Submitted by पल्ली on 7 May, 2008 - 02:19
त्या क्षणाचा आभार मानु
की सुखाचा अवतार मानु
अभिमान मानु मी तुझा
की स्वतःला धन्य मानु?
दारापल्याड दाहक ऊन
मज दाखवी तप्त वाकुल्या
भेटलास मित्रा तु जसा
ना भेटल्याही सावल्या.....
आज मी एकांत यात्री
क्लांत मनाच्या काहिल्या
शिडकाव शब्दांचा तुझ्या
गंधित मृत्तिका जाहल्या
गुणगुणतील शब्द आता
घेउन हाती कवडसा
भेटलो मी तुला अन
भेटलास मजला तु जसा....
काय मी सांगु मित्रा
काय मजला वाटले
फार दिसांनी जणु काही
आयुष्य मजला भेटले!
गुलमोहर:
शेअर करा
तुझ्या
तुझ्या प्रतिभेला माझा सलाम....
क्लांत मनाच्या काहिल्या
शिडकाव शब्दांचा तुझ्या
गंधित मृत्तिका जाहल्या
खरं सांग
ताई, शब्द तुझे गुलाम तर नाही ना?
*******************
अभिजीत४मैत्री
भेटलास
भेटलास मित्रा तु जसा
ना भेटल्याही सावल्या.....
कुणी एवढ छान कस लिहु शकत?
तसा मी
तसा मी कवितेचे कौतुक करायला लहान आहे,तरी कविता मला फार आवडली...
छान
छान
ठमे, आवडली
ठमे,
आवडली हं कविता.
- अनिलभाई
सर्वाचे
सर्वाचे मनःपुर्वक आभार्...
पल्ली, दारा
पल्ली,
दारापल्याड दाहक ऊन
मज दाखवी तप्त वाकुल्या
भेटलास मित्रा तु जसा
ना भेटल्याही सावल्या.....
आवडल्या ह्या ओळी!
भेटलास
भेटलास मजला तु जसा....
काय मी सांगु मित्रा
काय मजला वाटले
फार दिसांनी जणु काही
आयुष्य मजला भेटले!
खरेच अप्रतिम
तुषार
आज मी
आज मी एकांत यात्री
क्लांत मनाच्या काहिल्या
शिडकाव शब्दांचा तुझ्या
गंधित मृत्तिका जाहल्या
छान !!
...............अज्ञात
दाद, तुषार भाउ, अज्ञात. धन्यु
दाद, तुषार भाउ, अज्ञात. धन्यु
मस्त पल्ली.
मस्त पल्ली.
नेहमीप्रमाणेच अप्रतिम ! शब्द
नेहमीप्रमाणेच अप्रतिम !
शब्द ह्यांचे वाहती असे
गंध कसे हे आगळेसे !!
पल्ले, >>काय मी सांगु
पल्ले,
>>काय मी सांगु मित्रा
काय मजला वाटले
फार दिसांनी जणु काही
आयुष्य मजला भेटले! >> ओळी आवडल्या...
भेटलास मित्रा तु जसा ना
भेटलास मित्रा तु जसा
ना भेटल्याही सावल्या.....
खूपच छान..
चान्गली आशयपूर्ण जमलीहे कविता
चान्गली आशयपूर्ण जमलीहे कविता
छान
अलका, भाउ, दक्षिणा, लिंटिं...
अलका, भाउ, दक्षिणा, लिंटिं... आभारी.
मी ठरवुन लिहित नाही, जे जसे जमेल सुचेल तसे लिहुन टाकते... व्याकरण मला माहित नाही हे मी प्रामाणिकपणे कबुल करते.
पल्ले, आवडली कविता! गुणगुणतील
पल्ले, आवडली कविता!
गुणगुणतील शब्द आता
घेउन हाती कवडसा
भेटलो मी तुला अन
भेटलास मजला तु जसा...
सुरेख!
क्रांती.... आभारी.
क्रांती.... आभारी.
सुंदर आहे शब्द रचना
सुंदर आहे शब्द रचना
(No subject)
क्या बात है! "मित्रा" ने खास
क्या बात है!
"मित्रा" ने खास मजा आली वाचताना.
आउसाहेब, अफलातून!
आउसाहेब, अफलातून!
पल्ले , वा क्या बात है , खुप
पल्ले , वा क्या बात है , खुप छान
मुकु, श्यामली पक्या, उम्स,
मुकु, श्यामली पक्या, उम्स, अथक
धन्यु
छान, सुंदर कविता सुधीर
छान, सुंदर कविता
सुधीर
व्वा! एक नंबर......
व्वा! एक नंबर...... झक्कास्..... फोडतय......
सुंदर!
सुंदर!
आ हाहा हा.......अप्रतिम,
आ हाहा हा.......अप्रतिम, मनाला मोहविणारे........
जी एस, धनेश, वारा, शशांक ...
जी एस, धनेश, वारा, शशांक ... थँकस मित्रांनो