तुझी याद - पल्लि

Submitted by पल्ली on 9 May, 2008 - 06:04

तुझी याद येता शब्द मुकेपण पांघरती
तुझ्या आठवणींसंगे पाउसथेंब झेलती
कसा कळेना चुकतो ठोका त्या क्षणा आठवुन
पुन्हा शहारा उठतो अंगी तुझे नाव घेउन.
असा कसा रे परका तु? मी स्वतःला तुझी समजते,
तु माझा नाहीस तरिही, मी स्वतःला सुखी समजते!
आज नाही तो बंधीत धागा, आज नाही ते उरले सूर
स्मरते अजुनी सुंदर सारे, जे आज झाले आहे भेसूर.
पुन्हा पहाट होणे नाही, ना भरतील मेघ पुन्हा
जा शब्दांनो दूर देशी, घेउन ह्या दुष्ट उन्हा...
पहा क्षितिजावरती आले तारे, चंद्र आहे आला,
शब्दांचा पाचोळा उडवीत कवितेचा वारा आला.

गुलमोहर: 

<<कसा कळेना चुकतो ठोका ते क्षण आठवुन>>
<<पहा क्षितिजावरती आले तारे, चंद्र आला आहे >> आता शेवटच्या ओळीचे यमक?
मी हा बदल करुन वाचली. एकंदरीत खुपच सुंदर रेखाटली आहे याद.

>आज नाही तो बंधीत धागा, आज नाही ते उरले सूर
>स्मरते अजुनी सुंदर सारे जे आज झाले आहे भेसूर...,

>पुन्हा पहाट होणे नाही, ना भरतील मेघ पुन्हा
>जा शब्दांनो दूर देशी, घेउन ह्या दुष्ट उन्हा...

ख्ररच छान आहेत या ओळी अन कविता ही सुरेखच आहे...

सार्‍यांचे आभार मित्रांनो आणि मैत्रिणिनो