प्रीत माझी.....
प्रीत माझी ग तुझ्यावरी, अव्यक्त जरी पण अमोल खरी
आठवता तुज भरती लोचन, काळीज होय हे खालीवरी
दीस घालवले जे तुझ्यासावे, काढीती नयनातुनी आसवे
एक तू अन दुजा तो श्रावण, ह्रदयावर पडती प्रेमसरी
प्रीत माझी ग तुझ्यावरी, अव्यक्त जरी पण अमोल खरी
आठवता तुज भरती लोचन, काळीज होय हे खालीवरी
दीस घालवले जे तुझ्यासावे, काढीती नयनातुनी आसवे
एक तू अन दुजा तो श्रावण, ह्रदयावर पडती प्रेमसरी
हरएक शिल्प घडलेच कसे
उत्सुक एकांत सुदामा
जाळ्यात अडकते मन अवघे
संम्मोहित मी रामा
चण निसर्गदत्त लतेसम ही
वात्सल्य उरी मुक्कामा
डोळ्यात मदन कमनीय रती
काळीज विदारे कामा
स्वर हळवा व्याकुळ सुमनविकल
घायाळ इंद्र निजधामा
कधी वाटतं सालं आपलं नशीबच खडतर
सात मैलात अडचणी सत्तर.
कोणत्याही कार्याची सुरुवात शंकरपटागत दणक्यात असते...
पाठराखणीची प्रत्येक आरोळी
थोडी डोक्यात, थोडी अंगात,
रोमारोमात भिनत जाते.
मन वेगावर असतं स्वार..
आयुष्याच्या रंगपटावर
ऊन पावसाची बरसात असते.
कधी खेळ संपलेला भासतो,
ती स्वप्नपूर्तीची सुरुवात असते.
काट्याकुट्यांतून चालताना
कधी पावलं रक्तबंबाळ होतात,
पुढच्याच वळणावर अकस्मात
फुलांचे ताटवे भरभरून उमलतात.
विचारांमधली वणवण थोडासा विसावा घेते
अन एक अपरीचित कल्पना उगाचच डोकावून जाते
नकळत येते एका हातात पेन्सिल, समोर कोSSरा कँनव्हास
अता फक्त पांढर्यावर काळं होणार की वेगळच काही?.. पाहू
ओबढधोबड फिक्कट रेषा पिंगा घालू लागतात कागदावर
माझे मला हे उमजून आले
का वेदनेचे काहूर झाले
डोळ्यात वेडी स्वप्ने फुकाची
दिवसा उजेडी अंधारले
बुद्धी खळे ना मती गुंग झाली
ओल्यातली रेत अजुनीच जडली
शब्दाविनाही काट्यास कारण
काळीज वाटेत रुंदावले
कायेस हे आगम्य बोचले
एकांतात येती
श्रुती सूक्त ज्ञाती
वाहुनी अखंड त्यांस
सर्वनाम
शब्दांच्या कळा
छंद वृत्त आगळा
वेध जडे अमृताचा
आत निष्काम
सप्त सुरांसाठी
कंठातील गाठी
आळवू पहती जसे
निजधाम
लय ताला संगे
रंग अंबरात
गंध सुमनास देई
घनश्याम
आत्ताच पाउस पडून गेला
पण हवेतील गारवा अजून जाणवतोय
सर्वस्व देऊन रीता झालेला तो
पांढर्या पुंजक्यांतून खुणावतोय
अंग चोरुन बसलेलं रोप
थंडीने शहारलंय
त्याच्या पानापानात लपवुन पाणी
ते मोत्यांनी बहरलंय
एका ओल्या तारेवर
भरून आले मेघ नभातुन
डोळे का जडले
खारे पाणी स्फटिकापरि
गालांवर ओघळले
कळे न सल आनंद कसा वा
काळिज गाभुळले
हुरहुर स्वस्थपणास बिलगली
स्वर कंठातच विरले
गुदमरले श्वासांत उसासे
मन भिजवुन गेले
एकांतहि नुरला माळावर
हिरवळून आले
दारुण वसुधा सुकलेले तन
उललेले काळीज खोल व्रण
ओठांवर डोळ्यात पुकारा
आर्त पेटलेले जागेपण
ते आले अन विसरुन गेले धुक्यात आपले गाणे
अंबरात खणखणले आणि हरवुन गेले नाणे
जलधीचा अतिभव्य पसारा
खार्यावरती अवखळ वारा