कळी

Submitted by गणेश भुते on 5 June, 2008 - 10:18

एकदा एक कळी
आयुष्याला रुसलेली
नशिबाला दोष देत
बिचारी हिरमुसलेली

सार्‍यांशी ती हसुन बोले
कुणाला नाही कळायचे
गतकाळाचे विचार तिला
एकांतात छळायचे

कळीच्या आयुष्यात
एक बदल झाला
'ती' ज्याला आवडायची
'तो' मित्र म्हणुन आला

सुखद, सुंदर एक गोष्ट
कळीच्या आयुष्यात घडली
विश्व हरपलेली कळी
'त्या'च्या प्रेमात पडली

अभावितपणे तिच्यावर
'तो'ही प्रेम करु लागला
फक्त रुपावरच नव्हे
तर गुणांवरही भाळला

'त्या'च्या सहवासात कळी
हळू हळू उमलते आहे
त्या दोघांच्या सुगंधी विश्वात
सुखच सुख झुलते आहे

--गणेश भुते (माझ्या 'अलगद' या काव्यसंग्रहातुन प्रकाशीत)

गुलमोहर: