संकेत

Submitted by अज्ञात on 7 June, 2008 - 05:55

डोळ्यात पाहतो मी
तव अंतरंग हृदयीचे
पाण्यात साचलेले
साकेत वेदनेचे
उत्तुंग पाठ्मोरे डोहातले मनोरे
एकांत मागणारे सावध क्षितीज वारे

दारी वठून गेले
प्रजक्त कोष सारे
संकेत हा किनारा
नाते अजून ओले
राखेत वाहणारा वेडाच हा पसारा
राधे अजून आहे कातळ तसाच कोरा

.......................अज्ञात
१२०८,नाशिक

गुलमोहर: 

केवळ अप्रतिम !! अज्ञातजी Happy

प्रकाश,
ऊर भरून आला. उशीरा का होईना कुणाची तरी दर्दी दाद आली; शबरीला/ अहिल्येला राम भेटावा तशी !! आभारी आहे. Happy

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय. Happy

वा वा. सुरेख, सुंदर अज्ञातजी. बघा, रामापाठोपाठ रावणाने पण दाद दिली बघा!
..............................................................................
हलकी 'घ्या', जड 'घ्या'
दिव्याखाली 'घ्या', अंधारात 'घ्या'
'घ्या', 'घेऊ' नका
तुमचा प्रश्न आहे!

आज दिव्याची अवस. चांगला योग दिसतोय !! Happy

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय. Happy

वाह !

कित्ती सुंदर .. खूप आवडली..

Maiteyee

कित्ती सुंदर .. खूप आवडली..
ह्या "त्ती"ला मनापासून दाद Happy धन्यवाद .

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय. Happy

खरंच आज योग चांगला दिसतोय. ही कविता वाचायला मिळाली. प्रकाश कलेलांचेच आभार मानायला हवेत.

मला कुणाचंही वावडं नाही
चांगल्याला चांगलं म्हणावं; शक्य त्याला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; मात्र आपण अलिप्त रहावं