तुझी प्रितवेडी
सांगता सांगता शब्द गोठून गेले,
तरंग मनाचे असे विरून गेले,
जगाची मला नसे काही चिंता,
तरी एक दडपण दाटून गेले
तुझीच व्हावे प्रिती अपुली जूळावी,
तुझी साथ मजला जन्मोजन्मी मिळावी,
तुझी प्रितवेडी मी तुझी मूर्तवेडी,
सांगता सांगता शब्द गोठून गेले,
तरंग मनाचे असे विरून गेले,
जगाची मला नसे काही चिंता,
तरी एक दडपण दाटून गेले
तुझीच व्हावे प्रिती अपुली जूळावी,
तुझी साथ मजला जन्मोजन्मी मिळावी,
तुझी प्रितवेडी मी तुझी मूर्तवेडी,
एका गावरान प्रेयसीला आपल्या प्रियकाराचा/ धन्याचा विरह सहन होत नाही आहे.
तो ती तिच्या भाषेत कसा व्यक्त करेल ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कितपत यशस्वी आहे ते जाणकारच सांगू शकतील.
एका नाटकासठी हे गाण लिहल होत... एक तरुण मुलिच्या भावना व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे ... आवडल्यास नक्की सान्गा.....
मन वार्यावरती उडे, आनन्दीत सडे, नवनवी माती,
मन पानोपानी, दवबिन्दून्शी किरणे खेळत होती,
तिला घ्यायची होती भरारी
उंच आकाशात
मुक्तपणानं.....
पण तिच्या पिलांसाठी
तिनं आकाशाची हाक नाकारली.
चाकोरीच्या पिंजर्यात राहुन स्वतः
आपल्या पिलासाठी
आकाश उभं केलं तिनं...
हळुहळु श्वास श्वास मोजताना
सुर्य अस्ताला जाताना
देऊ नकोस हाक , झाला आता उशीर
आधी कधीच नव्हती माझी तुला फ़िकीर…
उध्वस्त गाव झाला , ज्वाळा तुझ्याच होत्या
आक्रोश ऐकताना होतीस तू बधीर…
आता कशास आला दाटून हा उमाळा
खोटेच सर्व आहे डोळ्यातलेही नीर…
मेघांच्या दुलईत
पहुडली सकाळ
स्वप्नांना वेल्हाळ
जोजवीत
वार्याचे प्रयत्न
गेले व्यर्थ
तयाला अर्थ
उरला नाही
रिमझीम जराशी
झाली बरसात
परि तिची रात
सरेचना
अनुत्साही पडली
घरट्यात पाखरे
गोठ्यात वासरे
आळसावली
व्यथा
व्यथा व्यर्थ मनीच्या, कुणा मी सांगणार नाही
हरलेला डाव आता, पुन्हा मी मांडणार नाही
वेडा म्हणा कुणी, मज म्हणा कुणी अभिमानी
पायी उगाच तुमच्या, असा मी रांगणार नाही
घरभेदी म्हणती आप्त, या विभिषण धर्माला
१. स्नेह हा जीवनमेळ
नाही आदि
नाही अन्त!
वेगळ्या वाटेने चालताना
नाही खेद नाही खन्त.
२. असावास तू क्रुष्णसखा
वेणूध्वनिने वेडावणारा
व्रुन्दावनात रासक्रीडा करणारा.
३. चार पावल बरोबर चाललो होतो
१. अपूर्ण कामना
मनाचा आक्रोश
निरव साधना
प्रेमाचा प्रकाश.
२. अत्रुप्त मी
रिक्त मी
अभिशप्त मी
अनुतप्त मी.
३. राधाव्रुत्ती
अनन्यभाव
समर्पणव्रुत्ती.
तुझं हसणं
नितळ, खळाळून वाहणार्या पाण्यासारखं
जगरहाटीनं त्रासलेल्या माझ्या तप्त मनावर
समाधानाचं शीतल शिंपण करणारं
अपयशानं नाउमेद झालेल्या मनाला
लढण्याचं बळ देणारं
भोवतालच्या दु:खाने भयग्रस्त झालेल्या मनाला