कविता

कबर

Submitted by गणेश कुलकर्णी on 8 June, 2008 - 03:01

कबर मी माझी काल खोदली होती
कसे सांगु सखे मला, तुझी किती याद आली होती

लावली होती कुणीतरी एक पणती शेजारी
तुला भेटण्यास ती ही किती तडफडत होती

तुला मी आवडतो इतुका किती कसा ?
म्हणे यमाची छातीही तेव्हा धडधडत होती

गुलमोहर: 

ठराव ..

Submitted by poojas on 7 June, 2008 - 16:26

शून्यात विश्व बघण्याचा..
मज सराव झाला आहे..
माझाच सखे माझ्याशी..
हा ठराव झाला आहे...

एकटाच आलो होतो..
एकटा निघालो आहे..
क्षणभर मागे बघण्याचा..
हा पडाव आला आहे..

कित्येक मुखवटे खोटे..
ओढले चेहर्‍यावरती..
मी ओळखले ना मजला..

गुलमोहर: 

संकेत

Submitted by अज्ञात on 7 June, 2008 - 05:55

डोळ्यात पाहतो मी
तव अंतरंग हृदयीचे
पाण्यात साचलेले
साकेत वेदनेचे
उत्तुंग पाठ्मोरे डोहातले मनोरे
एकांत मागणारे सावध क्षितीज वारे

दारी वठून गेले
प्रजक्त कोष सारे
संकेत हा किनारा
नाते अजून ओले
राखेत वाहणारा वेडाच हा पसारा

गुलमोहर: 

जागेपणी

Submitted by अज्ञात on 7 June, 2008 - 05:40

जागेपणीचे स्वप्न सावळे हे
सांगू कुणाला गोत बावळे
शब्दांस माझ्या पंख भावनांचे
आकाश थिटे लोचनांचे

मी न माझा सवे तिच्या;ना हि मोह-माया
एक जाणीव जणू एक काया
श्वास एकांत शांत धुंद जगावेगळे
पूर्ण अस्तित्व जातसे लयाला

गुलमोहर: 

पुन्हा वेळ नाही

Submitted by अज्ञात on 7 June, 2008 - 05:25

गोडे काठावरती मुरले
मेघांवरती काही
थोडे काळ्या आईसाठी
बाकी सागर खाई

अंकुर पोटामधले हिरवे
किमयेची नवलाई
बेटावर चिमणीचे घरटे
दंवमोत्यांची राई

आकाशाचा श्वास
उगवण्या-मावळण्याची घाई
काय बिचारे उरले
सारे नश्वर ठायी ठायी

गुलमोहर: 

सार

Submitted by अज्ञात on 6 June, 2008 - 15:42

या उरातही दाटते कधि
वेदनेची आस का
पाउलांना वाटते
माहेरची ती वाट का

गूढ हे उकले न कांही
जाणिवा मेघात का
वाहिलेले गोड पाणी
लागते खारेच का

रंगती डोळ्यांत स्वप्ने
भंगती काठास का
शुद्ध त्या साता स्वरांतिल
पाच हे विकृत का

गुलमोहर: 

पहीला..वहीला.. "पाऊस"

Submitted by poojas on 6 June, 2008 - 07:53

आठवणींच्या अल्लड सरी झेलत..
माझं पहील्या पावसात भिजणं..
आसुसलेल्या अवखळ थेंबांचं..
माझ्या मूठभर अंगणात रुजणं..

सारं कसं नवखं..
पहिलं वहीलं भासणारं..
ओल्याचिंबं देहावरची..
जुनी मरगळ पुसणारं..

ओंजळभर नवे मोती..
अंगणभर नवा सुवास..

गुलमोहर: 

कळी

Submitted by गणेश भुते on 5 June, 2008 - 10:18

एकदा एक कळी
आयुष्याला रुसलेली
नशिबाला दोष देत
बिचारी हिरमुसलेली

सार्‍यांशी ती हसुन बोले
कुणाला नाही कळायचे
गतकाळाचे विचार तिला
एकांतात छळायचे

कळीच्या आयुष्यात
एक बदल झाला
'ती' ज्याला आवडायची
'तो' मित्र म्हणुन आला

गुलमोहर: 

आलिंगन

Submitted by sandeepguru on 5 June, 2008 - 01:51

पाहुनि व्याकुळ धरणि मेघ हे मंदावति,
त्रुप्त होन्या जलस्वरुपे येवुनि आलिंगिती. ध्रु.

गंध त्यांच्या मीलनाचा आसमंति पसरला,
आज यॉवनात वारा व्रक्ष्,वनिता विसरला,
प्रेम वेड्या या नद्याहि सागराला चुंबिती.
पाहुनि व्याकुळ................

गुलमोहर: 

भंगलेला प्रदेश

Submitted by अज्ञात on 4 June, 2008 - 07:29

कृष्ण मेघा मेघा किती लावलीस आस
थेंब पाणी दिसे ना कुठे आस पास,
पोरक्या जिवाच्या उले काळजात
माळरानास रे मृगजळाचे आभास

खार डोळ्यातला पापणीला जडावा
नि गाभा भुकेला पुरेनात श्वास,
अस्वस्थ झाल्या दिशा वेदनेच्या

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता