तु माझा
कळलचं नाही
तुझ्यावर कविता लिहिण्याइतका
कधी जवळचा झालास,
नेमका काय हेतु घेउन
तु माझ्यापाशी आलास?
म्हणलं तर परका म्हणलं तर आपला
अस विचित्र कोंडमारा
माझा का केलास?
कधि आभाळ कधी माती, छायाहि झालास
नावच नाहि ज्याला
कळलचं नाही
तुझ्यावर कविता लिहिण्याइतका
कधी जवळचा झालास,
नेमका काय हेतु घेउन
तु माझ्यापाशी आलास?
म्हणलं तर परका म्हणलं तर आपला
अस विचित्र कोंडमारा
माझा का केलास?
कधि आभाळ कधी माती, छायाहि झालास
नावच नाहि ज्याला
बंध तुटले मन दुभंगले
सांगु तिज शकलो न मी
अव्यक्त माझ्या प्रेमाचा
मूक साक्षीदार मी
भेट पहिली जाहली अन्
हरवले काहीतरी
भारलेल्या त्या क्षणांचा
मुग्ध साक्षीदार मी
रोज स्वप्नातून माझ्या
तीच होती राहिली
तुझी साथ हवी असतांना
मन कासावीस का होते
मन तुझीच कविता गाते
मन शब्द फुलांनी सजते...
ओल होउनी मी ओठांची,
कधी गाली होउनी लाली ..
तुझ्याच तनी मी वसून कधीचा
झालो तुझ्या हवाली,
मी वारा होउनी केस तुझे
भिरकावुन उडून जावे,
वाकलेले अश्रु माझे
सांभाळले होतेच ना
तु जाताच प्रसवल्या
आठवांच्या तिव्र वेणा...
पांगलेले शब्द माझे
आज गोळा जाहले
वेदना संवेदनांचे
अर्थ मजला लागले...
आकाश माझ्या पायतळी अन्
सुर्य होता झाकला
उजाडले आता असे की
क्षितिजाशी नक्षत्रांचे नाजुकसे
हितगुज चालले होते
पहाटेच्या साखरझोपेत
सुखस्वप्न फुलले होते
प्राजक्त ओघळायला नुकतीच
सुरुवात झाली होती
दवाच्या कुशीत शहारत
चंद्रबिंब हलले होते
स्थितप्रज्ञ आकाशाच्या मिठित
तुझ्यात नादावला जीव
भिरकावुन दिला होता
कसा कोण जाणे.. .
पावसात पहिल्या
उगवुन आला आता ..
सावली तुझी रुपेरी ढगाची शिव
सर बनुन गाता गाता...
एका क्षणाचे गहिवरणे..
अन कोवळा थेंब अंगणी
रुजला जाता जाता
तीन्ही सांजेला झाला खुळा जीव
एक चुकार सर मुक
निवली लाही लाही
अनिवार बांधावर
दुर दुर काही नाही..
नितळ झाले दु:ख,
हलके हलके गाई,
गलबलुन कागदावर
उतरली थोडी शाई..
प्राक्तनाचे निश्चल मुख
मन निर्विकार पाही,
नाही आनंदी दरवळ
नाही उदास काही..
काळोखात विन्मुख
सहजच एक पिंपळपान मिळालं
कुणाचीतरी
आटवण म्हणुन जपलेलं
पाहुन मनात विचार आला
आठवणींचं सुद्धा
काहीसं असंच असतं
कधी गर्द हिरव्यागार ...
आणि कधी मात्र
जतन करुनही अस्पष्ट
जतन करुनही अस्पष्ट .........
माझा हा पहिलाच प्रयत्न.कृपया समजून घ्या हि विनंती.
मौनात सुद्धा बोलतेस,
तुझ्या साश्रु नयनातील भावाने
अन् कळत-नकळत, व्यक्त-अव्यक्त
शब्दांच्या मर्यादा सामोर्या येतात,
जेव्हा शब्दच तोलता येत
नाहीत भावनेच्या तराजुत
हलकेच लागली शब्दांची चाहुल
कवितेच्या गावाला पडले पाऊल.
वेदनांची मनाला पडली भुल
काव्याची जीवना चढली झुल.
* * * * * * * * * * *
अभिजीत४मैत्री