शोध

Submitted by chaha on 5 May, 2008 - 04:03

मी कोण, कुठूनी आलो,
मी का जगतो आहे ?
माझ्या प्रश्नामध्ये
मी रोज गुन्ततो आहे...

कुणाशी सुर हे जुळती अन
कुणी तोडतो नाते..
कोणी आपला होतो अन
कुणी दुरावत जाते..

कोणी मान्डतो गणिते
कुणी काढतो नक्षी
कोणी मासा होतो अन
कोणी होतो पक्षी...

मी का रडतो हसतो
मी का अबोल असतो..
गर्दी मध्ये आपल्यान्च्या
मी मला जाणतो आहे..

डोळे मिटल्यावरती
स्वप्ने जागी होतात
आयुष्याचा अर्थ तेव्हा
मला सान्गू पहातात..

स्वप्ने कधी मला शिकवतात
एकट एकट रहायला..
कधी मला शिकवतात स्वप्ने ..
शब्दातुन व्यक्त व्हायला..

त्यान्चच ऐकुन हल्ली
मी कविता करतो आहे..

त्यान्चच ऐकुन हल्ली
मी कविता करतो आहे..
माझ्या शब्दान्मध्ये..
मी मला शोधतो आहे......

गुलमोहर: 

कोणी मान्डतो गणिते
कुणी काढतो नक्षी
कोणी मासा होतो अन
कोणी होतो पक्षी...

माझ्या शब्दान्मध्ये..
मी मला शोधतो आहे......

सुंदर! तुमचं काव्य प्रथम वाचनांत आलं. अजुन वाचायला आवडेल

पल्ली, मी पहिल्यांदाच कविता लिहीली आहे... तुझा प्रतिसाद वाचुन बरं वाटलं. आभार !!