Submitted by अज्ञात on 4 June, 2008 - 07:29
कृष्ण मेघा मेघा किती लावलीस आस
थेंब पाणी दिसे ना कुठे आस पास,
पोरक्या जिवाच्या उले काळजात
माळरानास रे मृगजळाचे आभास
खार डोळ्यातला पापणीला जडावा
नि गाभा भुकेला पुरेनात श्वास,
अस्वस्थ झाल्या दिशा वेदनेच्या
उराशी धरावे ओलांडून वेस
सावल्या लांबल्या जाणिवेच्या आता
मूक अंधापरी चाललेला प्रवेश,
उन्हाच्या झळा साहवे ना गड्या
तूच गोंजार हा भंगलेला प्रदेश
......................अज्ञात
१२३८,नाशिक
गुलमोहर:
शेअर करा
५ गावे
५ गावे इनाम! एका मायबोलिकराची कौतुकाची ही श्टाईल आहे...मी ती ढापली
पल्लीताई, प
पल्लीताई,
प्रतिसाद आवडला. आपणच दिलेल्या इनामाच्या गावाला या आता एकदा.
......................अज्ञात