दुरावत जाते..
कोणी मान्डतो गणिते
कुणी काढतो नक्षी
कोणी मासा होतो अन
कोणी होतो पक्षी...
ह्या क्षणांना जोडणारे
शब्द मी आणु कसे?
नात्यांचे चुकले संदर्भ सारे
स्पष्टीकरण मागु कसे?
बाळगली ना भीड कुणाची
केले जे जे पटेल ते
आज चुकल्या वाटा तर मी
गाव माझे शोधु कसे?
होण्यास आहे संध्याकाळ वाटे
पुन्हा होणार नाही पहाट जणु